Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

तुमच्या बाळांमध्ये मूत्रमार्गातील संसर्ग (युटीए) कशामुळे होतो?


प्रामुख्याने मुलांमध्ये मूत्रमार्गातील संसर्ग हा जिवाणूंमुळे होतो. हे जिवाणू मूत्रमार्गा पर्यंत जातात. हे सामान्यतः मोठ्या आतड्यातील जिवाणूंमुळे होते जे विष्ठेत असतात.

सामान्य लक्षणे : हे कायम लक्षात ठेवा की, तुमच्या मुलांना याची लक्षणे ओळखणे व ती नीट सांगणे कठीण जाते. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा आणि त्यांना जर का लघवी करताना त्रास होत असेल तर त्यांना हा संसर्ग झाला आहे की नाही हे तपासा. तुमच्या मदतीसाठी, पुढे काही लक्षणे दिली आहेत जे यूटीआय सूचित करतात 

- ताप येणे

- उलट्या होणे

- लघवी करताना चिडचिड करणे

- योग्य प्रमाणात वजन न वाढणे

- लठ्ठपणा वाढणे

- भूक न लागणे

- त्वचेचा रंग पिळवटसार दिसणे

मुलांना मूत्रमार्गातील संसर्ग कसा होतो?

तुमच्या मुलाला मूत्रमार्गातील संसर्ग झाला आहे किंवा नाही हे चांगल्या आणि अधिक विशिष्ट पद्धतीने ओळखण्यासाठी, त्याची / तिची लक्षणे खाली नमूद केलेल्या मुद्द्यांशी तुलना करा.

जर मूत्रमार्गातील संसर्ग झाला असेल, तर तुमच्या पाल्याला या पैकी अनुभव येऊ शकतो :

- लघवी करताना त्यांना दुखते किंवा जळजळ जाणवणे

- लघवी करते वेळी तुमचे मुलं अक्षरशः रडायला लागते आणि त्यांना लघवी करताना असुविधा होते जसे कि त्यांच्या गुप्त भागात जळजळ होयला लागते.

- त्यांच्या गुप्त भागा जवळ सारखी खाज सुटते.

- लघवी करण्याच्या सवयी मध्ये बदल होतो.

- लघवीला खूप दुर्गंध येणे.

- पोटात दुखणे.

- लघवी करताना फेस येणे.

- लघवी करताना रक्त पडणे.

तुमच्या पाल्याला मूत्रमार्गातील संसर्ग झाला आहे हे तुम्हाला कसे कळेल?

जर का लघवी करताना तुमच्या मुलामध्ये वर नमूद केल्या प्रमाणे लक्षणे दिसत असतील आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगितली की,ते निश्चित सांगू शकतात की तुमचे निरीक्षण बरोबर आहे की नाही.

तुमचे डॉक्टर तुमच्या निरीक्षणांचा अभ्यास करून, प्रयोगशाळेत लघवीच्या काही चाचण्या करून निश्चित सांगू शकतील की तुमच्या मुलाला मूत्रमार्गातील संसर्ग आहे का लघवी पोटात किंवा मूत्राशयात साठून राहतीये.

तुमच्या मुलांना मूत्रमार्गातील संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही कशी काळजी घ्याल?

खाली काही गोष्टी नमूद केल्या आहेत याचा अवलंब केला तर तुमच्या मुलांना मूत्रमार्गातील संसर्ग होण्या पासून तुम्ही वाचवू शकता.

१) बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्या 

 बद्धकोष्ठतेमुळे गुदाशयात इ.कोली नावाच्या जिवाणूंची संख्या खूप वाढते, हे जिवाणू मूत्रमार्गापर्यंत पसरतात आणि यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. जर तुमच्या बाळाला सहा महिन्या पर्यंत योग्य स्तनपान दिले नसेल तर त्याला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तरी बद्धकोष्ठता होते.

२) स्वच्छता राखा 

तुमच्या मुलांना त्यांचे गुप्त भाग कायम स्वच्छ ठेवायला शिकवा आणि प्रोत्साहित करा. हे पुढून ते मागे पर्यंत करायला हवे, यामुळे जिवाणूंना मूत्रमार्गात जाण्यापासून आपण अडवू शकतो.

३) तुमच्या मुलांच्या शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवा 

हे अतिशय महत्त्वाचे आहे कि तुमच्या मुलांच्या शरीरातील पाण्याची पातळी उच्च असायला हवी. जर का तुमचे मुलं योग्य प्रमाणात द्रवपदार्थ घेत नसेल तर संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

४) स्तनपान 

बाळाला ६ महिन्यांपर्यंत फक्त स्तनपानच द्या. आईच्या दुधामुळे बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, यामुळे त्यांचा अश्या संसर्गांपासून बचाव होतो. स्तनपानामुळे बद्धकोष्ठतेचा धोका देखील कमी होतो.

५) लघवीला अडवून ठेवू नका 

लघवी अडवून ठेवल्यामुळे किंवा वेळोवेळी न करण्यामुळे देखील संसर्ग होण्याचा धोका संभावतो. दर वेळी जेव्हा तुमची मुले लघवी करायला जातील तेव्हा हे संसर्ग पसरवणारे जिवाणू वाहून जातील.

६) कॉटनच्या लंगोटाचा वापर करा 

 कृत्रिम (सिंथेटिक) कापडाच्या लंगोटाचा वापर टाळा. कृत्रिम कपड्यांमुळे जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. थोड्या सैल आणि आरामदायी कॉटनच्या लंगोटाचा वापर करा. ओले झाले की बाळाचे डायपर आणि लंगोट लगेच बदला.

७) गरम शेक देऊन त्यांच्या वेदना कमी करा 

 या संसर्गामुळे मुलांना खूप वेदना होऊ शकतात. गरम शेक देऊन आपण त्यांच्या या वेदना कमी करू शकतो. हे करत असताना या गोष्टीची काळजी घ्या कि हि गरम शेकायची पिशवी किंवा पॅड तसेच त्वचेवर ठेवून शेक देऊ नका, त्या पॅड खाली एखादे स्वच्छ कापड घ्या आणि त्यावरून हे पॅड फिरवा यामुळे त्यांना नाजूक भागांवर चटका बसणार नाही.

८) वैद्यकीय मदत घ्या 

 खूप अस्वस्थ वाटत असेल तर लगेच डॉक्टरांची मदत घ्या. तुमचे डॉक्टर तुमच्या बाळावर पूर्ण लक्ष केंद्रित करून त्याला होणारा त्रास कसा कमी होईल आणि आजाराचे योग्य निदान होऊन त्यावर योग्य उपचार देखील होतील याची काळजी घेतील.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon