Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

बाळाला फळांचा आहार. . .


बाळाला ६ महिने झाल्यावर आणि स्तनपानानंतर बाळाचे सर्वागीण पोषणासाठी आहार हा पौष्टिक असायला हवा. तेव्हा आईच्या मनात गोंधळ चालू असतो की, नेमके बाळाला काय खाऊ घालायचे. आणि काही आईंची, बाळ खात नाही. ही समस्या असते. तेव्हा बाळाला फळाचा आहार आणि काही त्याच्या जिभेला चव लागण्यासाठी आहार देऊ शकता.

१) अवोकेडो

अवोकेडो तान्ह्या बाळासाठी चांगलाच लाभदायक असतो. आणि ह्या फळाची चव त्याला लागून जाते. त्यामुळे हे फळ तुम्ही बाळाच्या फॉर्मुला दुधातही देऊ शकता.

२) केळी

केळी ही खूप आवडणारी गोष्ट असते लहानग्यांसाठी. आणि केळी पचायला सुद्धा हलकी असते. म्हणून बाळाला ती कुस्कुरून आणि मॅश करून देऊ शकता. किंवा तुम्ही बेबी राईस च्या काही चमच्यांसोबत तुम्ही देऊ शकतात. फक्त सुरुवातीला देताना त्याचे प्रमाण कमी असू द्यावे त्यानंतर त्याचे प्रमाण वाढत न्यावे. बाळ आवडीने खातोय म्हणून खूप देऊ नका. त्याची पचन शक्तीही बघा.

३) बेबी सिरीयल

बेबी सिरीयल किंवा बेबी राईस हा बाळाला खाणे सुरु करण्यासाठी खूप चांगला आहार आहे. ह्याला तुम्ही १० मिनिटाच्या मंद आचेवर शिजवून सेरेल्स सारखा बनवू शकता. आणि शिजवून ही थोडे कडक वाटत असेल तर त्याला हाताने कुस्करून घ्या. आणि ह्यात स्वादासाठी तुम्ही डाळींसोबत शिजवू शकता.

४) शकरकंद (स्वीट पोटेटो) साकृ

शकरकंद पौष्टिक आणि स्वादिष्ट असते. ह्यासाठी स्वीट पोटेटोवरची साल काढून घ्या, मोठे - मोठे असतील तर त्याला कापून घ्या, त्यानंतर त्याला शिजवायला टाकून द्या. आणि त्यानंतर त्याला कुस्करून बाळाला द्या. किंवा त्याचे सेरेल्स बनवून द्या. किंवा फॉर्मुला मिल्क बरोबर सुद्धा देऊ शकता.

५) भाज्यांची पुरी

गाजर, भोपळा, पालक, टमाटे, आणखी काही भाज्या असतील त्यामधून तुम्ही पुरी बनवू शकता. ह्यासाठी ह्या भाज्यांना वाफने किंवा काही भाज्यांना शिजवून घ्या. आणि नरम झाल्यावर मिक्सरमधून पिसून घ्या. आणि ते बाळाला खाऊ घाला.

हा आहार तुम्ही सहा महिन्यानंतर देऊ शकता पण बाळ जर खाऊ शकत नसेल तर काही दिवसांनी खाऊ घाला. आणि ह्याची दक्षता घ्या की, बाळाला उलटी तर होत नाही ना, किंवा त्याला पचत नाहीये, काही ऍलर्जी होतेय, ह्या सर्व बाबी तपासून घेत चला. आणि प्रमाण कमी कमी ठेवा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon