Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

बाळाला शांत आणि पुरेशी झोप मिळावी म्हणून हे करा.

झोप व्यक्तीच्या दिवसातील सर्वात महत्वपूर्ण भागांपैकी एक आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा कामासाठी तयार होण्यासाठी आपल्या मेंदूला थोडा वेळ लागेल. आणि आरामाची गरज असते. आपल्या मेंदूलाच नव्हे तर आपल्या संपूर्ण शरीर आणि इतर अवयवांनाही तो विश्रांती देतो. लहान मुलांचे देखील असेच असते . परंतु, बाळांना नेहमी रात् दिवसाची संकल्पना समजत नाही आणि म्हणून ते काही दिवस संपूर्ण दिवस झोपतात आणि संपूर्ण रात्र रडत असतात. परंतु, काही विश्रांती मिळविण्यास मदत करण्यासाठी आपण काही उपाय करू शकता. ते कोणते ते आपण पाहणार आहोत

१. बाळाला जवळ घेऊन झोपा.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे मुले त्यांच्या पालकांसह झोपतात,त्यांना एक प्रकराची सुरक्षितता जाणवते आणि आणि त्यांना कोणत्याही प्रकारची भीती जाणवत नाही. आईच्या जवळ बाळाला सुरक्षित आणि उबदारपणा जाणवतो आणि मुलास सहजतेने झोप येण्यास मदत होते. तसेच यामुळे आईला तिच्या मुलाकडे लक्ष ठेवता येते. त्यास त्याला काही हवे नको ते बघता येते.

             २. झोपेच्या आधी गरम पाण्याने अंघोळ घाला

संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की बाळाला झोपेच्याआधी कोमट पाण्याने आंघोळ घेतल्यास त्यांना झोप येण्यास मदत होते. या विश्रांतीमुळे, योग्य वेळी योग्य झोप मिळण्यास त्यांना मदत होईल. आपल्या छोट्याश्या बाळाला योग्य झोप मिळाल्यामुळे त्याचा वाढीसाठी हे उपयुक्त ठरते.

३. आरामदायक कपडे घाला.

रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला आरामदायक कपडे हवे असतात तसे, तुमच्या लहान मुलाला कपडे बदलण्याची आवश्यकता असते हळूहळू, जेव्हा आपण त्यांना एका विशिष्ट वेळेस वेगवेगळ्या कपडे घालू लागता तेव्हा ते झोपेच्या वेळा ओळखू लागतील, आणि स्वतःचे वेळापत्रक तयार करण्यास सुरुवात करतील.यामुळे सोयीस्कर असलेल्या कपड्यांमध्ये त्यांना योग्य झोप मिळेल.

४. दिवे बंद ठेवा.

बाळांना दिवसाच्यावेळी झोपताना कधी-कधी दिवे चालू ठेवले तर हरकत नाही पण रात्री आणि आणि शक्य असेल त्यावेळी बाळ झोपताना त्या खोलीतले लाईट बंद ठेवल्यास त्यांना शांत आणि आरामदायक झोप लागेल

५. दुपट्यात गुंढाळून झोपवा.

बाळाला दुपट्यात गुंढाळून झोपवल्यामुळे त्याला वाटते की आपल्या आईचं आपल्या जवळ घेतले आहे. त्याला त्या उबेमुळे सुरक्षित वाटते आणि आई जवळ असल्याचा भास होतो. आणि हा भास बाळाला रात्रभर शांत झोप येण्यास मदत करतो. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon