Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

जन्मावेळच्या बाळाचे वजन कमी होते ? ही त्यामागची सात आश्चर्यजनक कारणे असू शकतात

प्रत्येक आईला वाटत असते की, तिचे बाळ निरोगी जन्मावे. आणि बाळांच्या निरोगीपणाचे पहिले लक्षण म्हणजे त्यांचे जन्मावेळचे वजन होय. अडीच किलोग्रॅम पेक्षा कमी असलेले वजन हे साधारणपणे 'कमी वजन' मानले जाते; तर दीड किलोग्रॅम पेक्षाही कमी असलेले वजन हे 'आत्यंतिक कमी वजन' मानले जाते. इतके कमी वजन असलेल्या बाळांना संसर्ग, श्वसनाचा त्रास, मज्जासंस्थेचा आणि तसेच जठरांतर्गत त्रासाचा धोका वाढतो.

जन्मवेळच्या कमी वजनामागची काही कारणे पुढीलप्रमाणे

नियोजित वेळेअगोदरचा (प्रिटर्म) जन्म

गर्भारपणाच्या 37 आठवड्यांअगोदरच जन्मणाऱ्या बाळाला 'अविकसित बाळ' असे संबोधले जाते. असे बाळ गर्भात भरपूर काळ न राहिल्यामुळे त्याचे वजन वाढत नाही; म्हणून त्याचे वजन साधारण बाळांपेक्षा कमी असते.

जुळे

जर मातेच्या गर्भात जुळे, तिळे किंवा अजून जास्त बाळे असतील; तर त्यांचे वजन कमी असण्याची शक्यता भरपूर वाढते. अनेक प्रसूतींमुळे गर्भाशयावरचा ताण भरपूर वाढतो, कारण पोषणतत्त्वे बाळांमध्ये विभागली जातात; ज्यामुळे त्या सर्वांची वजने कमी होतात.

मद्याचे सेवन

गरोदरपणामध्ये मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन हे अतिशय घातक असते, कारण त्यामुळे प्लॅसेंटामध्ये रसायने उत्सर्जित होतात; ज्यामुळे बाळाला मिळणारा ऑक्सिजन भरपूर प्रमाणात कमी होतो. यामुळे बाळाची वाढ खुंटू शकते.

IUGR

ज्या बाळाची गर्भाशयात पूर्णवेळ वाढ झाली आहे अशा बाळाचेही 'इंट्रायुटेरिन ग्रोथ रिस्ट्रीक्शन' मुळे वजन कमी होऊ शकते. असममित IUGR हा गर्भारपणातील उच्च रक्तदाब किंवा जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा परिणाम असतो. सममित IUGR हा मूत्राशयातील संसर्ग, गुणसूत्रांमधील दोष आणि जीवनशैलीमुळे घडतो.

मधुमेह

पुष्कळ वेळा नियोजित वेळेअगोदरच्या जन्माचा संबंध गर्भारपणातील मधुमेहाशी जोडण्यात येतो. याचा परिणाम बाळाचे वजन कमी होण्यात होतो. गरोदरपणातील मधुमेह हा योग्य आहार, व्यायाम आणि औषधांनी नियंत्रित करता येतो. म्हणून तुमच्या बाळंतपणाच्या गरजेनुसार तुमच्या जीवनशैलीत बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रि-एक्लॅम्प्शीया

ही उच्च रक्तदाबामुळे घडून येणारी गर्भारपणातील एक अवस्था आहे आणि याचा परिणाम किडनीचे नुकसान होण्यात होतो. प्रि-एक्लॅम्प्शीया किंवा प्लॅसेंटावर परिणाम करणारी दुसरी कोणतीही अवस्था ही बाळाला रक्ताच्या आणि पोषकद्रव्यांच्या अनियमित पुरवठ्यामुळे निर्माण होते; ज्यामुळे नंतर बाळाचे वजन कमी होते.

संसर्ग

अशक्त झालेल्या रोगप्रतिकारकशक्ती मुळे गर्भवती महिलांना संक्रमक संसर्ग होण्याचे प्रमाण भरपूर असते. जेव्हा या संसर्गांवर योग्य उपचार केले जात नाहीत; तेव्हा गर्भारपणात काही अडचणी वाढू शकतात आणि त्यांतीलच एक म्हणजे वजन कमी होणे!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon