Link copied!
Sign in / Sign up
63
Shares

बाळाच्या त्वचेवर पुरळ आल्यास काय करावे-आणि काय करू नये ?


लहान बाळांना येणारे चेहेऱ्यावरील पुरळ ही खूप सामान्य बाब आहे. जवळपास ४०% बाळांना ही समस्या उद्भवते. बाळ २ ते ४ आठवड्यांचे असतांना हे पुरळे येतात. बारीक बारीक आकाराचे पांढरे किंवा लाल पुरळ किंवा फोडे बाळाच्या चेहेऱ्यावर आणि अंगावर येतात. अनेकदा यांना उपचार न घेताच ही पुरळे आपोआप जातात. परंतु तुम्ही बाळाच्या मुलायम आणि तजेलदार त्वचेसाठी काही काळजी आणि उपायांचा अवलंब करू शकता.

बाळाच्या त्वचेवर पुरळ येण्याची कारणे 

१.या पुरळांचे विशिष्ट असे काहीच एक कारण देता येत नाही. अनेकदा याचे कारण आईद्वारे गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात बाळाच्या शरीरात गेलेले संप्रेरक असू शकतात.

२.तुम्ही जर स्तनपान देत असाल तर प्रसूती नंतर घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे बाळाला हे होऊ शकते.

३.तुम्ही जे बेबी प्रोडक्ट्स तुमच्या बाळासाठी वापरत आहात त्याच्या अॅलेर्जी मुळे सुद्धा हे होऊ शकते.

काय करावे- काय करू नये ?

१. बाळाच्या अंगावर येणारी पुरळे ही अस्वच्छतेमुळे येणारी नाहीत. बाहेरील वातावरणातील धूळीचा इथे संबंध नाही, त्यामुळे बाळाच्या त्वचेला स्क्रब करू नका. स्क्रब केल्याने त्वचा अजून लाल होईल आणि अजून पूरळे येतील.

२. बाळाच्या त्वचेसाठी जी काही उत्पादने तुम्ही वापरणार आहात ती काळजीपूर्वक निवडा. कोणतेही क्रीम किंवा लोशन निवडतांना योग्य तेच निवडा. तुम्ही जे लोशन सध्या वापरात आहात त्याऐवजी ओईल-फ्री लोशन वापरून बघा. काही चांगला फरक जाणवल्यास ते वापरणे सुरु ठेवा.

३. सोबतच रसायनांचा जास्त वापर असणारी उत्पादने वापरणे टाळा. शक्यतो बाजात उपलब्ध असणारी हर्बल उत्पादने वापरा.

४. बाळाच्या नाजूक त्वचेसाठी सौम्य साबण किंवा शाम्पू वापरा. आणि त्याचे अंग पुसण्यासाठी देखील मुलायम टॉवेलचा वापर करा. बाळाची त्वचा अतिशय नाजूक व पातळ असते.

५.  बाजारात मोठ्यांच्या वापरासाठी असणारी उत्पादने बाळाच्या पूरळांसाठी अजिबात वापरू नका. जरी ही पुरळे मोठ्यांच्या पूरळांसारखी दिसत असली तरीही बाळाच्या नाजूक त्वचेवर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो.

६. पूरळे फोडू किंवा दाबून त्यातील पाणी काढू नका. याने परिस्थिती अजून खराब होईल.

अनेकदा पालकांना ही पूरळे सारख्याच लक्षणांमुळे त्वचेविषयक समस्या आहेत असे वाटत असते. जसे की ,मिलिया, ज्यात त्वचेवर पांढरे फोड येतात. बाळाला येणारी पुरळे ही छोटी छोटी लाल फोडे असतात. तर मिलिया मध्ये चेहेऱ्यावरील छिद्रे उघडी राहून येणारे व्हाईटहेड्स उद्भवतात. या दोन्ही वेगळ्या समस्या आहेत. बाळाच्या त्वचेवर लाल रंगाची एखादी रॅश देखील येऊ शकते. परंतु रॅश मुळे खाज येते व आग देखील होते. पूरळे रॅश पेक्षा वेगळी असतात.

जरी बाळाच्या त्वचेवरील पुरळ आपोआप कमी होत असतात तरीही जर तुम्हला अती प्रमाणात पुरळे किंवा सूज आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा. ही एक गंभीर समस्या असू शकते.

या समस्येच्या बाबतीत तुम्हाला धीर धरणे अतिशय आवश्यक आहे. पुरळ एखाद्या आठवड्यात किंवा महिनाभरात जाऊ शकतात. तुमच्या बाळाच्या त्वचेची योग्य काळजी घेणे तुमच्या हातात आहे. स्वच्छता आणि योग्य उत्पादनांची निवड बाळाच्या त्वचेला निरोगी आणि मुलायम ठेवू शकते.            

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon