Link copied!
Sign in / Sign up
194
Shares

बाळाला दिवसातून किती वेळा पूरक आहार द्यावा


१)  महिन्यानुसार आहार 

६ ते ९ महिने – २ वेळा

९ ते १२ महिने – ३ ते ४ वेळा

दुसऱ्या वर्षातसुद्धा आईचे दूध हा बाळाच्या पोषक आहारातील महत्त्वाचा घटक असतो. त्यापासून बाळाचे पोषण व संरक्षणही होते. बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवावे. ठराविक कालांतराने बाळाचे वजन, उंची व शरीराची इतर मोजमापे नियमितपणे घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणात होत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते. वाढ योग्य होत नसल्यास त्या दृष्टीने तपासणी करून अयोग्य वाढीची कारणे शोधून काढता येतील. ५ वर्षापर्यंत बालकाची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.

२) आहार वयोगटानुसार बाळाचा आहार

० ते ६ महिने : फक्त स्तनपानच दयावे.

६ ते ९ महिने : भाताची पेज, डाळीचे पाणी, मटणाचे सुप, नाचणीची किंवा डाळ, तांदळाची पेज, फळांचा रस दयावा.

९ ते १२ महिने : वरण, भात, उकडलेला बटाटा दुधात कुस्करून, पोळी दुधात बारीक करून, फळे दयावे.

१ वर्षानंतर : घरात जेवणासाठी जे तयार केलेले पदार्थ असतील. तेच थोडे कमी तिखट करून या वयातल्या मुलांना देता येते.

३) बाळाला सुरुवातीला कोणता वरचा आहार दयावा ?

सहा महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबरच बाळाला वरच्या आहाराची गरज पडते. सुरुवातीला भाज्यांचे सूप, वरणाचे पाणी, वरचे दूध, फळांचा रस, शहाळ्याचे पाणी, टोमाटोचा रस असा पातळ आहार दयावा. त्यानंतर भाकरी/पोळी मऊ करून त्यात वरणाचे किंवा भाज्यांचे पाणी किंवा दूध घालून दयावे. भातावर वरण किंवा भाजीचे पाणी घालून दयावे. उकडलेला बतात, रताळे, गाजर, अंड्याचा पिवळा बलक, हेही अधून मधून द्यावं. पुढे-पुढे सर्व प्रकारची फळे, गव्हाची खीर, भाकरी, पोळी, पालेभाज्या, मोड आलेली उसळ, उकडलेले अंडे असा आहार दयावा. वर्षभरात इतरांप्रमाणे सर्व आहार बाळाला मिळाला पाहिजे. 

४) चमच्याने आहार देण्याविषयी 

शक्यतो वाती चमच्याने वरचे दूध बाळाला पाजावे. काही कारणांमुळे शक्य नसल्यास बाटलीने दूध पाजण्यास हरकत नाही. बाटली व बूच दोन्ही साबण आणि ब्रशने स्वच्छ धुवावे. बुचाचा चिकटपणा जाण्यासठी, बुचाला मीठ लावून ते चांगले चोळावे.एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात बाटली व बूच उकळून घ्यावे. बाटली उकळत्या पाण्यात टाकू नये. त्यामुळे ती फुटण्याची शक्यता असते. प्रत्येकवेळी बाळास दूध पाजल्यानंतर बाटली उकळून घ्यावी. शक्य असल्यास घरात १-२ बाटल्या बुचे जास्त असावीत म्हणजे ऐनवेळी अडचण येत नाही.

५) कोणते दूध कसे घ्यावे 

बाळाला वरचे दूध वाटी -चमच्याने पाजावे. दुधाच्या बाटलीने पाजू नये. गायीचे दूध सुरु करताना पहिल्या महिन्यातच दोन भाग दूध, एक भाग पाणी असे प्रमाण असावे. दूध म्हशीचे असेल तर एक भाग दूध, एक भाग पाणी असावे. एक महिन्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी करावे. ( दूध केंद्रावर मिळणारे दूध पाजावयास हरकत नाही.) पाजण्यापुर्वी कोणतेही दूध चांगले उकळून घेतले पाहिजे. ( पावडरचे दूध असेल तर त्यात योग्य प्रमाणातच पाणी टाकले पाहिजे, अधिक पाणी टाकू नये.) वरचे दूध पाजताना स्वच्छतेबद्दल दक्षता घ्यावी नाहीतर बाळाला जुलाब होण्याची शक्यता असते.

६) बाटलीने दूध पाजताना घ्यायची दक्षता 

बाटलीने दूध पाजताना बाळाला मांडीवर घ्यावे. बाळाचे डोकं डाव्या कोपऱ्यावर थोडेसं उंच ठेवावे. शक्यतोवर बाळाला मांडीवर दूध पाजावे. बाटली अशा तऱ्हेने धरावी की बुचामध्ये दूध भरलेलं असेल. दूध फार गरम असू नये. दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन पाठीवरून हात फिरवावा. बाळाने ढेकर दिल्यावर त्याला झोपवावे. ढेकर न देता तसेच झोपवल्यास बाळाला उलटी होण्याची शक्यता असते. बुचाचे छिद्र बरोबर नसल्यास ( लहान किंवा फार मोठे ) बाळाला दूध पिण्यास त्रास होतो. बुचाचं छिद्र मोठे असल्यास बाळाला ठसका लागण्याचा संभव असतो. दुधाची भरलेली बाटली जात उलटी केली तर दूध थेंबाथेंबाने गळले पाहिजे. त्याची धार लागता कामा नये.

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon