Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

जास्त वेळ लघवी अडवून ठेवताय ? हे वाचा

बऱ्याच जणांणा लघवी वेळेवर न करता जास्त वेळ थांबवून ठेवण्याची सवय असते. पण त्यामुळे मूत्रमार्गात जीवाणू संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मूत्रमार्गावर परिणाम होऊ शकतो. मूत्राशयात लघवीतील जंतू जास्तवेळ थांबून राहिल्यामुळे हा आजार उद्भवू शकतो.

१. मुतखडा (किडनी स्टोन) 

 ज्या लोकांना मुतखडा झालेला असतो, त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हे लघवी थांबवून ठेवणे हेच असते. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे. मुतखडा हा अतीव यातना देणारा रोग आहे. मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थामुळे मुतखडा होतो. लघवीच्या मार्गात जमा झालेले सोडिअम किंवा कॅल्शिअम नियमितपणे शरीराबाहेर न पडल्यास किडनी स्टोन होतो.

२. ओटीपोटीचे स्नायू कमजोर होऊ शकतो.

जर तुम्ही लघवी येवूनही मूत्राशयात जास्त वेळ थांबवून ठेवत असाल, तर तुमच्या ओटीपोटीतील स्नायू कमजोर व्हायला सुरूवात होते. मूत्रमार्गातून लघवी सोडताना किंवा थांबवून ठेवताना स्नायूंची विशिष्ठ पद्धतीने हालचाल होते. पण तुम्ही नेहमीच जास्त काळ लघवी थांबवून ठेवत असाल, तर तुम्हाला ओटीपोटीचा त्रास होऊ शकतो.

३. लघवी करताना जळजळ होणे

महिलांमध्ये ही समस्या प्रामुख्याने जाणवते. लघवी करताना मुत्राशयाच्या वॉल्सना जळजळ होते. त्यामुळे मूत्रमार्गात खूप वेदना होतात. लघवी खूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते.

४.  मूत्राशयावर सूज येणे

आपले मूत्राशय साधारणपणे पंधरा पौंड (15 X 23.35 ग्रॅम) मूत्र साठवून ठेवू शकते. जर तुम्ही दररोज आठ ग्लास पाणी पीत असाल, तर तुमच्या मुत्राशयात 64 पौड मूत्र जमा होते. त्यामुले जर तुम्ही शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वारंवार पाणी पिणार असाल, तर तितक्या जास्त वेळा लघवीलाही जाणं आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या मूत्राशयावर सूज येऊ शकते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon