Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

भाजी करताना या काही टिप्स वापरा

१. पीठ पेरून भाजी करताना डाळिचे पीठमध्ये किंचित हळद टाकून थोडेसे परतून मग भाजीत घेतल्यास भाजीचा स्वाद वाढतो आणि भाजी खमंग लागते.

२. गवारीची भाजी ही  खाताना उग्र लागते आणि हा उग्रपणा अनेकजणांना आवडत नाही,अश्यावेळी भाजीत गूळ आणि मीठ  घालताना थोडेसे एक ते दोन चमचे दूध घालावे भाजीचा उग्रपणा कमी होतो.

३. भरीत करताना त्याला थोडेसे तेल तेल लावावे आणि दोन तीन भोकं पाडावी यामुळे वांगे छान भाजले जाते. तसेच कधी-कधी वजनात योग्य बसावी म्हणून छोटी वांगी येतात आणि ही  छोटी वांगी भाजणे  कठीण जाते अश्यावेळी या वांग्याला थोडे तेल लावून कुकरमधून उकडून घ्यावीत 

४. घाईच्या वेळी कोबी चिरताना खूप वेळ जातो हा वेळ जाऊ नये म्हणून मोठी भोकं असलेली काकडी चोचायच्या किसणीने कोबी किसून घ्यावा. सारख्या प्रकारे किसाला जातोय आणि वेळ कमी लागतो. 

५. उकडलेल्या बटाट्या भाजीसाठी बटाटे उकडताना जास्त वाफेने बटाटे फुटतात असे होऊ नये म्हणून त्यात थोडं मीठ घालावे. 

६. कोशिंबिरी या फार लवकर खराब होतात या कोशिंबिरी लवकर खराब होऊ नये याकरता त्यात पोहे किंवा पोह्याचा चुरा करून घातल्यास  कोशिंबीर जास्त वेळ टिकते. 

७.बऱ्याच जणांना भाज्यांमध्ये नारळ घालायची सवय असते पण उन्हाळयात अश्या भाज्या लवकर खराब होतात अश्यावेळी भाजी करताना खोवलेलं नारळ फोडणीच्या वेळीच परतून घ्यावा आणि मग भाजी फोडणीला घालावी. 

८. कारल्याची भाजी करताना त्यात थोडी तुरटी घेतल्यास कडवटपणा कमी होतो.

९. कोणतीही फळभाजी करताना भाजी मिळून येण्यासाठी दाण्याच्या कुटाबरोबर मसुराची डाळ घेतल्यास भाजी मिळून येते. 

१०. भाजीत घालण्यास दाण्याचे कूट नसल्यास विशेषतः वांग्याच्या भाजीत चुरमुरे किंवा पोहे बारीक करून घालावे.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon