१) तुमच्या चेहऱ्यावर जर डाग आणि सन टॅन असेल तर त्यासाठी लिंबू मास्कचा वापर चेहऱ्यावर करा. आणि ह्याकरिता बटाटा आणि अर्धा लिंबू घ्या. बटाटय़ाची पेस्ट तयार करा. त्यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस घाला. आणि हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने त्याला धुवा.
२) चेहऱ्याच्या सुंदरतेला डोळ्याजवळची काळी वर्तुळ अडथळा ठरतात तेव्हा त्यासाठी काकडी आणि कोरफडच्या गरापासून तयार केलेला मास्क डोळ्याजवळच्या काळ्या वर्तुळावर लावायचा. तसेच यामुळे चेहऱ्यावरील छिद्रेही मोकळी होतात. काकडीची पेस्ट करून त्यामध्ये २ चमचे कोरफडीचा गर घाला. ह्या तयार केलेल्या थराचा मोठा थर लावा. व काही वेळाने गार पाण्याने धुवून घ्या.
३) तजेलदार आणि चिरतरुण त्वचेकरिता एक पिकलेलं केळ कुस्करून घ्या. त्यामध्ये एक चमचा दही घाला. याचे जाडसर मिश्रण चेहऱ्याला लावा. १५ मिनिटे थंड पाण्याने धुवा.
४) हळदीमध्ये अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म आहे. त्यामुळे त्वचेवरील काळपटपणा, डाग आणि ऍ नष्ट होण्यासाठी हळद आणि मधाचा मास्क उपयुक्त आहे. हळदीत मध मिसळून १५ मिनिटे चेहऱ्याला लावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवा.
सोपे सोपे उपाय आणखी जाणून घेण्यासाठी tinystep.in मराठीवर जा.
