Link copied!
Sign in / Sign up
55
Shares

पावडरचे दूध आणि गायीचे दूध बाळाला देताना. . .

      काही मातांना अंगावरचे दूध पुरेसे येत नाही आणि बाळाचेही पोट त्यात पूर्ण भरत नाही. त्याचे पोषणच पूर्ण होत नाही. तेव्हा आईसमोर फॉर्मुला दुधाचा किंवा पावडर दुधाचा पर्याय असतो. पण काही मातांना नेमके पावडरचे दूध कसे बनवायचे ह्याविषयी गोंधळ असतो. काही माता गायीचे दूध द्यायला लागतात. आणि त्यांनाही ह्याबाबतीत जाऊन घ्यायचे असते. तेव्हा ह्या ब्लॉगमधून ह्या दोन्ही दुधाविषयी जाणून घेऊ.

१) स्तनपानाचे दूध व्यतिरिक्त आईसमोर दोन दुधाचे प्रकार असतात. !) फॉर्मुला किंवा पावडरचे दूध !!) गायी, म्हशीचे दूध

फॉर्मुला दूध हे गायीच्या आणि इतर दुधापासून बनवलेले असते. ते स्पेशली बाळाच्या प्रकृतीनुसारच बनवलेले असते. त्याला पचेल असेच ते बनवलेले असते.

२) पावडरचे दूध बनवताना त्याचे प्रमाण योग्य असले पाहिजे जर खूप पाणी आणि कमी दूध तर बाळाचे पोषण होणार नाही. आणि काही माता खूप पावडर मिसळतात आणि बाळाला एकदम बद्धकोष्ठ किंवा पोटदुखी अशा तक्रारी सुरु होऊन जातात.

३) दूध बनविताना अगोदर सर्व भांडी स्वच्छ गरम पाण्यात ठेवून उकळून घ्यावेत जेणेकरून बॅक्टरीया युक्त बाळाची भांडी राहणार नाहीत. आणि त्याचबरोबर बाटली (ह्याबाबत वेबसाईटवर ब्लॉग आहे तो पाहून घ्या) सुद्धा स्वच्छ धुवून घ्यावी तिलाही गरम पाण्यातून काढून घ्यावे.

४) पावडरचे दूध बनविताना ३० मी.ली पाण्यात एक चमचा पावडर टाकावे. म्हणजे बाळाला इतर त्रास होणार नाही.

५) पावडर घेताना बाळाच्या डॉक्टरांशी बोलून घ्या. आणि त्याची एक्सपायरी डेट नक्कीच बघा. ह्यात हलगर्जीपणा करू नका. दूध बनविण्याचे प्रमाण अनुभवी आईला विचारून घ्या.

     गायी व म्हशीचे दूध बनवण्यासाठी

६) गायीच्या दुधात कमी फॅट असल्याने आणि ते पचायला हलके असल्याने बाळाला दिले जाते. त्यामुळे गायीचे दूध चांगले तापवून तुम्ही देऊ शकता.

७) म्हशीचे दूध खूप स्निग्ध पदार्थ असल्यामुळे त्याला खूप तापवून त्यावरची साय काढून घ्यावी आणि ते दूध बाळाला देऊ शकता.

आता ह्या दुधात थोडे पाण्याचे प्रमाण घालून ते दूध आईच्या दुधाच्या प्रथिनाइतके येऊन जाते.

ह्यात तुम्ही आणखी १००-१५० मी.ली दुधात १ चमचा साखर (५ ग्राम) साखर घालू शकता. हे दूध प्रत्येक वेळी ताजे बनवावे. 

८) ज्या बाळांना पावडर व गाय आणि आईच्या दुधाची ऍलर्जी असते त्यांना Lactose free म्हणजे सोयाबीनपासून बनवलेले पावडरचे दूध द्यावे लागते. पण ह्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

 

 

 

९) ह्या सर्व गोष्टी करताना एकदा अनुभवी आईला किंवा डॉक्टरांना विचारून घ्यावे कारण बाळाच्या प्रकृतीनुसार बदल होत असतात. आणि ह्यात काही गोंधळ वाटत असेल तर डॉक्टरांशी बोलून घेतलेले बरे असते.

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon