Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

बाळांमध्ये होणारे कफ्रूट : कारणे, लक्षणे आणि उपचार

        कफ्रुट म्हणजेच ‘कृप’ ज्यात लहान बाळांच्या स्वरयंत्रांना सूज येते. यात स्वरयंत्रात असलेली कंठातील पोकळी (लारेक्स) आणि श्वासनलिका (ट्रकिया) यांना इजा होते. या सुजेमुळे कॉर्ड अरुंद होऊन बाळांना श्वास घेण्यास त्रास होतो. याचाच परिणाम म्हणून गंभीर खोकला होतो.

     क्रुप हा जास्त करून वय वर्षे ५ व त्याखालील बाळांना होतो. मुलींपेक्षा मुलांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त असते. बाळाचे स्वरयंत्र विकसित होण्याच्या प्रक्रीयेदरम्यान हे होते. एकदा क्रुप झाले असल्यास ते परत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जास्त करून थंडीच्या दिवसात ह्याचे प्रमाण जास्त दिसून येते.

ह्याची कारणे :

क्रफुट होण्याची मुख्यत्वे २ कारणे असू शकतात. एक म्हणजे सामान्यपणे होणारे व्हायरल इन्फेक्शन. ज्याप्रमाणे सर्दी होते त्याचप्रमाणे ह्याची सुरवात होते. नंतर हा खोकला थोडा वाढून खरखरीत होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. इतर इन्फेक्शन प्रमाणेच ह्याचा हवेद्वारे शरीरात प्रसार होतो. म्हणून बाळ पूर्णपणे बरे होईपर्यंत त्याला घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये.

दुसरा प्रकार म्हणजे शीघ्र खोकला. यात बाळ अचानक खोकायला लागते. कधी कधी मध्य रात्री सुद्धा खोकला येतो. पोटातील घटकांमुळे हा शीघ्र खोकला येतो असे म्हटले जाते. ताप येणे हे याचे मुख्य लक्षण असते.

ह्याची लक्षणे :

क्रुप होण्यापूर्वी आधी बाळाला सर्दी होते. सर्दी झाल्यास सर्वप्रथम तुम्ही सामान्य सर्दीशी संबंधित सर्व तपासण्या करून घ्या. अजून एक लक्षण म्हणजे बाळाचा आवाज खाकारल्या सारखा होतो. सोबतच खोकला येऊन तो सामान्य खोकल्याच्या आवाजासारखा नसतो तर खालच्या घशातून कोरडा खोकला येतो म्हणजेच भुकल्यासारखा त्याचा आवाज असतो. दुसरे लक्षण म्हणजे ‘स्ट्राईडोर’ यात स्वरयंत्रातील अडथळ्यामुळे आवाज बदलतो. कधी कधी बाळ श्वास घेतांना तुम्हाला हा वेगळा आवाज जाणवेल. तुमच्या लहानग्याला थोडासा ताप आल्याचेही तुम्हाला जाणवेल.

ह्यावर उपचार :

- सूज कमी करण्यासाठी बाळाला थोडीशी थंड व मोकळी हवा मिळणे गरजेचे आहे. तुम्ही बाळाला रात्री फिरण्यास नेऊ शकता. हवा श्वासनलिकेत व्यवस्थित जावी म्हणून बाळाला शक्यतो आडवे झोपवण्यापेक्षा सरळच ठेवा.

- तुम्ही वाफ देऊन सुद्धा बघू शकता किंवा त्यांना वाफेच्या खोलीत घेऊन जा. ही प्रक्रिया जास्त वेळ घेऊ शकते. दरवेळी खोकला आल्यास वाफ देणे हे एक काम होऊन बसते.

- बाळाला अॅन्टीबायोटिक्स देणे टाळा. कारण यामुळे सूज वाढू शकते. क्रुपच्या खोकल्यासाठी घरगुती उपायच जास्त परिणामकारक ठरतात.

- शारीरिक स्वच्छता महत्त्वाची आहे. हे इन्फेक्शन मुळे पसरते त्यामुळे काळजी घ्या. 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon