Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

असे करा भाताचे वडे...

मुलांना काय आणि मोठ्यांना काय नाश्त्याला मधल्या वेळेला खायला काय करायचा हा प्रश्न असतो. त्यासाठी आज आपण एक सोप्पा पदार्थ पाहणार आहोत भाताचे वडे 

साहित्य:

१. १ कप भात (शिळा किंवा ताजा कोणताही चालेल ताजा असल्यास उत्तम )

२. थोडेसे ज्वारीचे पीठ 

३.  दोन चमचे तांदळाचे पीठ 

४. १/२ टिस्पून जीरे, १/४ चमचा हळद

५. २ छोटे चमचे तिखट (आवडीनुसार तिखट )

६.  १/४ चमचा धणेपूड

७. कोथिंबीर 

८. चवीपुरते मीठ

९. तेल 

कृती:

१.  भात जर मोकळा असेल तर पाण्याचा हबका मारून वाफवून घ्या. 

२. मऊ आणि घट्ट झालेल्या भातात जीरे, हळद, मिरची, धणेपूड, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करावे. तांदुळाचे पीठ घालावे आणि आणि हे मिश्रण चांगले मळून घ्या. 

३.  नंतर अंदाजे ज्वारीचे पीठ घाला साधारणतः १ कप भाताला १/२ ते ३/४ कप पीठ लागेल. ज्वारीचे पीठ घातल्या वर पुन्हा मळून घ्या. 

४. थोडे तेल हातावर घेउन छोटे-छोटे गोळे करून चपटे करा आणि  मधे एक भोक पडून घ्या. 

५. हे वडे माध्यम आचेवर तळून घ्या. किंवा तव्यावर थोडेसे चॉकलेटी रंग येईपर्यंत थोडे तेल घालून फ्राय करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon