बाळंतपणाचा ताप (याला प्युरपेरल फिव्हर किंवा चाईल्डबेड फिव्हर असेही म्हणतात) हा एक प्रकारचा संसर्ग आहे, जो गर्भाशयावर परिणाम करतो. जरी वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे आणि स्वच्छताविषयक रीतींमुळे हा आता दुर्मिळ रोग झालेला आहे; तरी मातांच्या मृत्यूंमागचे हे एकेकाळचे सामायिक कारण होते. जर या संसर्गाने रक्तप्रवाहावर परिणाम केला; तर प्युरपेरल सेप्सीस (पू) होऊ शकतो.
पूर्वी साबण, हातमोजे यांसारख्या मूलभूत स्वच्छतेच्या वस्तूंचा अभाव असल्याकारणाने या तापाचा लगेचच प्रसार व्हायचा. सामान्यतः हा संसर्ग 'स्ट्रेप्टोकोकस पायोजीन्स' या विशिष्ट जिवाणूंमुळे होतो. आजही हा ताप अस्तित्वात आहे; पण सुदैवाने प्रतिजैविकांच्या मदतीने तो बरा होण्याजोगा आहे. प्रसूतीनंतर विशेष सावधानी घेतल्यास या रोगाची लागण टाळता येते.
१) चाईल्डबेड फिव्हरची लक्षणे

ज्यांना या रोगाची लागण झालेली आहे, त्यांना सामान्य तापाबरोबरच भुकेचा अभाव, डोकेदुखी आणि सर्दी यांचाही त्रास होतो. तसेच गर्भाशयाला सूज आल्यामुळे ओटीपोटातदेखील तीव्र वेदना चालू होतात. योनीतून येणारा दुर्गंधीयुक्त स्त्राव हेही या तापाचे सामान्य लक्षण आहे.
ज्यांची सिझेरियन प्रसूती झालीय, अशा स्त्रियांना नैसर्गिक प्रसूती झालेल्यांच्या तुलनेत चाईल्डबेड फिव्हरचा जास्त धोका असतो. ऍनिमिया झालेल्या, लठ्ठ आणि तरुण स्त्रियांमध्ये चाईल्डबेड फिव्हर होण्याचे प्रमाण अधिक असते. ज्यांची दीर्घ प्रसूती झालीय आणि प्रसूतीनंतर जास्त रक्त वाहून गेलेय, अशांनाही चाईल्डबेड फिव्हर व्हायची जास्त शक्यता असते.
३) चाईल्डबेड फिव्हर वरचे उपचार

चाईल्डबेड फिव्हर बरा करण्याकरता डॉक्टर एका प्रकारचे मौखिक प्रतिजैविक घ्यायला सांगतात. क्लिंडामायसिन आणि जेन्टामायसिन ही यांतीलच काही प्रतिजैविके होत. अशी प्रतिजैविके ही त्या त्या प्रकारच्या संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंविरुद्ध उपचार करण्याकरता दिली जातात.

३) अनेक शतकांपर्यंत चाईल्डबेड फिव्हरमागचे कारण अज्ञात होते. कारण जरी डॉक्टर यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असले; तरी स्त्रियांना वाटायचे की अदृश्य शैतानी शक्तींनी पछाडल्यामुळे हा रोग होतो.
४) या रोगाचा शेवटचा उद्रेक तेव्हा झाला; जेव्हा एका भुलतज्ज्ञाचा हात गुलाबाच्या झुडुपावर खरचटला गेला. बहुधा त्याने त्याचा हात रक्त आल्यानंतर साफ केला नसावा आणि त्या खुल्या जखमेतून संसर्गाचा बाकी लोकांमध्ये फैलाव झाला.
