Link copied!
Sign in / Sign up
20
Shares

बेबी प्रॉडक्ट्स घेताना ह्या गोष्टींची खात्री करून घ्या


लहान बाळांसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांना वरवर पाहता आपल्याला त्यांच्यात कोणतेही हानिकारक घटक नाहीयेत असेच वाटते. ही उत्पादने बाळाच्या त्वचेसाठी असल्यामुळे ती सौम्य असतात असा आपला समज असतो. परंतु या प्रोडक्ट्सवर छापलेल्या त्यांच्यातील घटकसुचीत जर तुम्ही पहिले तर तुम्हाला अनेक केमिकल्स आढळून येतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही अनेक दिवसांपासून ही रसायने तुमच्या बाळाच्या त्वचेवर वापरत आहात.

आम्ही अशाच काही केमिकल्सची यादी इथे डेट आहोत जे या प्रोडक्ट्स मध्ये आढळून येतात.

१) बाथ शाम्पू

तुमचं बाळ घरभर रांगूते, हवे तेंव्हा शी करते तेंव्हा त्याची खास स्वच्छता तर करायलाच हवी. बाळाच्या अंघोळीसाठी आपण अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स वापरतो. यात बाथ शाम्पू, बेबी सोप यांचा समावेश आहे. अंघोळ घालतांना हे शाम्पू सौम्य आणि सुगंधित जरी असले तरी यात वापरला जाणारा सुवास हा आर्टिफिशीअल असतो. ही क्रृत्रिम सुगंधी द्रव्ये जी साबणाला चांगला वास यावा म्हणून वापरली जातात ती त्वचेसाठी घातक ठरू शकतात. यामुळे त्वचेवर अॅलर्जी किंवा एक्झिमा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या बाळासाठी अंघोळीचा साबण किंवा शाम्पू घेत असाल तर शक्यतो सुगंध नसलेले प्रोडक्ट निवडा.

२) बेबी लोशन

बाळाची नाजूक त्वचा संवेदनशील असते. या त्वचेला मुलायम आणि कोमल ठेवण्यासाठी बाजारात काही बेबी लोशन उपलब्ध आहेत. यामध्ये विटामिन तेलाचा वापर त्वचेला ओलावा देण्यासाठी केला जातो असे सांगितले जाते. परंतु हे विटामिन्स सिंथेटिक असतात. यास ‘रेटीनल पल्मिनेट’ असे म्हणतात. संशोधनांमधून असे समोर येते की हे लोशन लावलेले असतांना उन्हाच्या किरणांशी यातील सिंथेटिक विटामिन्सचा संपर्क आल्यास त्वचेचे आजार होऊ शकतात. लोशन घेतांना त्यातील घटक तपासून घ्या. नैसर्गिक घटक असलेल्या उत्पादनांना प्राधान्य द्या.

३) बेबी पावडर

बाळाची अंघोळ झाल्यावर डायपर घालुन झोपवण्याआधी त्याला पावडर लावणे गरजेचे असते, नाही का ? पावडर लावल्याने बाळाच्या त्वचेवरील जास्तीचा ओलावा शोषून घेतला जातो यामुळे त्वचा नॉर्मल आणि मऊ होते. हे कार्य त्यात असणाऱ्या सूक्ष्म टाल्कमुळे होते. परंतु टाल्कचा बाळाच्या फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो. यातून कॅन्सर सारख्या समस्या उद्भवू शकतात. बाळाची श्वसनक्रिया यामुळे बिघडू शकते. टाल्कचे सूक्ष्मकण सर्वाधिक बेबी पावडर मध्ये शक्यतो उपस्थित नसतात. परंतु विकत घेतांना तुमच्या खात्रीसाठी हे नक्की तपासून पहा.

४) बेबी वाइप्स

तुम्ही तुमच्या बाळाची त्वचा आणि अनेकदा त्याचा पुष्ठ्भाग बेबी वाइप्सने पुसता, बरोबर ? या वाइप्सचा वापर आजकाल खूप माता करू लागल्या आहेत. परंतु या वाइप्स मध्ये एक प्रोपिलेन गलीकोल’ नावाचा घटक असतो. यामुळे त्वचेवर जळजळ किंवा अॅलेर्जी सारख्या समस्या उद्भवतात. यातून कधी कधी श्वसन विकार देखील घडू शकतात. वाटर वाइप्स मध्ये ९८% पाणी असले तरीही याहून चांगले म्हणजे तुम्ही एका काॅटनच्या कपड्याने बाळाचे अंग साफ करण्याचा पर्याय निवडू शकता.

५) डायपर

डायपर मध्ये अनेक केमिकल्स उपस्थित असतात. जसे की, VOC, डायोक्सिंस, पॉलीयुरेथेन, चिटकवण्यासाठी वापरण्यात येणारे अडेसिव्हस्, लोशन , कृत्रिम सुगंधी द्रव्ये, आणि कीटकनाशकांचे रेसिड्यु. याच सर्व घटकांमुळे तुम्हाला डायपर सतत बदलत राहण्याचा सल्ला दिला जातो. कॉटनचे डायपर तुमच्या बाळासाठी सर्वात योग्य असतात. तुम्ही यांचा पुन्हा वापर देखील करू शकता आणि स्वस्त देखील असतात. शेवटी तुमच्या बाळाच्या काळजीसाठी तुम्ही उत्तम तेच निवडणार आहात !

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon