Link copied!
Sign in / Sign up
32
Shares

बाळाला वरचे दूध पाजताना काय काळजी घ्याल ?


बाळाला साधरणतः कमीत कमी ६ महिने तरी वरचे दूध पाजू नये आईचे दूधच पाजावे कारण हे दूध बाळाच्या आरोग्यासाठी अमृताचे काम करत असते. बाळाला ज्या वेळी तुम्ही वरचे दूध पाजायला सुरवात कराल त्यावेळी कश्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत काही साधारण माहिती देणार आहोत.

बाळाला दूध कसे पाजाल 

बाळाला शक्यतो वरचे दूध वाटी -चमच्याने पाजावे. बाळाला वरचे दूध पाजण्याआधी दुधाची गुणवत्ता तपासून पहा दूध चांगले असले तरच ते बाळास योग्य ठरेल. गायीचे दूध सुरु करताना पहिल्या महिन्यातच दोन भाग दूध, एक भाग पाणी असे प्रमाण असावे. (प्रत्येक बाळाची पचन शक्ती वेगवेगळी असते त्यामुळे हे प्रमाण डॉक्ट्रांच्या सल्ल्याने ठरवावे)दूध म्हशीचे असेल तर एक भाग दूध, एक भाग पाणी असावे. एक महिन्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी करावे. साधारणतः पावडरचे दूध पाजू नये पण पर्याय नसल्यास त्यात योग्य प्रमाणातच पाणी टाकले पाहिजे,अधिक पाणी टाकून पातळ करू नका. वरचे दूध पाजताना स्वच्छतेबद्दल आणि गुणवत्ते बाबत जागरूक रहा नाहीतर बाळाला जुलाब होण्याची शक्यता असते.

बाटलीने दूध पाजताना या गोष्टी लक्षात ठेवा

जर काही कारणाने बाळ चमचा-वाटीने दूध पित नसेल किंवा तुम्हांला दूध पाजायला जमत नसेल तर दुधाच्या बाटलीचा पर्याय निवडावा

बाटली चांगली असावी

जास्त गरम दूध बाटली मध्ये भरू नये.

शक्यतो बाळाला मांडीवर घेऊनच दूध पाजावे.

बाटली धरताना बुचामध्ये दूध भरलेलं असेल अशी धरावी .

बाटलीच्या बुचाची छिद्रे लहान मोठी असू नये.

भरलेली दुधाची बाटली उलटी केल्यावर थेंब-थेंब दूध खाली पडले पाहिजे. जर दुधाची धार जोरात बाहेर येत असले तर बाळाला ठसका लागू शकतो

दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन पाठीवरून हात फिरवावा.

बाळाने ढेकर दिल्यावरच त्याला आडवे करावे .

ढेकर न देता तसेच झोपवल्यास बाळाला उलटी होण्याची शक्यता असते.


बाटलीची स्वच्छता 

काही कारणांमुळे शक्य नसल्यास बाटलीने दूध पाजावे लागत असल्यास बाटली आणि त्याच्या बुचाची योग्य ती स्वच्छता राखणे गरजेचे असते अन्यथा बाळाचे पोट बिघडण्याची शक्यता असते. बाटली व बूच दोन्ही साबण आणि ब्रशने स्वच्छ धुवावे. बुचाचा चिकटपणा जाण्यासठी, बुचाला मीठ लावून ते चांगले चोळावे.

एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात बाटली व बूच उकळून घ्यावे. बाटली उकळत्या पाण्यात टाकू नये. त्यामुळे ती फुटण्याची/प्लॅस्टिकची असल्यास वितळण्याची शक्यता असते. प्लॅस्टिकच्या बाटलीत देखील वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी गरम पाण्याने न वितळणारी बाटली घ्यावी प्रत्येकवेळी बाळास दूध पाजल्यानंतर बाटलीची स्वच्छता करावी. 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon