Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

७ बॉलीवूडचे तारे आणि त्यांचे त्यांच्या सासरच्यांशी नाते

        सेलेब्रिटीजच्या ग्लॅमरस आयुष्याबद्दल जाणून घ्यायला कोणाला आवडत नाही ! या ताऱ्यांना स्क्रीनवर आणि ऑफ स्क्रीन दोन्हीकडे बघतांना आपल्याला त्यांच्या आयुष्याबद्दल एक उत्सुकता असते. त्यांच्यातला उत्साह आणि त्यांची जीवनशैली आपल्याला मोहून टाकते. या सर्व ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या जगात त्यांना त्यांचे असे एक वैयक्तिक आयुष्य देखील असते जे आपल्या आयुष्यासारखेच असते.जसे तुमचे तुमच्या सासरच्या मंडळींसोबत विशेष नाते आहे तसे त्यांचे देखील त्यांच्या सासरच्या लोकांसोबत आहे. इथे काही विशेष बॉलीवूड ताऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सासरच्या नात्यांवर प्रकाश टाकला आहे.

१. राणी मुखर्जी.

राणीचे २०१४ साली आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न झाले. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप शांत असते. असे म्हणतात की तिच्या सासू, पामेला चोप्रा, यांच्याशी तिचे पटत नव्हते. पण नंतर पामेलाजींनी राणीचे खूप कौतुक केले. त्यांच्या नुसार, राणीची मुलगी ,अदिरा, हिचा जन्म झाल्यापासून त्यांना राणी खूप आवडायला लागली आहे. आदिराच्या रुपात चोप्रा घराण्यात ४२ वर्षांनी बाळ जन्मले होते.

२. ऐश्वर्या राय-बच्चन.

विश्वसुंदरी ऐश्वर्या तिच्या सासरच्या मंडळींसोबत खूप जवळचे नाते बाळगून आहे आणि ते वेळोवेळी दिसून देखील येते ! आत्ताच मध्ये, एक व्हिडियो इंटरनेटवर व्हाईरल झाला होता ज्यात अमिताभ बच्चन यांना एक पुरस्कार मिळाला तेंव्हा ऐश्वर्या आनंदाने टाळ्या पिटत चीअर करत होती आणि बच्चनजी तिला म्हणाले की, “आराध्या सारखे वागणे बंद कर !” अनेकदा कार्यक्रमात ऐश्वर्या तिच्या सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार करतांना किंवा मिठी मारतांना दिसून येते. जया आणि अमिताभ यांच्यासोबतचे तिचे हे नाते विशेषच म्हणावे लागेल, नाही का?

३. सैफ अली खान.

बॉलीवूड मधले सैफ-करीना हे खास कपल एकमेकांच्या घरच्यांशी खास नाते जोडून आहे. सैफची आई शर्मिला टागोर यांनी करीनाचे आजोबा शम्मी कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. तेंव्हापासूनच त्यांचे परिवार एकमेकांशी जोडलेले आहेत. आधीपासूनच ते एकमेकांच्या पारिवारिक कार्यक्रमात दिसून येतात. दोन्ही कुटुंब जवळचे असल्याने करीना आणि सैफ यांचे सासरच्यांशी नाते जवळचे आहे.

४. मीरा राजपूत –कपूर.

शाहीद आणि मीरा यांना घराचे प्रेमाने ‘शामिरा’ म्हणतात. या दोघांचे लग्न एकदम शांततेत आणि कोणालाच कळू न देता २०१५ मध्ये झाले. या त्यावेळी खूप चर्चेचा विषय होता कारण दोघांमध्ये चक्क १४ वर्षांचे अंतर आहे ! मीरा राजपूत-कपूर नेहेमी सांगते की तिच्या आयुष्यात तिला २ आई आहेत. तिच्या सासू सुप्रिया पाठक तिच्यासाठी तिच्या आईपेक्षा कमी नाहीत. सुप्रीयाजी सुद्धा शाहीद आणि मीराला या जोडीला खूप जीव लावतात.

५. शाहरुख खान.

बी-टाऊनचा बादशाह शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी दोघेही एक एव्हरग्रीन जोडी आहे. दोघांची प्रेमकथा एखाद्या सिनेमात शोभावी इतकी सुंदर आहे. या दोघांची ही स्टोरी ऐकून कोणाचाही प्रेमावर विश्वास बसेल आणि या जगात अजूनही प्रेमाला तितकीच महान जागा आहे या गोष्टीची खात्री पटेल. एका मुलाखतीत गौरीने सांगितले होते की, शाहरुख कधी कधी गमतीत तिच्या आईला ‘सेक्सी’ म्हणतो. यावरून तुम्ही अंदाज करा की त्याचे त्याच्या सासरच्यांशी नाते किती मजेशीर असेल.

६. जेनेलिया डिसुजा- देशमुख.

बॉलीवूड मधली सर्वात गोंडस अशी जोडी म्हणजे जेनेलिया आणि रितेश देशमुख. या दोघांची लव्हस्टोरी खूपच गाजली आणि ती तितकी इंटरेस्टिंग देखील आहे. दोघेही एका चित्रपटाच्या सेटवर भेटली आणि आज त्यांना २ सुंदर मुले आहेत. दोघेही खूप खुश आणि आनंदाने संसार करत आहेत. २०१२ मध्ये विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचे सावट आले होते, परंतु नंतर या जोडीच्या त्यांच्या बाळासोबत एक फमिली फोटो शेअर केल्या ज्यात विलासराव देखमुख फ्रेम मध्ये मागे दिसत होते.

७. अक्षय कुमार.

डिम्पल खन्ना यांना अक्षय कुमारपेक्षा उत्तम जावई मिळू शकत नाही. दोन मुलांचा बाप आणि आपल्या चार्मिंग इमेजने सुपरहिट चित्रपट देणारा अक्षय कुमार त्याच्या सासरच्या मंडळींसाठी एक आधार आहे. जेंव्हा राजेश खन्ना यांच्या मृत्युनंतर त्यांच्या प्रॉपर्टी संबंधित वाद निर्माण झाले होते तेंव्हा अक्षयने त्याच्या सासूला खूप मदत केली होती. बॉलीवूडमध्ये अक्षय डिम्पलजींना सासू नाही तर आम्ही ‘बेस्ट फ्रेण्ड्स फोरेव्हेर’ आहोत म्हणून सांगतो. त्याच्या सासूकडून कौतुक करून घ्यायची एकही संधी अक्षय सोडत नाही.!  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon