Link copied!
Sign in / Sign up
88
Shares

बाळाला सहा महिने झाल्यावर....

बाळाला सहा महिने झाल्यावर त्याला पूरक आहार द्यायला सुरुवात करता येते. आणि ह्याबाबत खूप आईंचे म्हणणे असते की, स्तनपानावर बाळाचे पूर्ण पोट भरत नाही. आणि ह्या दिवसात बाळाला योग्य पौष्टिक आहार मिळायला हवा. खूप आईंना हा प्रश्न पडतोच की, माझ्या बाळाला आता सहा महिने पूर्ण होतील तेव्हा त्याला कोणकोणता आहार द्यायला हवा. तुमच्या घरी अनुभवी व्यक्ती असेल तर काही समस्या येत नाही. बाळाला सहा महिने झाल्यावर बाळाची वाढ वेगाने व्हायला हवी. आणि त्यामुळे ह्या महिन्यात कोणत्या गोष्टी बाळाच्या बाबतीत होत असतात जसे की, ह्या महिन्यात बाळाला शी ची समस्या येते. बाळाबाबत ह्या गोष्टी जाणून घ्यायल्या हव्यात. tinystep मराठीवर जन्मापासूनचे लेख आहेत आता सहा महिन्यानंतर होणारी बाळाची वाढ ह्यावरती. 

बाळ सहा महिन्यानंतर - baby after six months

१) सहा महिन्यानंतर पूरक आहे द्या

२) बाळाला ह्यावेळी खाऊ कसे घालायचे ?

३) बाळाला स्मॅश/कुस्कुरून पदार्थ द्या

४) माझे बाळ उजवे आहे की डावे ?

५) माझे बाळ चपाती/पोळी खाऊ शकते ना ?

६) बाळाचा शी पॅटर्न

७) माझे बाळ केव्हा रांगायला लागेल

८) दात ह्या महिन्यात यायलाच पाहिजे का ?

सहा महिन्यानंतर पूरक आहे द्या

बाळाची शारीरिक स्थिती पूरक आहार घेण्यासाठी तयार झालेली असते. म्हणजे तो आता काही पूरक आहरामधील अन्नपदार्थ पचवू शकतो. तरी सुद्धा बाळ खूप जास्त खाणार नाही म्हणून त्याला थोड - थोडं खाण्याची सवय लावावी. कदाचित तो फक्त एक चमचा खाईल आणि पुन्हा खाणार नाही. आणि स्तनपान च मागेल. म्हणून तुम्ही बाळाला खाऊ घालण्यासाठी संयम ठेवावा.

 बाळ आईला कोणत्या गोष्टी देते - ह्याविषयी वाचू शकता  -  https://www.tinystep.in/blog/janmanatar-bal-aaila-kahi-ascharykarak-goshti-dete--xyz

बाळाला ह्यावेळी खाऊ कसे घालायचे ? baby food 

 बाळाला कुस्करून घरातले पदार्थ द्यावीत. तुम्ही घरात जो स्वयंपाक केला असेल त्यात जे खूप तिखट आणि खूप गोड नसेल साधे असेल असे बाळाला द्या. आता बाळाला तो पदार्थ कशा पद्धतीने गिळायचा हेच माहिती नसते पण त्याच्या तोंडात घास घातल्यावर तो गिळायला लागतो म्हणून पदार्थ देताना खूपच बारीक करून द्यावा. आणि बाळाला जेवण भरवताना त्याच्याजवळच बसून रहावे. आणि लक्ष द्यावे कारण त्याला गिळायला माहिती नाही. नाहीतर तो घास घशात अडकवून खोकलत बसेल. मोबाईलवर किंवा फेसबुकवर tinystep मराठीलासुद्धा वाचू नका. बाळाकडे लक्ष द्या.

३) बाळाला स्मॅश किंवा कुस्कुरूनच पदार्थ द्यावीत. त्यानंतर दिवसातून दोनदा व नंतर तीनदा द्या. त्याला कदाचित कुस्करलेले पदार्थ खाण्यापूर्वी व खाल्ल्यानंतर थोडेसे स्तनपान घ्यावेसे वाटेल.

 

 

४) काही बाळांना ह्या महिन्यापासून दात यायला लागतात. त्यामुळे बाळाला आणखी पदार्थ खायला देऊ शकता. तुम्ही फळही देऊ शकता. चपाती/पोळी खायला देऊ शकता. खरं म्हणजे डोंगरात व शेतात राहणारे गरिबांचे बाळ ६ महिन्यापासूनच चपाती पोळी भाजी जे मिळेल ते खायला लागते. म्हणून ते खूप काटक बनतात. पण तुमच्या बाळाला जे पदार्थ पचतील तेच द्या.

बाळाला दूध पाजताना कोणती काळजी घ्यावी - https://www.tinystep.in/blog/balala-varche-dudh-pajtana-kay-kalji-ghyal--xyz

५) बऱ्याच मातांना प्रश्न पडत की, माझे बाळ डावखुरे आहे की उजवे. ह्याबाबत डावे असले तरी काही फरक पडत नाही. कारण जगामध्ये खूप महान व्यक्ती डावखुऱ्या आहेत. पण समजायचे कसे बाळ डावे की उजवे ? तेव्हा त्याला एखादी लहानशी वस्तू हातात पकडू द्या व एका हातातून दुसऱ्या हातात घेऊ द्या. यामुळे त्याला त्याची कौशल्ये विकसित करायला मदत होईल.

६) बाळ आता खेळण्यासोबत किंवा त्याला कड्यावर धरून फिरवायला मजा वाटेल. कारण त्याला आता समजायला लागले आहे. त्याच्या श्रवणशक्ती विकसित होत आहेत. त्याची समजशक्ती वाढत आहे. तुमच्या बाळाला एखादी वस्तू किंवा खेळणे आवडत असेलच. आवडायला लागले तर लवकरच त्याला त्याशिवाय कुठेही जायला आवडणार नाही. हे सामान्य आहे, व तुमचे बाळ अधिक स्वतंत्र होऊ लागल्याची खूण आहे.

 

 

७) ह्या महिन्यात बाळाला ही समस्या यायला लागते. त्याला शी कधी कधी खूप लागते. तर कधी कधी शी च करत नाही. त्याचे शीचे वेळापत्रक व्यवस्थित सुरु होण्यासाठी थोडा वेळ लागेल. कधी त्याला पातळ शी होईल व पुढच्या वेळी घट्ट होईल. सामान्य काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तुमचे बाळ केवळ स्तनांचे दूध पित असते तेव्हा शी मऊ असेल व सहजपणे होईल. तिने घन आहार घ्यायला सुरुवात केल्यानंतरच तिला कदाचित मलावरोध होऊ शकेल, जेव्हा तिची शी घट्ट असेल व सहजपणे होणार नाही, व नेहमी इतकी पुन्हा - पुन्हा होणार नाही. 

८) अशी लक्षणे बाळाबाबतीत दिसलीच तर त्याला मलावरोध झाला आहे असे ओळखावे. जर तुमचे बाळ शी करताना रडत असेल तर ते एक चिन्ह असू शकते. त्याची शी कोरडी व घट्ट असल्याचेही तुम्हाला दिसून येईल. त्याला कदाचित नेहमीपेक्षा कमी वेळा शी होईल, काही वेळा आठवड्यातून केवळ ३ ते ४ वेळाच होईल. दुर्गंधीयुक्त शी व वात ही देखील लक्षणे आहेत. बाळाचे पोट हे कडक होत असेल आणि फुगलेले असेल तर ते देखील आणखी एक लक्षण आहे.

बाळाला काजळ लावण्याबाबत - https://www.tinystep.in/blog/balala-kajal-lavne-yogy

९) तुम्ही काय करु शकता? तुमचे बाळ ६ महिन्यांपेक्षा लहान असेल व बाळाला मलावरोध झाल्याचे तुम्हाला वाटत असेल, तर त्यावेळी बाळाला भरपूर स्तनपान द्या. स्तनांचे दूध हे मेडिसिन आहे. त्याला पाणी, किंवा इतर कोणतेही पेय देऊ नका केवळ स्तनपान देत रहा. तुमच्या बाळाने पूरक/ वरचा  आहार घ्यायला सुरुवात केली असेल तर त्याला फळे व भाज्या तसेच स्तनांचे दूध व स्वच्छ, शुद्ध पाणी द्या. यामुळे त्याची शी मऊ व्हायला मदत होईल. आणि बाळाचा मलावरोधाची समस्या कमी होईल. काही वेळा, शी अति पातळ होत असल्यास तर ते मलावरोधाचे लक्षण आहे. पचन यंत्रणेत अडथळा निर्माण करणाऱ्या घट्ट शीच्या बाजूबाजूने पातळ शी पुढे सरकू शकते. तुमच्या बाळाला असे काही होत असेल आणि तुम्हाला ते लक्षात आले की, डॉक्टरांची भेट घ्या. 

१०) ह्या महिन्यानंतर आईला वाटायला लागते की, आता माझे बाळ केव्हा रांगेल किंवा चालायला, बसायला लागेल. बसल्यानंतर पुढची पायरी म्हणजे तुमचे बाळ रांगू लागेल. सामान्यपणे ही चालायला सुरुवात करण्याच्या दिशेने झालेली प्रगती असते. पण प्रत्येक बाळ हे वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येते. जसे की, काही बाळांना ह्या महिन्यात दात येतात तर काहींना नाही. काही बाळ चालायला लागतात तर काही बाळ रांगण्यासाठी सुद्धा खूप वेळ घेतात. म्हणून लगेच घाबरून जाऊ नका की, माझ्या बाळाचे दात का आले नाहीत. तो रांगत का नाही. तर हळूहळू त्याची वाढ होईल पण वेळेआधी बाळाची वाढ पूर्ण होईल. 

बाळ पोटात काय करते ते जाणून घ्या - https://www.tinystep.in/blog/tumche%20bal-potat-hya%20goshti-karate--xyz

११) तुमचे बाळ ७ ते ९ महिन्यांचे असताना रांगायला सुरुवात करु शकते. याचा अर्थ असा की ते १ वर्षाचे होईपर्यंत बहुतेक व्यवस्थित रांगू लागलेले असेल. मात्र सर्व बाळे रांगत नाहीत. तुमच्या बाळाला हात व गुडघ्याच्या आधाराने रांगण्याऐवजी कदाचित पाठीवर गोल फिरायला आवडते असे तुम्हाला कदाचित दिसेल. किंवा त्याला कदाचित पोटावर झोपून इकडे तिकडे फिरायला आवडेल. 

काही बाळ अजिबात रांगत नाहीत. उलट त्याऐवजी, ती सरळ उठण्याचा, उभे राहण्याचा व चालण्याचा प्रयत्न करतात. तुमचे बाळ अधिक सक्रिय होत आहे हे महत्वाचे आहे, ते कसे करते हे नाही. तुम्हाला बाळाबाबत काही वाटत असेल, उदा उदा. काही बाळ ऐकत नाहीत, बसताना त्रास होतोय, बोलताना अडखळतोय, कानात सतत हात घालतोय तेव्हा डॉक्टरांची भेट जरूर घ्या. काही मोठ्या समसत्य असतील त्यात आताच सोडविता येतील. पण त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. tinystep मराठीचे अप्लिकेशन आहे त्यात मराठी मॉम्सचा ग्रुप आहे त्यावर सुद्धा तुम्ही विचारू शकता बाळांच्या बाबतीतले प्रश्न.

बाळाला ताप येण्यासंबंधी - https://www.tinystep.in/blog/tumche-chuban-ghetana-lakshat-ghya 

बाळाला घाम येण्याची कारणे - https://www.tinystep.in/blog/balala-khup-gham-ka-yet-asto

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon