Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

बाळांना अन्न चावायला असे शिकवा


मुलांना वरचे खाद्यपदार्थ खाण्यास दिल्यानंतर नवनवीन पदार्थांच्या चवी दाखवणे, प्रत्येक पदार्थ कशा प्रकारे खायचा हे शिकविणे गरजेचे असते. सर्व अन्न पदार्थ चांगल्या प्रकारे चावून खाल्ले तरच नीट पचन होते. ही सर्व कौशल्ये मुलांना कशी शिकवाल याची थोडक्यात माहिती घेऊ

मुलांशी नेहमी संयमाने वागा

लहान मूल हे नेहमी शिकण्याच्या प्रक्रियेत असते. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी अत्यंत संयमाने वागण्याचा प्रयत्न करा. लहान मुलांना शिकविण्यासाठी थोडा वेळा लागतो. लहान मुलांची अन्न चावण्याची प्रक्रिया आणखी सुधारण्यासाठी हसत मुखाने आणि शांतपणे शिकविणे आवश्यक असते.

पुन्हा पुन्हा ही यशाची किल्ली आहे

मुलांना एखादा पदार्थ खाण्यास दिल्यानंतर सातत्याने सूचना केल्यास या पुनरोच्चारातून ते शिकतात. ही एक चांगली पद्धत आहे. हसत-खेळत मजेदार पद्धतीने अन्न चावण्याची प्रक्रिया शिकवा. सुरवातीला काही दिवस मऊ, बारीक केलेले अन्न खाण्यास द्यावे.

कल्पक खेळ निवडा

खेळातून मुलांना शिकायला मिळते. या पद्धतीतून ते आनंदाने शिकतात. मुलांच्या अन्न पदार्थ चावण्याच्या प्रक्रियेची मजा घ्या. मुलांना बरोबरीने चावणे, चघळणे या प्रक्रिया कशा करायच्या हे दाखवा. मुलांना कोणतीही नवी गोष्ट शिकवताना शब्दांपेक्षा कृतीतून चांगल्या प्रकारे शिकवा. खेळता खेळता त्यांना मोजायला शिकवा. एका चांगली सवय लावण्यासाठी खेळताना मोजायला शिकवा.

सुरवात अत्यंत हळू-हळू करा

सुरवातीला एकाच नवीन पदार्थ नीट खाण्यास शिकवा. ही एका नवी प्रक्रिया असल्याने त्यात परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी मुलाला थोडा वेळ द्या. एकच पदार्थ नीट खाण्यास शिकविल्याने ती एक चांगली सुरवात ठरेल. सुरवातीचे काही दिवस त्यांना आवडतील अशा पदार्थांची निवड करून ते खाण्यास दिल्याने ते चांगले एन्जॉय करतील आणि प्रत्येक पदार्थ चावून खाण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. फळांचे काप, सॅलडच्या फोडी, भात या गोष्टींपासून सुरवात करणे योग्य ठरेल. त्यानंतर भाज्या आणि पोळी देण्यास सुरवात करावी.

मुलांना प्रोत्साहन द्या

मुलांना प्रोत्साहन देणे ही मुलांना प्रेमाने शिकवण्याची गुरुकिल्ली आहे. मुलांना प्रत्येक पदार्थ व्यवस्थित चावून खाण्यासाठी प्रोत्साहन द्या.हे मुलांच्या दीर्घ आणि कायम स्वरुपीच्या चांगल्या लक्षणासाठी तुमची प्रेरणा महत्वाची भूमिका बजावते. कौतुक केल्यावर मुलाला चांगली सवय लावण्याची शक्यता आहे. चघळणारे अन्न, चाऊन खाण्याची प्रक्रिया ही एकदा मूलभूत गोष्टी सुरु झाल्यानंतर ती एक आजीवन सवय होते. प्रत्येक पदार्थ चाऊन खाणे पचन यंत्रणेसाठी किती महत्वाचे आहे हे विसरू नये. योग्य चघळण्याची सवय देखील मूल शांत प्रभावाचे एक लक्षण आहे. भविष्यात अति खाण्याचे नियमन करण्यास मदत करते. थोडेसे धैर्य आणि प्रोत्साहन दिल्यास आई-वडील आयुष्यभर निरोगी राहण्याची सवय विकसित करू शकतात.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon