भारतामध्येच बाळांना काजळ लावले जात असते. डोळ्यात काजळ भरल्यानंतर तुम्ही किती सुंदर दिसू लागतात. कोणत्याही कार्यक्रमात स्त्री जेव्हा जाते तेव्हा ती नक्कीच काजळ भरून जात असते. आपल्याकडे लग्नात मुलं-मुलींना काजळ भरवत असतात. तसेच लहान बाळांनाही काजळ भरवतात आणि ते चांगलेच आहे. पण आता बऱ्याच नवीन मातांना आता काजळ भरवणे जुनाट वाटते. नाही तेव्हा ह्या ब्लॉगममधून बाळांना काजळ भरण्याचे फायदे तुम्हाला सांगणार आहोत.
१) काजळ चांगल्या कंपनीचे असावे. कारण काजळ हे शुद्ध आणि निर्जंतुक असायला हवे. डोळे खूप नाजूक असतात आणि लहान बाळांना त्रास होणार नाही ह्याची दक्षता घ्या.
२) आणि जर तुम्ही घरीच काजळ बनवत असाल तर ते उत्तम आहे. घरचे काजळ बनवले शुद्ध व निर्जंतुक असेल.
३) घरी काजळ कसे बनावता येईल :
१. एरंडेल तेलात कापसाची वात बुडवायची त्यातून दिवा पेटवायचा.
२. नंतर त्यातून निघणाऱ्या ज्योतीवर तांब्याचे ताम्हण ठेवायचे. आणि ह्या ताम्हणात पाणी घ्यायचे. पाणी थंड राहते. ज्योत गर ताम्हणाला चिकटली असल्याने खाली भरपूर काजळी जमा होते. हीच काजळी तुमचे हात स्वच्छ असतील तर एका डब्यात भरून त्यात एरंडेल तेल मिसळून द्यावे. हे काजळ तयार झाले असते. आणि बाळाला तुम्ही लावू शकता.
४) एरंड तेल डोळ्यांना हितकारक आहे. आणि त्यात तांब्याचा संस्कार होत असल्याने ते काजळ औषधीयुक्त गुणधर्माने तयार होऊन गेलेले असते.
५) काजळ लावताना व्यवस्थित लावा जेणेकरून बाळाला त्रास होणार नाही. कारण बऱ्याच सांगतात की, बाळ काजळ लावूच देत नाही तेव्हा हळूहळू काजळ लावण्याची सवय करा.
६) काजळ मुळे डोळे शुद्ध राहतात आणि चेहरा खुलून दिसत असतो. त्याचबरोबर आपल्याकडं कुणाची नजर माझ्या बाळाला लागू नये म्हणूनही काजळ लावत असतात.
काजळ संबंधी काही शंका असतील तर अनुभवी आईला विचारून घ्या.
