Link copied!
Sign in / Sign up
76
Shares

भिजवलेले बदाम खा आणि हे फायदे मिळवा.

     पूर्वी जस-जशी परीक्षा जवळ यायला लागे किंवा शाळेची महत्वाची वर्ष आली की रात्री बदाम भिजवून ठेवण्यात येत असे आणि दुसऱ्या दिवशी साल काढून मुलांना खायला देण्यात येत असे. तसेच वरचं अन्न द्यायला सुरवात केल्यावर लहान मुलांना पण भिजवलेल्या बदाम दुसऱ्या दिवशी उगाळून दुधात घालून देण्यात येत असे. पण हे बदाम भिजवून का देण्यात येत असेल याबद्दल फारशी माहिती कोणाला नसते. भिजवलेले बदाम खाण्याने  स्मरणशक्ती तल्लख राहते. बदामात ई जीवनसत्व, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड हे भरपुर प्रमाणात असते.

बदामाचे हे उपयुक्त घटक शरीरात योग्यप्रकारे शोषून घेण्यकारात रात्रभर भिजवणे आवश्यक असते. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही घटकांमुळे कधी-कधी बदामाचे पचन होणे कठीण होते.बदाम रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व बदमातील पोषक गुण शरीरास मिळतात. बदाम भिजवून खाल्यामुळे आरोग्यविषयक कोणते फायदे होतात ते आपण पाहणार आहोत. 

आरोग्यविषयक फायदे 
गर्भाच्या वाढीसाठी उपयुक्त 

गरोदर स्त्रियांने बदाम खाल्यानेबदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात.

बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी करते.

शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे. बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढते.

वजन घटवण्यास मदत होते. लहान मुलांचे वजन वाढीस

भिजवलेल्या बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या 

लहान मुलांना वरचे अन्न द्यायला लागल्यावर (साधारणतः ८-९ महिन्यानंतर) भिजवलेला बदाम उगाळून दुधात घालून उकळून दिल्यास बाळास वजन वाढण्यास उपयुक्त ठरते.

 

मेद कमी करून पचनशक्ती सुधारतात.

कारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

रक्तदाब आणि हृदयरोग वर उपयुक्त

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. परंतु हे बदाम योग्य प्रमाणात खाणे योग्य असते. तसेच बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयरोग दूर ठेवण्यास मदत करतात. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon