Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

बाळाला जास्त काळ स्तनपान दिल्याने त्याचे दात खराब होतात का ?

नवजात बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच मातेच्या स्वास्थ्यासाठी बाळांतपणात स्तनपान हे अतिशय महत्वाची भूमिका बजावते. यात बाळाच्या वाढीसाठी लागणारी सर्व महत्वाची पोषकद्रव्ये असतात. असे असले तरी बाळाला जास्त काळापर्यंत स्तनपान देणे त्याच्या दातांच्या आरोग्यासाठी उचित ठरत नाही. एका संशोधनाच्या माहितीवरून, जर शिशुचे स्तनपान जास्त काळ चालात राहिले तर ECC म्हणजेच अर्ली चाईल्डहूड कॅरीयर्स ( यास बेबी बॉटल टूथ डिके असेही म्हणतात.)चे प्रमाण वाढू शकते. ECC हे एक प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन असते ज्यात स्त्रेपटोकॉकस (streptococcus) आणि लॅक्टोबॅटीलस( lactobacillus) या बॅक्टेरियांची वाढ होते. ज्या शिशूच्या तोंडात या बॅक्टेरियांची वाढ होते त्यांचे दात खराब होण्यास सुरवात होते. यावर वेळीच उपचार न घेतल्यास ही परिस्थिती अजून बिघडू शकते.

दुध किंवा ज्यूस यांसारखे द्रवपदार्थ लहान मुलांसाठी योग्य समजले जातात. या द्रव पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. बाटलीतले दुध किंवा स्तनपान यात लॅक्टोस असते. ज्या शिशूंच्या दंतारोग्याची काळजी घेतली जात नाही त्यांच्या दातात या बॅक्टेरियांच्या वाढीमुळे दात खराब होण्याची शक्यता असते. कारण हे बॅक्टेेरिया साखरेला अॅसिडमध्ये बदलतात आणि यामुळे दात लवकर खराब होतात. लहान मुलांचे दात मजबूत नसतात आणि त्यामुळे त्यांच्यात ही समस्या उद्भवण्याच्या संधी जास्त असतात.

केवळ स्तनपान जास्त काळ दिल्याने मुलांचे दात खराब होतात असे म्हणणे चुकीचे ठरेल. याउलट एका संशोधनात असे म्हटले आहे की, मातेच्या दुधात लॅक्टोफेरीन (Lactoferrin) असते. हे एक प्रकारचे प्रोटीन असून या प्रोटीन मध्ये स्त्रेपटोकॉकस आणि लॅक्टोबॅटीलस सारख्या बॅक्टेरियांचा नाश करून दातांची कीड रोखण्याचे गुणधर्म असतात. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दातांचे आरोग्य राखण्यासाठी मातेचे दुध अतिशय महत्वाचे असते.

जरी काही शिशूंच्या बाबतीत जास्त काळापर्यंत चालणारे स्तनपान दातांच्या खराब होण्यामागचे कारण ठरू शकते तरीही हे सामान्यतः कारण असू शकत नाही. दातांच्या समस्यान्मागे अजूनही अनेक कारणे असू शकतात. अनेकदा, वरून दिली जाणारी सप्लिमेंट्स (जसे की, सॉलिड फुड्स, फोर्मुला दुध, फळांचा रस, फळांचा गर किंवा भाज्यांचा रस) आणि तोंडाच्या आरोग्याची योग्य निगा न राखली जाणे यामुळे देखील दात खराब होऊन किडू शकतात.

स्तनपान हे कधीही चांगलेच असते. स्तनपान देणे बाळाच्या आरोग्यासाठी योग्यच असून केवळ तुमच्या बाळाला स्तनपान देण्यासोबत त्याचे दात आणि तोंडचे आरोग्य उत्तम राहील याची काळजी घ्या.

स्तनपान झाल्यावर बाळाचे दात आणि हिरड्या स्वच्छ करा. बाळाच्या दातांची काळजी घेणे तुमचे काम आहे.

जर तुम्ही बाळाला बाटलीतून पाजत असाल तर जास्तीची काळजी घेणे गरजेचे

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon