Link copied!
Sign in / Sign up
53
Shares

तुमच्या बाळाला शी व शु करण्याची ट्रेनिंग कशी द्यावी

तान्हे बाळ हे खूप गमतीशीर असते. त्याला तुम्ही कितीही सांगा तो त्याच्या आवडीनुसार आणि सवडीनुसारच गोष्टी करतो. आता शी करण्याचीच गोष्ट घ्या. त्याला कितीही सांगा तो ऐकत नाहीच. आणि खरं म्हणजे बाळ लहान असल्याने त्याला ट्रेनिंग द्यावी लागेल. ह्याविषयी अगोदर ब्लॉग/लेख लिहिलाच आहे. हा ब्लॉग त्याचा पुढचा म्हणता येईल. आणि बाळाला शी करण्याची ट्रेनिंग देणे तितके सोपे नाहीच. त्यासाठी तुम्हाला खूप संयम आणि धीर ठेवावा लागेल.

१) बाळाला शी आल्यावर बाळ स्वतःच टॉयलेट मध्ये जाईल आणि स्वतः शी करेल त्यासाठी बाळाला मम्मीची गरज वाटणार नाही. पण कोणत्या वयात बाळ ही ट्रेनिंग घेऊ शकतो म्हणजे त्याच्या वयानुसार. तर अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रिकस ह्यांच्या म्हणण्यानुसार, बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढण्यानुसार आहे. बाळाला अडीच वर्ष झाल्यावर तुम्ही शी करण्यासाठी स्वतःच टॉयलेटला कसे जावे. ह्याची ट्रेनिंग देऊ शकता. पण भारतात त्या अगोदरच शी करण्याचे शिकून असतो. नाही शिकत असेल तर तुम्ही त्याला ट्रेनिंग देऊ शकता.

२) असे कोणते लक्षणे असतात की, बाळ आता शी साठी ट्रेनिंग तयार आहे

* बाळ आता बाथरूम किंवा टॉयलेट मध्ये जायला जाण्यासाठी उत्साह दाखवत असेल तर

* बाळ आता खूप डायपर ओली करत नसेल किंवा आता अचानकपणे शी करत नसेल म्हणजे आता तो स्वतःच्या शी आणि शु वर कंट्रोल करायला लागला आहे.

* आता त्याची शी करण्याची वेळ बांधली गेली असेल तर

* आता बाळाला कुठेही शी व शु करायला आवडत नसेल तर

* बाळ आता ओली डायपर किंवा पॅन्ट सहन करत नसेल तर

* आता तो स्वतःहून सांगायला लागला असेल की, मला शु ला जायचे आहे

३) बाळाला शी ची ट्रेनिंग

* योग्य वेळ घ्या - बाळ रडत नसेल, झोपेतून नुकताच उठला नसेल. आणि तुमच्याकडे खूप वेळ हवा ह्या ट्रेनिंगसाठी.

तुम्हाला ह्यासाठी एक आठवडा द्यावा लागेल. आणि त्यात खंड पडणार नाही त्यासाठी तुमचे पुढचे प्लॅन रद्द करून टाका.

* आता त्याला ज्याही वेळी शु लागेल किंवा शी लागेल तेव्हा त्याला टॉयलेटला घेऊन जा. हातात धरून बाळाला तसेच घेऊन जा. ह्यात तुमची साडी किंवा कपडे खराब होतील पण त्याची फिकीर करू नका. बाळाला ह्याची जाणीव असेल.

* बाळाने जर जिथे बसला असेल तिथेच शु केली त्याला थोड्या मोठ्या आवाजात सांगा की, इथे शी करायची नाही तर टॉयलेट ला जावे. ह्याबाबत तुम्ही त्याला / तिला बंब्या किंवा तुमच्या भाषेतलं नाव देऊन ओरडू शकता.

* ज्यावेळी त्याने तूम्हाला शी करण्याचा सिग्नल दिला की, लगेच त्याला घेऊन टॉयलेटला बसा. आणि सकाळी तो उठल्यावर त्याला अगोदर टॉयलेटला घेऊन बसा. आणि त्याला सांगा की, कर आता शी. ह्यामुळे त्याला दररोजची सवय लागेल. आणि ह्या गोष्टी त्यालाही कळतील. मग त्याला हळूहळू सवय होईल.

४) बाळाची शी आणि शु ह्या गोष्टी खूप सामान्य आहेत. म्हणजे जर एखादे बाळ ह्या सवयी लागण्यासाठी खूप वेळ घेत असेल तर काही हरकत नाही. म्हणून त्याच्या अंगावर खूप ओरडू नका. आणि इतरांनी त्याबद्दल तक्रार केली तर मनाला लावून घेऊ नका. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon