Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

बाळाला वरचे दूध ह्या प्रकारे पाजावे !


खूप आईंकडून प्रश्न विचारला गेला की, बाळाला वरचे दूध कसे पाजावे ? आणि ह्याबाबत बऱ्याच आईंना दूध येत नाही, काही आई जॉबवर असल्यामुळे बाळाला अनिवार्य पणे वरचे दूध पाजावे लागते, आणि काही आईचे दूध बाळाला पुरेसे होत नाही. तेव्हा ह्या सगळ्या कारणांसाठी बाळाला वरचे दूध पाजावे लागते. ह्या ब्लॉगमधून वरचे दूध कसे पाजता येईल त्याविषयी …

१) बाळाला दूध पाजताना तुम्ही जेही दूध घेतले असेल जसे की, फॉर्मुला किंवा गाईचे. तर वाटी आणि चमचा घेऊन बाळाला दूध पाजावे. बऱ्याचदा खूप माता बाटलीने दूध पाजता पण बाटली ने दूध पाजल्यामुळे इतर समस्या तयार होतात जसे की, त्याला बाटलीची सवयच लागते.

२) वाटी आणि चमचा घेताना ते वेगळे ठेवावेत ह्या वाटी आणि चमच्याला उकळत्या पाण्यात चांगले उकळून घ्यावे. बाळाला ह्यामुळे डायरिया, गॅस, कफ, सर्दी ह्यांसारखे विकार होत नाहीत. कारण बाटलीमुळे जंतुसंसर्ग होण्याचा जास्त चांन्स असतो.

३) खूप आई बाटलीच वापरता कारण त्यांना आळस येतो. कोण दररोज गरम पाण्यात वाटी आणि चमच्याला धुणार. पण ह्याबाबत थोडासाही आळस करू नका.

४) बाळाला दर २ ते ३ तासांनी दूध पाजावे. आणि जर बाळाला भूक लागलीच तर पाजावे.

५) बाळाला गाईचे दूध पाजत असाल तर गाईचे दूध वेगळे तापवावे आणि पाणी वेगळे तापवून, दूध अर्धे आणि गरम पाणी अर्धे असे एकत्र करून घ्यावे. आणि त्यात थोडी साखर घालावी जेणेकरून बाळाला थोडी तर चव लागेल. आणि साखर घालताना तिला स्वच्छ करावी.

६) हे दूध तापवत असताना त्यात वावडिंग आणि ओवा टाकू शकता. ह्याचा फायदा बाळाला दूध पचण्याला होईल.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon