Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

भारतात मुलाला वाढवण्यासाठी किती खर्च येतो याची कल्पना आहे का ?


जेव्हा तुम्ही प्रेग्नंट आहात हे समजतं, तेव्हापासून तुमच्या मनात अधिकच्या खर्चाचे विचार तुमच्या मनात सुरू होतात. तसेच जर तुम्ही बाळाविषयी विचार करत असाल, तर तुमच्या डोक्यात हे आर्थिक गणित आपोआपच सुरू होते. एका संशोधनानुसार बाळाच्या जन्मापासून तो 21 वर्षांचा होईपर्यंत जवळपासप 55 लाखांचे खर्च लागतो.

चला या खर्चाचे गणित मांडुयात

 एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये सामाम्य किंवा नैसर्गिक प्रसुतीसाठी साधारणत: 50 हजार ते 2 लाखांचा खर्च लागतो. आणि जर सिझर झाले, तर हा खर्च 2 ते 4 लाखांपर्यंत वाढतो. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या खाण्याच्य, खेळण्याचा, शिक्षणाचा, राहण्याचा आणि उतर खर्च लागतो. तुमच्या घरात एका जास्तीच्या व्यक्तीचे आगमन झाल्यानंतर तुम्हाला घरंही तेवढंच मोठे लागतो. बाळ जरी खूप लहान असलं आणि त्याला राहण्यासाठी खूप कमी जागा लागते, असं तुम्हा वाटतं असलं तरी बाळाची विशेष काळजी घेण्यासाठी मोठं घऱ लागतं. त्यामुळे बाळाच्या आगमनानंतर राहण्याचा खर्चही वाढतो. तसेच तो मोठा झाल्यावर त्यांला स्वतंत्र रूमही लागतो. त्यामुळे बाळाच्या आगमनानंतर राहण्याचा खर्च वाढतो.

आजच्या काळात शिक्षण हा आयुष्यातल सर्वात खर्चिक भाग ठरला आहे. शिक्षणावर सर्वात जास्त खर्च होतोय. तुमचं मुलं सर्वात चांगल्या शाळेत जावे, त्याला उत्तम शिक्षण मिळावे, असं तुम्हाला वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे ममुलाच आयुष्य सोयीस्कर बनावं यासाठी त्याला चांगलं शिक्षण द्यायचं तर तेवढाचं खर्चही वाढतोय. आजच्या काळात कोणतीही एक शाळा बघा आणि त्या शाळे मुलांना पाठवा, असं करून चालतं नाही. मुलांना शाळेत पाठवताना त्या शाळेत CBSE, ICSE किंवा IGCSE यापैकी कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते हे पाहिले जाते. योग्य शाळेची निवड केल्यानंतर ट्यूशन फी, गणवेश. पुस्तक, फी, शालेय सहलीसाठीचा खर्च आणि इतर अनेक खर्च लागतात. हा खर्च एवढा जास्त असतो की जवळपास 59 टक्के एवढा खर्च शिक्षणावरच खर्च होतो.

त्यानंतर मनोरंजन खर्च. त्यात इंटरनेटचा खर्च. टीव्हीचा खर्च. चित्रपट, पुस्तके, खेळणी, सहली आणि आनंदासाठी केल्या जाणाऱ्या इतर सर्व खर्चाचा समावेश होतो. तो एकूण खर्चाचे 9 टक्के असतो. उर्वरित 22 टक्के खर्च हा कपडे, आरोग्य, अन्न, वाहतूक आणि इतर गोष्टींवर खर्च होतो.

खर्चाचे हे प्रमाण सर्वत्र आणि सर्वासाठी असंच असेल असं नाही. प्रत्येक कुटंबावर आणि ते पैसा कसा खर्च करतात यावर हा खर्च अवलंबून असतो. पण मागील काही वर्षांपासून मुलांवरील हा खर्च कशाप्रकारे वाढतोय ही गोष्ट नक्कीच लक्षात येते. मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबासाठी हा खर्च आगामी काळात वाढतंच जाणार आहे. सध्या LKG आणि UKG च्या प्रवेशासाठीही लाखो रुपयांची फी घेतली जात असल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. काळी वर्षापुर्ही या गोष्टीचा कुणी विचारही केला नसेल; पण ही गोष्ट आज वास्तव बनली आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon