Link copied!
Sign in / Sign up
683
Shares

बाळाला पहिल्या वर्षात होणारे आजार आणि घरगुती उपचार

 

जन्मानंतर  बाळाची रोगप्रतिकार वाढायला सुरुवात होत असते आणि ती इतकीसुद्धा सशक्त नसते की, ती रोगजंतूंविरुद्ध व आजाराविरुद्ध प्रतिकार करेल. त्यामुळेच बाळासाठी लस देणे अनिवार्य असते.  पण काही साधे आजार असतात त्यासाठी लसीची गरज नसते. त्यासाठी काही घरगुती उपचार पुरेसे असतात ते आजार कोणते आणि त्याचे उपचार कोणते ते आपण पाहणार आहोत.

१) सर्दी

उपचार : लहान बाळासाठी सर्दी खूपच त्रासदायक असते. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला अडचण होते. तेव्हा बाळाचे बंद झालेले नाक उघडणे  महत्वाचे असते. तर   कधीकधी बाळाचे नाक खूप वाहू लागते. तेव्हा ओवा एका कपड्यात घेऊन त्याची पुरचंडी करून हातावर चांगली घासून नाकाशी धरावी. ह्याचा वासाने बाळाचे नाक मोकळे होते. जर नाक चोंदले गेले असेल तर पातळ कपड्याने बाळाच्या कपाळावर हलकेच शेक द्यावा . ह्यामुळे बाळाचे नाक उघडून कफ बाहेर पडू लागतो. सर्दीत नाक बंद आणि तोंडाने श्वास घेता येत नाही म्हणून ते रडू लागते. अशा वेळी बाळाला वाटी घेऊन चमच्याने थोडं थोडं दूध पाजावे. त्यामुळे बाळाला गिळता येईल.

२) अतिसार, उलट्या, जुलाब किंवा डायरिया

उपचार :  दुधातून किंवा दुधाची बाटली, बाळाचे खेळणे, ह्यांची स्वच्छता न राखल्यामुळे बाळाला उलट्या व जुलाब सुरु होतात. ह्या आजारात डीहायड्रेशनचा धोका असतो. तो टाळण्यासाठी जलसंजीवनी ( १ ग्लास पाणी + १ चमचा साखर + १ चिमूट मीठ ) , ORS चे पाणी, इ. सारखे पाजत रहावे. भाताची पेज, भाताचे पाणी जरूर द्यावे. ते बंद करू नये. आईचेच दूध चालूच ठेवावे, वरचे दूध कमी द्यावे. इतके करूनही उलट्या व जुलाब थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जावे.

३) ताप

उपचार : बाळाला ताप सर्दीमुळे येतो. ताप आलेल्या बाळाला कपड्यात जास्त गुंडाळून ठेऊ नये. कारण कपड्यामध्ये उब राहून बाळाचा ताप उलट वाढतो. गरम कपड्यात गुंडाळू नये. साधे सुती  कपड्यात बाळाला गुंडाळावे व दिवसातून ३-४ वेळा अंग पुसून घ्यावे. तान्ह्या बाळाला दुसरा ताप असतो तो अंगात पाणी कमी असेल तर त्यामुळे येतो  यालाच डीहायड्रेशन फिवर म्हणतात लसीकरणमुळे  ताप सारखाच येतो.  बाळाला जर तापाबरोबर अंगावर पुरळ, किंवा इतर लक्षणे दिसली तर डॉक्टरांकडे जावे. ताप असताना बाळाला हलका आहार व भरपूर पाणी द्यावे.

४) कानाचा संसर्ग

उपचार :  बाळाचा कान दुखत असेल तर खूप रडते आणि जोर जोराने मुठीने  कानाला  मारते, यावरून समजून घ्यावे, की बाळाचा कान दुखत आहे. बहुतेकदा सर्दीमुळे कान दुखत  असतो. तेव्हा सर्दीसाठी उपाय करावेत. व कानात  टाकावेत. आणि बाहेरून वेखंडाचा लेप लावावा. ह्या उपायाने बाळाच्या कानाला आराम मिळेल.

५) पोटात दुखणे

 उपचार : अचानकपणे बाळाचे रात्री पोट दुखायला लागते. त्याचे कारण बऱ्याचदा कळत नाही. मध्यरात्री बाळ अचानक रडते आणि काही वेळानंतर आपोआप शांतही होते. पण काहीवेळा बाळ शांत होत नाही. तेव्हा यासाठी बेंबीच्या जवळ थोडासा हिंग चोळावा  आणि थोडे पाणी मिसळून  हिंग संबंध पोटावर चोळावा. जर तरीही बाळाचे पोट दुखणे थांबत नसेल तर डॉक्टरांना दाखवावे.Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
50%
Wow!
50%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon