Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

बाळाला पोटावर झोपवणे योग्य आहे का ?

       बाळांमध्ये स्वतःला पोटावर वळवण्याची आणि पोटावरच झोपण्याची प्रवृत्ती असते. त्यांना तसेच सोडावे की नको, याबाबत अनेक मातांचा गोंधळ उडतो; कारण पोटावर झोपल्याने श्वासाचा पुरवठा रोखला जातो. जेव्हा तुमची प्रसूती होते किंवा बाळाला इस्पितळातून घरी आणता; तेव्हा बाळासाठी झोपण्याची व्यवस्था ही खरोखर महत्त्वाची असते. बाळांना कधीही पोटावर झोपू न दिले पाहिजे; कारण यामुळे त्यांना श्वास कोंडण्याचा आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो. पोटावर झोपणे हे बाळासाठी का हिताचे नाही; याची अजूनही काही कारणे पुढे दिलेली आहेत.

SIDS ची शक्यता

जेव्हा तुम्ही बाळाला झोपवता, तेव्हा त्याला कधीही पोटावर न झोपवण्याचा सल्ला दिला जातो; कारण त्यामुळे श्वासाचा पुरवठा रोखला जातो आणि गंभीर परिस्थितीमध्ये त्याला सडन इंफॅण्ट डेथ सिंड्रोम देखील होऊ शकतो. बाळे पोटावर झोपली असताना त्यांना नीट श्वास घेता येत नाही; म्हणून त्यांचा श्वास कोंडण्याची देखील शक्यता वाढते. म्हणून बाळ जेव्हाही त्याच्या पोटावर झोपण्यासाठी वळेल; तेव्हा त्याला परत वळवून पाठीवर झोपवा. यामुळे तुमचे बाळ पूर्ण रात्र सुरक्षितपणे झोपू शकेल.

ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा

जर तुमचे बाळ पोटावर झोपले असेल; तर त्याचे तोंड हे बेडच्या अगदी जवळ राहील. यामुळे हवेचा अपुरा पुरवठा आणि श्वासोच्छवासविषयक समस्या निर्माण होऊ शकतात; कारण त्याला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत नाही आणि श्वासामध्ये उच्छवास झालेलीच हवा परत घेतली जाते, ज्यामध्ये कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण भरपूर असते. जर आवश्यक ऑक्सिजन बाळाच्या फुप्फुसांमध्ये आणि पेशींमध्ये पोहोचला नाही; तर त्याच्या पेशीय चयापचयामध्ये समस्या निर्माण होतात. यामुळे श्वास कोंडणे आणि मर्यादित श्वासाच्यादेखील समस्या निर्माण होऊ शकतात.

शरीराच्या एकूण उष्णता अपव्ययामध्ये अडथळा

तुमच्या शिशूचे शरीर हे उष्णतेला भरपूर संवेदनशील असते; कारण त्यांच्या वजनाच्या मानाने त्वचेच्या पृष्ठभागाचे प्रमाण भरपूर असते. याचाच शब्दशः अर्थ असा की, त्यांचे शरीर प्रौढांच्या तुलनेत चार पट वजन गमावते. पोटावर झोपण्याने त्यांच्या उष्णता अपव्ययामध्ये अडथळा निर्माण होतो; ज्यामुळे तुमच्या बाळाच्या शरीराचे तापमान भरपूर वाढते. म्हणून तुमच्या बाळाला त्याच्या पाठीवर झोपण्यास शिकवणे आणि त्याला पोटावर झोपवायचे टाळणे महत्त्वाचे आहे.

रक्तदाबामध्ये अचानक घट

पोटावर झोपल्याने बाळाच्या शरीराच्या बाकी कार्यांवरही परिणाम होऊ शकतो; जे त्यांना रात्रभर अस्वस्थ करू शकते. अभ्यासामध्ये असेही आढळले आहे की, जी बाळे पोटावर झोपतात; त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये आणि रक्तदाबामध्ये अचानक घट होते. तसेच जर ते खूप काळापासून पोटावरच झोपत असतील; तर त्यांची संवादावरची प्रतिक्रियादेखील मंदावते. तसेच पोटावर झोपणारे बाळ सकाळी उशिरा उठते आणि त्याची शरीराची हालचाल प्रतिबंधित असते.

म्हणूनच जर बाळे एका वर्षाखालील वयाची असतील; तर त्यांना पोटावर झोपून न दिलेलेच हिताचे ठरते. ते एक वर्षाचे होईल आणि ते स्वतःहून पाठीवर वळू शकेल; तेव्हाच तुम्ही त्याला पोटावर झोपू देऊ शकता!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon