Link copied!
Sign in / Sign up
45
Shares

बाळंतपणात अंतर का ठेवायला पाहिजे ?

कालच एका आईने प्रश्न विचारला की, मला अगोदर दोन मुले झाली आहेत. आणि त्या मुली झाल्या आहेत. आणि कुटुंबाची इच्छा आहे की, आता मुलगा होण्यासाठी तू प्रयत्न कर. तर ही समस्या महाराष्ट्रातच नाहीतर पूर्ण भारतात आहे. प्रत्येकाला मुलगा पाहिजे असतो पण त्याचवेळी कुणालाच हा विचार येत नाही की, त्या जन्म देणाऱ्या स्त्रीला ह्यामुळे किती त्रास होईल. तिला काय काय समस्या येतील. तिचे शरीर तितके मजबूत आहे का ? ती आणखी गरोदरपण सहन करू शकते. असा काहीच विचार न करता तुम्ही तिला बाळंतपण साठी आग्रह करतात. तेव्हा ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ की, दोन बाळंतपणात अंतर किती ठेवायला हवे. आणि ह्या सर्व गोष्टीविषयी महत्वाची माहिती.

१) अनेक बाळंतपणे होणे, दोन बाळंतपणांमध्ये फार कमी अंतर असणे किंवा वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वर्षानंतर गर्भधारणा येणे राहणे ह्यामुळे स्त्रियांचे जीवन संकटात सापडते व किमान एक तृतीयांश अर्भकांचे मृत्यू ओढवतात.

स्त्रिया व मुलांचे आरोग्य सुधारण्याचा अतिशय सबळ उपाय म्हणजे कुटुंबनियोजन. विकसनशील देशांमधील 100 दशलक्षांपेक्षा ही अधिक स्त्रिया सांगतात की त्यांनी गर्भनिरोधक साधनांची मागणी केल्यास त्यांच्या नवऱ्याकडून किंवा संबंधित पुरुषाकडून ती पुरवली जात नाही.

२) वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वयानंतर होणाऱ्या गर्भधारणेमुळे आई व तिच्या मुलाच्या आरोग्यास असणारे धोके वाढतात.

३) आई व मुलाचे आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता, दोन मुलांमध्ये किमान दोन वर्षांचे अंतर असावे. चार बाळंतपणांनंतर गर्भधारणा व मुलाच्या जन्मामधील धोका वाढतो.

४) दोन मुलांमधील अंतर दोन वर्षांपेक्षा कमी असल्यास बालमृत्यूचे प्रमाण जवळजवळ 50 टक्क्यांनी वाढते. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकाच्या आरोग्यास व वाढीस असलेला सर्वांत मोठा धोका म्हणजे नवीन बाळाचा जन्मक. कारण त्यामुळे ह्या पहिल्या बालकास मिळणारे आईचे दूध कमी होते किंवा थांबतेच. शिवाय त्याला आवश्यक असलेले विशेष अन्न तयार करण्यासाठी किंवा आजारपणामध्ये त्याची काळजी घेण्यासाठी आईला वेळच मिळत नाही. परिणामस्वीरूप, वयात दोन वर्षांपेक्षा अधिक अंतर असलेल्या सख्ख्या भावंडांच्या तुलनेमध्ये, पाठोपाठ जन्मलेल्या मुलांची शारीरीक किंवा मानसिक विकास पूर्ण होत नाही.

५) मागील बाळंतपणामध्ये गमावलेली ताकद भरून येण्याआधीच एखाद्या स्त्रीस पुन्हा गर्भ राहिल्यास जन्माला येणारे मूल अपुऱ्या दिवसांचे व कमी वजनाचे असण्याची बरीच शक्यता असते. कमी वजनाच्या ह्या बालकाची पुढील वाढ ही खुंटते, ते जास्त वेळा आजारी पडते व इतर सर्वसामान्य वाढीच्या मुलांच्या तुलनेमध्ये पहिल्या वर्षातच दगावण्याची ही शक्यता अधिक असते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon