Link copied!
Sign in / Sign up
200
Shares

लसी आणि बाळाला लस का दिली जाते ? पूर्ण माहिती......आईंनी वाचायलाच हवे


लस कशी कार्य करत असते

आपल्या शरीरात संसर्गापासून वाचण्यासाठी नैसर्गिक सुरक्षा कवच असते. त्याला आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती असे म्हणतात. ज्यावेळी आपल्याला संसर्ग होत असतो तेव्हा आपल्या शरीरात त्या संसर्गविरुद्ध लढण्यासाठी काही रसायने तयार होतात त्याला अँटीबॉडीज असे म्हटले जाते.

संसर्ग जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत अँटीबॉडीज आपल्या शरीरात राहत असते. ज्या जिवाणूंमुळे संसर्ग होत असतो त्या जीवाणूंनाप्रति प्रतिबंधक करतो. ही क्षमता आपल्या सोबतच असते.

लस का टोचून घेतो आपण आणि बाळाला का देतो

लसीद्वारे शरीराचा सामना संसर्गित जिवाणूंशी होतो कारण ह्यामुळे शरीरात प्रतिरोधक क्षमता विकसित होते. काही लसी ह्या तोंडाद्वारे दिल्या जातात तर काही लसी ह्या इंजेक्शन द्वारे दिले जातात.

लसींचा फायदा हा आहे की तो शरीराला आजारी होऊ देत नाही. लस ही ज्या संसर्गाची लस घेतली असेल तो रोग जरी आला शरीरात तर लसीचे जिवाणू त्या संसर्गित जिवाणूंशी लढून त्यांना शरीरात राहू देत नाहीत आणि त्यामुळे शरीर आजारी पडत नाही.

बाळाला का लस दिली जाते ? तर बाळाला लस ह्यासाठी दिली जाते कारण जन्म घेतलेल्या बाळाची संसर्गाविरुद्ध लढण्याची शक्ती नसते. बाळाला लगेच संसर्ग होतो. म्हणून त्याला लस दिली जाते जेणेकरून तो आजारी होणार नाही.

बालपणापासून जर बाळाला लस दिल्या गेल्या तर त्याला आयुष्यभरासाठी त्याचे आरोग्य सुरक्षित असते. कारण पोलिओ सारख्या रोगांचे जिवाणू हे एकदा घुसल्यावर शरीराला अपंग बनवतात तसेच इतर रोगांचे आहे. म्हणून त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी लस दिली जाते ते कधीच बाळाच्या आयुष्यात आणि शरीरात पुन्हा येत नाही. कारण त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी लसीद्वारे बाळाला सुरक्षित केलेले असते. म्हणूनच आता पोलिओ, गोवर, कावीळ ह्या रोगांपासून बाळ सुरक्षित आहे.

लस देण्याचे प्रकार

प्राथमिक लस - Primary Vaccination 

ह्यामध्ये पाच लसी दिल्या जातात. ह्या लसी बाळाच्या जन्मापासून सुरु होऊन काही महिन्यापर्यंत दिल्या जातात. ह्या वेळे वेळेला बाळाचे आरोग्य आणि बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढवत असतात. आणि सर्व लसी बाळाला द्याव्यात.

बूस्टर लस- Buster Vaccination 

ही लस जी अगोदर प्राथमिक लस दिली असते त्याला आणखी बूस्ट (वाढ करणे) म्हणजे त्याची तीव्रता वाढवण्यासाठी दिली जाते. जसे जसे अँटीबॉडीजचा स्तर व्हायला लागतो तसा शरीराला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. म्हणून ही लस सुद्धा खूप महत्वाची आहे. कारण ही लस अँटीबॉडीज चा स्तर शरीरात राखून ठेवते.

सार्वजनिक लस देणे- Public Vaccination

कोणत्याही सार्वजनिक रोगाला पूर्णपणे हटवण्यासाठी सार्वजनिक पद्धतीने लस देणे हा पर्याय खूप उत्तम आहे.

बी.सी. जी

तान्हा बाळाला क्षयरोगापासून (विशेषत: मेंदूचा क्षयरोग) बचाव करण्यासाठी बी.सी.जी. ची लस खूपच उपयोगी आहे. आणि ही त्या-त्या वेळी द्यायला हवी. तुम्हाला माहितीये का? ही लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात. ही लस जन्मल्यावर लगेच दुस-या दिवशीही दिलेली चालेल. ही लस तीन-चार महिन्यांपर्यंत टोचयाला हवीच. जर ही लस काही कारणांनी राहून गेलीच तर एक वर्षापर्यंत तरी टोचून घेणे आवश्यक आहे.

बी.सी. जी. लस बद्धल काही गोष्टी - ज्या जागी बी.सी.जी ची लस टोचलेली असते त्या जागी १२ ते १५ दिवसांनी छोटी पुरळ तयार होते. ती पुरळ ६आठवड्यात ती पुरळ भरून येते आणि त्या जागी बी.सी.जी. लस ची खूण तयार होते. तेव्हा ह्या जागेवर कुठलेही क्रीम लावू नका. ज्या दिवशी बी.सी.जी ची लस टोचली असेल त्या दिवशी अंघोळ करू नका. त्याचबरोबर ती जागा पाण्याने धुवू नये आणि शेकण्याचा प्रयत्नही करू नये. (काही शंका वाटल्यास डॉक्टरांना विचारून घ्यावे)

बऱ्याचदा काही बाळांना बी.सी.जी ची लस टोचल्यावर त्या जागेच्या बाजूच्या काखेत गाठी येतात. ह्या गाठी जर दुखऱ्या असतील तर त्या वेळी डॉक्टरांना भेटून घ्यावे. तुम्हाला औषधाचे नाव सांगून गोंधळ होईल.

त्रिगुणी लस

ह्या लसीत डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात या तीन लसींचा समावेश आहे. त्रिगुणी लस बाळाला वयाच्या तिस-या महिन्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा याप्रमाणे तीन वेळा (शक्यतो मांडीवर) टोचली जाते. लस टोचल्यानंतर बाळाला एक दिवस ताप येतो. त्यासाठी पॅमालची चतकोर गोळी किंवा तापाचे पातळ औषध बाळाला द्यावे. संपूर्ण रोग प्रतिकारशक्ती येण्यासाठी दरमहा पहिले तीन व नंतरचे बूस्टर डोस जरूरीचे आहेत. शक्यतो पहिल्या दोन इंजेक्शनमधील अंतर दोन महिन्यांहून अधिक असू नये.

पोलिओ

ह्याबद्दल तुम्हाला ठाऊक आहेच. हे डोस लाल रंगाचे थेंब असतात. बाळाला पोलिओचा पहिला डोस जन्मल्यानंतर १ ते २ दिवसांत द्यायला हवा. त्यानंतरचे डोस त्रिगुणी लसीच्या बरोबरीने मुलांना तोंडाने पाजतात. डोसच्या आधी व नंतर अर्धा तास गरम पाणी, गरम दूध देऊ नये.

लक्षात ठेवा की, त्रिगुणी लस व पोलिओ डोसमधील शक्ती उष्णतेमुळे नाहीशी होते. यासाठी या लसी शीतकपाटात (रेफ्रिजरेटर) ठेवल्या जातात. थंडाव्यात न ठेवलेले डोस देऊन न देण्यासारखे आहे. यासाठी डॉक्टरकडे, व सरकारी आरोग्यकेंद्रांमध्ये मुलांना डोस दिले जातात त्या ठिकाणी चालू स्थितीतील शीतकपाट असायला पाहिजे. सरकारी दवाखान्यात तुम्ही स्वतः विचारून घ्या व बघून घ्या. काही खाजगी डॉक्टर व सरकारी दवाखान्यात शीतकपाटाची सोय नसतानाही तसेच हे डोस देतात. त्यामुळे बाळाचा फायदा तर होत नाहीच, पण बाळाला लस देऊन घेतल्याचे खोटे समाधान पालकांना मिळते व पोलिओचा धोकाही संभवतो. म्हणून ह्याबाबत आईने व वडिलांनी खूप लक्ष द्यावे.

गोवर प्रतिबंधक लस

गोवर हा तसा साधा आजार असला तरी अशक्त किंवा कुपोषित मुलांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो. अशा मुलांमध्ये गोवरानंतर न्यूमोनिया, छातीत कफ (श्वसनलिकादाह) किंवा दबलेला क्षयरोगाचा आजार उफाळून येऊ शकतो. कित्येकदा या आजारानंतर हगवण, रक्ती आव लागते. यामुळे मुळात सौम्य कुपोषित असलेली मुले जास्तच कुपोषित होतात. म्हणून गोवर लस महत्त्वाची असते.

बाळाला नवव्या महिन्यात एक गोवर लसीचे इंजेक्शन व 15 व्या महिन्यात किंवा दीड वर्ष पूर्ण झाल्यावर बूस्टर (फेरडोस) इंजेक्शन द्यावे. गोवर लसीनंतर ताप किंवा गाठही येत नाही. हे इंजेक्शन त्वचेखाली देतात. या लसीसाठीही शीतकपाट आवश्यक असते.

लस देणे हे सुरक्षित असते का ?

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बाळाला लस देणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे. लस देण्याअगोदर त्या लसीवर संशोधन झालेले असते आणि ती जेव्हा आरोग्यपूर्ण आणि बाळासाठी योग्य आहे आणि त्यातून कोणत्याच प्रकारचा धोका नाही तेव्हाच ती लस लॅबकडून मंजुर केली जाते. लस ही खूप संशोधन चाचण्यांमधून येते.

लसीबाबत काही गोष्टी

बाळाला लस दिल्यावर २० मिनिटे डॉक्टरांच्याच क्लिनिकमध्ये थांबावे. कारण जर लस दिल्यावर बाळाला काही त्रास किंवा रिअक्शन व्हायला लागलाच तर डॉक्टरांना लगेच दाखवता येईल. इंजेक्शन द्वारे लस दिल्यावर बाळाला वेदना होत असतात त्यावेळी तो चीड-चीडा होऊन जातो. ती जागा लालसर व सुजून जाते. आणि ह्यानंतर बाळाला हलकासा तापही येऊ शकतो म्हणून खूप काळजी व चिंता करत बसू नका. पण जर ताप खूपच जास्त असेल आणि तो कमी होत नसेल तर डॉक्टरांना दाखवा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon