बाळाला स्तनपान करता येत नाही कारण आईला दूध येत नसते. आणि काही आईंच्या स्तनात खूप कमी दूध येत असते आणि तितक्या दुधामध्ये बाळाचे पोट भरत नाही. आणि बाळाला वरचे दूध, फॉर्मुला दूध द्यावे लागते. आणि बाळाला वरचे दूध देताना ते आईच्या दूधप्रमाणे हलके, सकस, आणि पचणारे पाहिजे. म्हणून आपल्याकडे बाळाला गाईचे दूध दिले जाते कारण गाईचे दूध हे हलके व पचणारे असते. आणि जर बाळाला तसे दूध दिले नाही तर बाळाला ते दूध पचत नाहीच पण त्यामुले इतर त्रासही बाळाला व्हायला लागतात जसे की, खूपच शी होणे, उलटी होणे.
२) ज्या बाळाचे वय दोन महिन्यांपेक्षा जास्त नसेल त्याला गाईचे दूध चांगले उकळून थंड करू द्यावे. त्यातून साय काढून घ्यायची. वाटल्यास त्याचे असे प्रमाण ठेवावे. एक कप दूध घ्यावे त्यात पाव कप पाणी टाकावे आणि त्यात एक चमचा साखर टाकून वाटी चमच्याने पाजावे. ह्यात पाणी हे उकळलेलं असावे. कारण पाणी उकळूनच घ्यावे.
साखर टाकण्याबाबत बराच गैरसमज आहे. वरून साखर टाकण्यामुळे जंत वैगरे होतात. पण आईच्या दुधातच नैसर्गिक साखर असते. त्यामुळे बाळालाही साखरेची चव लागून गेली असते.
जसे जसे दिवस जातील तसे बाळाच्या दुधात पाण्याचे प्रमाण कमी करावे. पावडरचे दूध देता येईल. पण ज्याप्रमाणे त्या डब्यावर प्रमाण लिहले असेल तसेच दूध द्यावे. आणि तुम्हाला फॉर्मुला मिल्क किंवा पावडरचे दूध परवडत नसेल तर गाईचे दूध देऊ शकता. कारण पावडरचे दूध चांगलेच महाग असते.
३) बाळाला व्यवस्थित दूध पाजावे नाहीतर बाळ कुपोषित राहून जाते. त्याच्या अंगी लागत नाही. वाटल्यास ह्यासाठी म्हणजे स्तनपानाच्या पद्धती समजून घ्याव्यात. जेणेकरून बाळाचे कुपोषण होणार नाही. आणि बाटलीने दूध पाजत असाल तर प्रत्येक वेळी बाटलीला स्वच्छ धुवून टाकावी. कारण त्यामधून बाळाला जुलाब, अतिसार होण्याची जास्त शक्यता असते.
४) बाळाला सहा महिने झाल्यावर तुम्ही त्याला वरचा आहार देऊ शकता. सुरुवातीला वरणाचे पाणी, सहाव्या महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबर पूरक अन्न म्हणून वरचे अन्न सुरू करावे.प्रथम भाताची घट्ट पेज, वरणाचे घट्ट पाणी यात पालक, करडई, गाजरे, कोबी यांसारखी कुठलीही भाजी पूर्ण शिजवून त्यात मीठ किंवा साखर घालून मऊ करून भरवावी.
५) फळाचा संत्री, मोसंबी, पिकलेले केळे, आंबा, चिक्कू, द्राक्षे रस किंवा गर काढून रोज अर्धी वाटी भरून द्यावा.
चमच्याने घट्टसर (खिरीसारखे) पदार्थ भरवायला सुरुवात करताना चमचा जिभेच्या टोकाला लावू नये, जिभेच्या मागल्या भागात ठेवावा. नाही तर बाळ जिभेने चमचा ढकलून देते किंवा पदार्थ थुंकून टाकते.
एका वेळी एकाच नव्या पदार्थाची चव लावावी. तो पदार्थ नीट पचतो आहे किंवा नाही हे बघून नवा पदार्थ द्यावा. या वयातच सर्व अन्नपदार्थाच्या चवी लागणे महत्त्वाचे असते.
६) सहा महिन्यांनंतर बाळाच्या योग्य वाढीसाठी आणि बाळाचे पूर्ण पोषण होण्यासाठी वरचा आहार सुरु करून द्यावा. आणि काही बाळ हे काही महिन्यानंतर दूध सोडत नाही. वरचा आहार ते खातच नाही. तेव्हा ह्यादिवसापासूनच बाळाला वरचा आहार सुरु करावा.
७) बाळाची जावळ झाल्यानंतरच वरचे अन्न सुरू करणे हे कुपोषणाचे एक कारण आहे. काही माता व काही परंपरा सुद्धा पाळतात पण ह्यामध्ये बाळाला तुम्ही कुपोषित करत असतात तेव्हा असे करू नका. त्यासाठी महिन्यानंतर हळूहळू वरणभात खूप मऊ करावा, तांदळाची खीर, नाचणीची खीर, खिचडीसुद्धा करू शकता ती फिकी फिकी असावी, उकडलेला बटाटा स्मॅश करा, चपाती, भाकरी आणि घरात जो स्वयंपाक होईल तो ही देऊ शकता.
८) बाळाला फळंसुद्धा तुम्ही देऊ शकता. पेरू, आंबा, केळी द्या. पण ते स्मॅश करूनच द्या. अशा प्रकारे आहारातील पदार्थ हळूहळू वाढवत न्यावेत. एक वर्षाच्या बाळाने अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वर्षभरानंतर दुधाचे प्रमाण कमी करावे. दिवसातून फक्त दोन किंवा तीन वेळाच दूध द्यावे व वरचे अन्न वाढवावे.
९) बाळाचे दात ८ महिन्यानंतर यायला लागतात त्यावेळी रोज नाचणीची दूध, गूळ घालून खीर सुरू करावी. नाचणीत भरपूर कॅल्शियम असते. पौष्टिक खीर करण्याची एक सोपी पध्दत आहे. 1 कप तांदूळ + अर्धा कप हरबरा डाळ + अर्धा कप शेंगदाणे हे सर्व भाजून भरडून ठेवावे. गरजेप्रमाणे या भरडयात दूध व गूळ घालून खीर तयार करता येते. तांदळाऐवजी नाचणी चालते.
