Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

तान्ह्याच्या टाळू भरण्याबद्धल दोन वेगवगेळी मते. . . . . .

     बाळाचं वजन जन्मत: अडीच किलोपेक्षा जास्त असेल, त्याला सहा महिने केवळ मातेचं दूध मिळालं असेल आणि सहा महिन्यांनंतर मातेच्या दुधाबरोबरच वरचा घरगुती आहार दिला तर कोणत्याही टॉनिकची गरज नाही.

१) लहान बालकांची सतत वाढ होत असते. ही वाढ होण्यासाठी त्यास अनेक प्रकारचे पोषकांश मिळणे आवश्यक असते. पण त्याबरोबरच बालकांच्या मानसिक विकासाचा सुद्धा विचार करावा लागतो. तान्हाची टाळू दररोज सकाळ - संध्याकाळ नियमितपणे भरली पाहिजे. यासाठी वापरायचे तेल हे कोमट असले पाहिजे. गार तेलाचा खूप काही फायदा होत नाही. अशा प्रकारच्या टाळू भरण्याने तान्ही शांत झोपत असतात. त्यांची किरकिरी सुद्धा कमी होऊन जाते. ह्या शांत झोपेमुळे पचनशक्ती सुधारून जाते. टाळू भरण्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

 

पण ह्यामध्ये काही आईंचे असे म्हणणे आहे की,

२) बाळाला आंघोळ घालताना टाळू भरावी का? मुळीच गरज नाही. किंचित कोमट खोबरेल तेलाची हळुवार मालीश हाता-पायांना झाली तरी बस. वेगळ्या बालतेलाचीही गरज नाही. टाळू तेलाने थापला नाही तरी पुढचा टाळू दीड वर्षांत व मागचा तीन वर्षांत आपसूकच भरून येतो. आंघोळी आधी तेल लावले तर ते सौम्य साबणाने धुऊन टाकले पाहिजे.

ह्या दोन्हीपैकी कोणती गोष्ट करावी ह्याबाबत तुमचे जेही मत असेल ते सांगा.

बाळाच्या अंघोळीच्या वेळी

३) आंघोळीसाठी डाळीचे पीठ, साय वगैरे वापरू नये. काही जण पिठाने रगडून बाळाच्या अंगावरची नाजूक लव काढण्याच्या प्रयत्नात बाळाच्या त्वचेला इजा करतात. यामुळे बाळाच्या डागांवर पुरळ येतील. बेबी पावडर कोणती वापरावी? कोणतीही नाही? म्हणजे गरज नाही. तरीही वापरायची झाल्यास पावडर नाका-तोंडात जाऊ नये ही काळजी घ्यावी, नाही तर बाळांना अ‍ॅलर्जी होते.

डेटॉल आदीच्या पाण्यात कपडे धुणे किंवा आंघोळीच्या पाण्यात डेटॉल आदी घालणं गरजेचं नाही. बाळाचे कपडे वेगळे धुवावेत. शी-शूचे कपडे स्वच्छ करून वेगळे भिजवावेत. साबणाने घासून स्वच्छ करावेत. उन्हात वाळविले तर उत्तम पण नाहीतर कपडे ओलसर न ठेवता पूर्णपणे वाळवून घ्यावेत.

टाळू भरण्याविषयी दोन मते आहेत तेव्हा तुमच्या मते कोणते योग्य की, दोन्ही. ह्याविषयी नक्कीच सांगा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon