Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

बाळांमधील मेलॅटोनीन : त्याचा दोष आणि दुष्परिणाम


 जे हार्मोन्स तुमच्या शरीराला विश्रांती आणि आराम करण्यास प्रवृत्त करतात; त्यांना मेलॅटोनीन- 'द स्लीप हार्मोन्स' असे म्हणतात. हे तुमची शारिरीक दिनचर्या नियंत्रित करतात आणि तुम्हाला दीर्घकाळपर्यंत झोपण्यात आणि ताजेतवाने होऊन उठण्यात मदत करतात. हे तुमच्या प्रकाशाशी आणि अंधाराशी असलेल्या संपर्कानुसार तुमचा झोपण्याचा आणि जागे होण्याचा क्रम निश्चित करतात. जर तुमचे शरीर पुरेशा प्रमाणात मेलॅटोनीन निर्माण करण्यात असमर्थ ठरत असेल; तर मेलॅटोनीनचे बाह्य सेवन करणे अनिवार्य ठरते.

मानवी शरीरातील मेलॅटोनीनची निर्मिती

जेव्हा तुमचे बाळ पहिल्यांदा प्रकाशाच्या सानिध्यात येते; तेव्हा ती किरणे डोळ्यांच्या पडद्यातून जातात आणि SCN (सुप्रा कैझ्माटिक न्यूक्लिअस) पर्यंत पोहोचतात आणि त्याला कार्यरत करतात. ते हायपोथॅलॅमस या मेंदूच्या भागामध्ये उपस्थित असते. ते शरीराला तापमान, हार्मोन्स आणि इतर क्रिया नियंत्रित करण्याचे संकेत देते. ते बाह्य प्रकाश अथवा काळोखाच्या प्रमाणानुसार तुमच्या बाळाला जागे ठेवते वा त्याला झोप आणते; आणि ते चोवीस तासाच्या चक्रामध्ये एक नियोजित झोपण्याची आणि जागे होण्याची दिनचर्या निश्चित करते.

मेलॅटोनीनची निर्मिती ही पायनियल ग्रंथींमार्फत होते आणि ते तुमच्या बाळाच्या झोपण्याच्या वेळेनुसार रात्री साधारणपणे नऊ किंवा त्याअगोदर रक्तप्रवाहामध्ये सोडले जाते. परंतु जर ते अपुऱ्या प्रमाणात सोडले गेले अथवा सोडलेच गेले नाही; तर तुमच्या बाळाला झोपण्याचा त्रास होऊ शकतो आणि त्याला बाह्य मेलॅटोनीनचे सेवन (सप्लिमेंट्स) करावे लागू शकते.

मेलॅटोनीनचे दुष्परिणाम

जरी मेलॅटोनीन हे एक नैसर्गिक हार्मोन असल्यामुळे आणि तात्कालिक असल्यामुळे ते निर्धोक वाटत असले; तरी ते सप्लिमेंट्सच्या रूपात घेतल्यामुळे खालील दुष्परिणाम संभवू शकतात.

- दिवसा झोपेची गुंगी येणे

- झोपेत नकळत लघवी होणे

- चिडखोर स्वभाव होणे

- डोकेदुखी

- ग्लानी येणे

- पोटदुखी

- मळमळणे

- ठळक (स्पष्ट) स्वप्ने पडणे

- शरीराचे तापमान खूप कमी होणे

- जुलाब

- बाकी औषधांबरोबर त्याची अभिक्रिया होऊ शकते (उदा. फ्लूओक्झामाईन, कार्बामाझेपाईन, ओमेप्राझोल, एसोमेप्राझोल, इत्यादी)

मेलॅटोनीन हे रक्तस्त्रावाचा विकार, डायबिटीज, जास्त रक्तदाब आणि फेफरे येणाऱ्या बालकांना देऊ नये. अशावेळी मेलॅटोनीनची सप्लिमेंट्स घेणे हे परिस्थितीला आणखी बिघडवू शकते.

डोस

सध्यातरी या मेलॅटोनीन सप्लिमेंट्सचे निश्चित असे किती डोस घ्यावेत, हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून तुमच्या बाळाला मेलॅटोनीनची सप्लिमेंट्स देण्याअगोदर एकदा तुमच्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. तो तुम्हाला तुमच्या बाळाच्या बाळाच्या वजन, वय वा झोपेच्या समस्येनुसार मेलॅटोनीनची आदर्श मात्रा ठरवून देईल. ते झोपेच्या विकारासाठी साधारणपणे ०.५ mg ते ६ mg पर्यंत असू शकते.

कोणत्याही रासायनिक औषधाप्रमाणेच मेलॅटोनीनची सप्लिमेंट्स देखील मानवी शरीरातील आवश्यक प्रमाणापेक्षा भरपूर जास्त प्रमाणात हार्मोन्सची मात्रा वाढवू शकतात. १ mg ते ३ mg पर्यंतचा साधारण डोस हा शरीरातील मेलॅटोनीनचे प्रमाण वीस पटीपर्यंत वाढवू शकतो! म्हणून जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते सप्लिमेंट्स तुमच्या बाळाला देण्याचा विचार करत असाल; तर ते ०.५ mg पेक्षा जास्‍त न देण्याची सावधानी बाळगा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon