Link copied!
Sign in / Sign up
41
Shares

तुम्ही तुमच्या बाळाला गरजेपेक्षा जास्त खाऊ घालत आहात याची ५ लक्षणे


पालकांचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते आणि आपल्या मुलांनी सगळे आणि भरपूर प्रमाणात खावे असे त्यांना वाटते. मुलांना सुधृड आणि गुटगुटीत बनवण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना गरजेपेक्षा जास्त खाऊ घालत आहोत हे पालकांच्या लक्षात येत नाही. जसे कमी असलेले योग्य नाही तसे जास्तीचे देखील हानिकारक असते. प्रत्येक गोष्टीचे एक प्रमाण असते आणि हा नियम पाळलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या पाल्याला एक संतुलित आहार द्यायला हवा. जास्तीचे खाल्ल्याने होणारे परिणाम त्यांना भोगावे लागू नये याची काळजी तुम्हीच घ्यायला हवी. जर तुमच्या मनात त्यांना काय खाऊ घालावे याबद्दल शंका असेल तर तुम्ही बालरोगतज्ञाकडे जाऊन सल्ला घेऊ शकता.

तुम्ही बाळाला गरजेपेक्षा जास्त खाऊ घालत आहात याची ही लक्षणे आहेत

     १) दुध उलटून टाकणे

मुलांच्या आहारातील मोठा भाग हा द्रव पदार्थांचा असतो आणि त्यात दुधाचा वाट जास्त असतो. ह्या द्रव पदार्थातील जीवनसत्वे त्यांच्या शरीराच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतात. बाळाने दुध उलटून टाकणे ही त्याची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. असे होणे असामान्य नाही. परंतु जर हे वारंवार घडत असेल तर मात्र याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बाळाला खाऊ घातल्यानंतर त्याला सरळ अवस्थेतच ठेवा, त्याच्या पाठीला थोडा मसाज करा आणि बाळाला ढेकर येऊ दया. जर असे केल्यानंतर देखील बाळ अन्नपदार्थ ओकून टाकत असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्ही तुमच्या बाळाला जास्तीचे खाऊ घालत आहात.

 

२) दिवसातून आठ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा ओल्या नॅपी

आधी उल्लेख केल्याप्रमाणे बाळाच्या आहारात जास्त प्रमाणात द्रव पदार्थ असतात. तुमच्या बाळाला लागणारे सर्व पोषकत्वे बाळाच्या शरीरात द्रवाद्वारे राहिली पाहिजेत. परंतु जर सतत लघवी होऊनही शरीरातून बाहेर टाकले जात असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला जास्तीचे खाऊ-पिऊ घालत आहात. जर तुमच्या लक्षात आले की तुमच्या बाळाला दिवसातून सरासरीपेक्षा जास्त डायपर लागत आहेत तर तुम्ही त्याच्या आहाराचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

३) रडणे

बाळाचे पोट सतत पूर्ण भरलेले असेल तर बाळाला श्वास घेण्यात आणि झोपण्यात त्रास होऊ शकतो. अशाने बाळ चिडचिडे होऊ शकते. यातून तुमची देखील रात्रीची झोप खराब होईल. श्वास घेतांना त्रास होणे हे सामान्य लक्षण नाही. जर कोणत्याही प्रकारचा शारीरिक आजार नसेल तर त्या बाळाला श्वसनाचा त्रास व्हायला नको. भूक नसेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा आवाज, त्रास नसेल आणि तरीही बाळ रडते तर तुम्ही बाळाला जास्तीचे खाऊ घालत आहात.

४) मोठी ढेकर

ढेकर म्हणजे पोटातील हवा तोंडाद्वारे बाहेर येणे. जर मुलांना जास्त खाऊ घातले तर त्यांचा विंडपाईप मध्ये गरजेपेक्षा जास्त काळासाठी अडथळा निर्माण होतो आणि संवेदनशील होतो. याच कारणामुळे त्यातून हवा आल्यास ढेकारेचा मोठा आवाज निर्माण होतो. जर हे वारंवार घडत असेल तर लक्ष दया. कधी कधी बाळाला कफ असेल तरीदेखील असे होते. डॉक्टरांना सल्ला अशावेळी घ्या.

५) बाळाचे वजन सरासरीपेक्षा जास्त वाढते

तुमचे बाळ गुटगुटीत आणि चब्बी असेल तर गोंडस दिसते. परंतु याचसोबत लठ्ठपणा देखील अनेक आजारांचे निमंत्रण ठरू शकतो. तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन बाळाची नियमित तपासणी करून घ्या. जर वजन गरजेपेक्षा जास्त वाटत असेल तर तुम्ही आत्तापासूनच योग्य पूल उचलुन बाळाच्या आहाराविषयी पुनर्विचार करणे उचित ठरेल. 

साभार- श्रावणी कुलकर्णी   

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon