Link copied!
Sign in / Sign up
80
Shares

तुमचे बाळ रात्री झोपत नाहीये ना ? तर ह्या गोष्टी एकदा बघून घ्या !

        खूप बाळ रात्री झोपत नसतात. खूप मस्ती करतील किंवा रडत बसतील पण झोप घेणार नाहीत. ह्यामध्ये आईला खूप झोप लागते पण ती बाळाला झोपवूनच झोपत असते. तेव्हा तिच्यासमोर खूप प्रश्न पडतात बाळाला कस झोपवू तेव्हा ह्या गोष्टी वाचून काढा. असंही ते १६ ते १८ तास झोपतच असतं. पण एवढय़ा छोटय़ा बाळाचे अवयवही छोटेसे. त्याला लवकर लवकर भूक लागते, शू-शी होते, पुन्हा पोट रिकामं होतं. पुन्हा भूक. असं चक्र सारखं चालू असतं. त्याची प्रत्येक गरज पुरवण्यासाठी आईला सावध राहावं लागतं. मग आईच्या झोपेचं काय? तर बाळ झोपलं की तिनं पण झोपावं, डोळा लागला नाहीतरी आडवं पडून विश्रांती घ्यावी. तो अमूल्य आणि अपुरा वेळ मोबाइल वर फेसबुक वर किंवा टी. व्ही वर घालवू नका.

१) बाळ साधारण दीड महिन्याचं झालं की दिवस आणि रात्र यांच्यातला फरक त्याला समजावून द्यायला पाहिजे. म्हणजे काय करायचं? दिवसा जरी ते झोपलं असलं तरी खोलीमध्ये पुरेसा उजेड हवा. दर दोन तासांनी त्याला उठवावं- कसं? पायाला गुदगुल्या करणं, कानामागे, केसात बोटं फिरवणं अशा पद्धतीनं. याचा उद्देश एवढाच, की डोळे उघडल्यावर त्याला दिवसाचा प्रकाश दिसायला हवा. त्या वेळी त्याच्याशी गप्पा माराव्यात, एकमेकांशी बोलावं. 

२) आता बाळ अजून थोडं मोठं झालंय. आता त्याचं ठराविक वेळेला झोपवण्याचं तंत्र बसवायचंय. याची सुरुवात संध्याकाळीच करावी. (संध्याकाळच्या पाटर्य़ा, समारंभ टाळावेत.) बाळाला फिरवून आणणं, नंतर मसाज, शक्यतो छानपैकी अंघोळ, दूध पाजणं, थोडंसं खेळायचं. त्याच्या आवडीचं खेळणं दाखवायचं. त्याला ठराविक गोष्ट सांगायची किंवा ठराविक गाणं म्हणायचं (अंगाई). यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य, नियमितपणा. छोटय़ा मुलांना मोठे बदल आवडत नाहीत. या गोष्टी क्रमाक्रमानं झाल्या आणि दूध पाजलं. पोट भरलं की त्याला गुंगी यायला सुरुवात होते.

३) इतक्या लहान बाळांना वेगळय़ा खोलीत झोपवू नये. जवळ झोपवावं. शक्यतो आईच्याच बिछान्यात. फक्त त्याच्यावर आपले हातपाय पडू नयेत म्हणून दोन्ही बाजूंनी छोटे लोड लावावेत. जेणेकरून बाळाचं डोकं पायांपेक्षा थोडं उंचावर राहतं. यामुळे पोटातलं दूध उलट तोंडात येण्याचा प्रकार घडत नाही. मात्र छोटय़ा मुलांना उशी वापरू नये. तर त्यांना मऊ मोठय़ाशा दुपटय़ात घट्ट गुंडाळावं. त्यांचे हातपाय आत राहावेत यासाठी. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. पहिले तीन-चार महिने अकारण-सकारण मुलं दचकतात, त्यांचे हातपाय जोरात झटकले जातात. आणि त्यांची झोपमोड होते.

 

४) तुमच्या मांडीवर, खांद्यावर त्याला बरं वाटेल. त्याच्या अगदी जवळ झोपून थोडं थोडं थोपटलं तरी ते पुन्हा झोपू शकतं. सातत्यानं चालणारा आवाजच त्यांना हवा असतो. (व्हाइट नॉईस) आईच्या पोटात त्यांना अनेक प्रकारचे आवाज ऐकू येतात- आईच्या हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण, आतडय़ाची हालचाल, श्वासोच्छ्वास वगैरे. आई बाळाला पोटात घेऊन चाले तेव्हा त्याला आपोआप झोका मिळायचा. 

५) पहिल्या काही महिन्यांत बाळांची वाढ झपाटय़ानं होत असते, त्यामुळे अन्नाची गरजही वाढते. रात्री नुसतं दूध दिलं तर तीन-चार तासांनी भुकेमुळे मुलं जागी होतात. यासाठी तज्ज्ञ लोक ‘क्लस्टर फीडिंग’ करायला सांगतात. म्हणजे संध्याकाळी एक-दीड तासांच्या अंतरानं तीन-चार वेळा दूध किंवा खाणं द्यायचं. पोटभर खाणं झालं की बाळ रात्रभर झोपू शकेल. 

६)  पोटदुखी, कानदुखी अशा कारणांनी बाळ झोपत नसेल तर त्याचं रडणं वेगळं असतं. नाक सर्दीनं चोंदलं असेल तरी बाळ झोपू शकत नाही. पण ते करूनही बाळ झोपलंच नाही आणि रडत राहिलं तर मात्र डॉक्टरांची झोपमोड करण्यावाचून गत्यंतर नाही. कधीकधी बाळांच्या अंगात ‘भूत’ शिरतं. छान रात्रभर झोपणारी बाळं अचानक झोपेनाशी होतात. अतिरेकी हसतात, अतिरेकी खेळतात. थोडक्यात, ‘चेकाळतात.’ झोपायचं नाव घेत नाहीत. हा प्रकार चांगला दोन-चार आठवडे चालू शकतो. याला म्हणतात, ‘स्लीप रिग्रेशन.’ याचं स्पष्टीकरण असं- मेंदूची झपाटय़ानं होणारी वाढ, प्रचंड मोठय़ा प्रमाणात ग्रहण होत असलेलं ज्ञान, सर्व पातळय़ांवर वेगानं घेतले जाणारे प्रगतीचे टप्पे, हे सगळं पचवायला आणि त्यातून शांत राहायला बाळाला जमत नाही. अति उत्तेजनेमुळे बाळ जागं राहतं. साधारण चौथ्या, नवव्या आणि बाराव्या महिन्याच्या सुमारास हे घडू शकतं. यावर उपाय? शांतपणे मंत्र जपणं. ‘हेही दिवस जातील.’

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon