Link copied!
Sign in / Sign up
29
Shares

बाळंतपणाची तारीख केव्हा येते आणि त्याच्या कळा कशा ओळखायच्या ?

सर्वच गरोदर स्त्रियांना प्रश्न पडतो की, बाळंतपण नेमके कधी येईल त्याची तारीख काय असेल. त्याबद्दल एक ब्लॉग अगोदरच प्रकाशित केला आहे, आणि त्याविषयी आणखी माहिती मिळाल्यावर ती देण्याचा प्रयत्न. आणि गरोदर स्त्रीसाठी हा दिवस पुनर्जन्मच असतो. त्यासाठी तिला ह्या दिवसाचे महत्व खूप आहे. तेव्हा त्याविषयी जाणून घेऊ.

१) गरोदरपणाची सूचना मासिक पाळी चुकण्यावरून मिळते. गेल्या मासिक पाळीचा पहिला दिवस निश्चित करा व त्यावेळीची (तिथी, वार, तारीख) नोंद करून घ्या. या तारखेपासून अंदाजे 280 दिवस, म्हणजे नऊ मराठी महिने आणि दहा दिवस झाल्यावर प्रसूती होते. उदा. पाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा) हा शेवटच्या पाळीचा पहिला दिवस धरला तर मार्गशीर्षाच्या शेवटी नऊ मराठी महिने पूर्ण होतात. पुढच्या महिन्यात म्हणजे पौषाच्या दहाव्या दिवशी बाळंतपणाची तिथी येईल.

२) इंग्रजी महिने मोजायचे असल्यास पूर्ण नऊ महिने व सात दिवस मोजावे लागतात. इंग्रजी महिन्याची तारीख आठवत असल्यास पुढचे नऊ महिने व सात दिवस मोजावेत. उदा. शेवटच्या पाळीचा पहिला दिवस एक जानेवारी असल्यास आठ ऑक्टोबरला बाळंतपणाची 'अंदाजे' तारीख असेल. गेल्या पाळीची तारीख महत्त्वाची आहे.

३) या हिशेबात सर्वसाधारणपणे एखादा आठवडा मागे-पुढे होतो. तसेच पाळीच्या तारखा, तिथी नीट न आठवल्याने हिशेब चुकू शकतो. पण तिथी, महिना बरोबर आठवल्यास साधारण अंदाज करता येतो. सोबत तारीख दिलेल्या कॅलेंडरच्या मदतीने पाळीच्या तारखेवरून बाळंतपणाची संभाव्य तारीख काढता येईल. 

४) बाळंतपणाच्या कला या बाळंतपणाच्या अगोदर १० ते १२ तास सुरु होतात. त्या सुरुवातीला १० ते १५ मिनिटाच्या अंतरा-अंतराने व पुढे पुढे लवकर लवकर येऊ लागतात. त्या पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून आतून येतात. पोटदुखीच्या वेळी जे पोट दुखते ते वेगळे असते. त्याच्या कळा अंतराअंतराने येत नाही. तसेच त्या वेदना पोटाच्या बाजूला असतात. हा फरक नीट लक्षात घ्यावा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon