Link copied!
Sign in / Sign up
175
Shares

बुद्धिमान बाळासाठी ह्या गोष्टी करा. . .

आपल्या बाळामध्ये बुद्धिमत्ता निर्माण करण्यातील आपले आहार, भावना आणि जनुक महत्वाची भूमिका बजावतात. यामुळे आपल्या बाळाचे व्यक्तिमत्व देखील तयार करण्यास मदत होते. बाळाची बुद्धी बहुतांश जनुकांवर अवलंबून असते तसेच बाळाच्या वाढी दरम्यान मिळणाऱ्या पोषण आणि आसपासच्या परिस्थितीवर आणि वातावरणावर अवलंबून असते.

आता आपण गर्भवती आहात, आणि प्रत्येक आईप्रमाणे तुम्हांला ही वाटत असेल आपलं बाळ बुद्धिमान आणि आनंदी असावं यासाठी काही साधारण टिप्स आम्ही देणारा आहोत.

१. गोष्टी सांगा

बाळाला गोष्टी सांगा,त्याच्याशी गप्पा मारा, त्याला विविध ज्ञान वाढवणारी  वेगवेगळ्या विषयांवरील  गोष्टीच्या स्वरूपात वाचून दाखवा 

२.थोडे कोवळे ऊन

गरोदरपणात अनेक स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. याचे मुख्य कारण सूर्यप्रकाशापासून वंचित असणे आणि आहारातून योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी न मिळणे हेच आहे. हाडे आणि हृदय मजबूत होण्यासाठी हे जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक असून कोवळ्या उन्हामुळे मिळते. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन साधारण २० मिनिटे तरी घ्या.  शिवाय  आहारात अंड, मासे यांचा  समावेश डॉक्टरांच्या सल्ल्याने करा गरोदरपणातील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे बाळाला भविष्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. 

३. अक्रोड खा. 

गर्भावस्थेतच बदाम, अक्रोड खाल्ल्याने त्यातून नियासीन, प्रोटीन आणि ऊर्जा मिळते ज्याने बाळाच्या मेंदूची उत्तम वाढ होते. पण अक्रोड किती  प्रमाणात खावे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. साधारण १२ आठवड्यानंतर आई जे खाते त्याची चव बाळालाही कळू लागते. त्यामुळे बाळाला पोषण देणारा असा योग्य आहार घेणे गरजेचे आहे

५. व्यायाम आणि शारीरिक हालचाली

अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार, गर्भधारणेदरम्यान व्यायाम केल्यास बाळाच्या मज्जासंस्थेतील न्युरॉन्स(चेतापेशी) मध्ये वाढ होऊन गोष्टी आत्मसात करण्याची आणि स्मरणात ठेवण्याची मेंदूची क्षमता ४० टक्क्यांपर्यंत गर्भातच तयार होते, असे आढळून आले आहे. जर बाळ बुद्धिमान आणि हुशार व्हावे असे वाटत असेल, तर व्यायामाला सुरूवात करा. हे व्यायाम डॉक्टरांच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार करा.

६. पोटाला हलक्या हाताने मालिश करा.

हलक्या हाताने पोटाला मालिश करणे हे देखील बाळाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे दिसून आले आहे. गर्भात असलेले बाळ हा स्पर्श अनुभवू शकते. साधारण २० आठवड्यांनंतर पोटाला हलक्या हाताने दिलेल्या मसाज बाळाच्या मज्जासंस्थांपर्यंत पोहोचत असतो. एका संशोधनानुसार, गर्भातील बाळ आईचा स्पर्श आणि वडिलांचा स्पर्श यातील फरक ओळखू शकते. पोटाला बदामाच्या तेलाने हलके मसाज करावा. (बदामाच्या तेलबाबत प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon