मातेच्या अंगावरच्या दुधाची जागा कोणतेच दूध घेऊ शकत नाही. स्तनपान हे फक्त बाळाच्या भुकेसाठी नसते तर ते बाळ आणि आईचे नाते घट्ट होण्यासाठी सुद्धा असते. पण काही मातांची समस्या असते की, त्यांना अंगावरचे दूध येत नसते, खूप कमी अंगावरचे दूध येत असल्याने त्यात बाळाची भूक भागत नसते. तेव्हा त्यांच्यापुढे फॉर्मुला दूध चा पर्याय असतो. पण फॉर्मुला दूध देण्याअगोदर बाळाला दीड वर्षाचा होऊ द्या. फॉर्मुला किंवा गाईचे दूध काही वेळा मुलांना कितपत पचते हाही मोठा प्रश्न असतो. आणि हे दूध किती दयायचे याच्याबाबतीत काही कळत नसते. याची उत्तरे ही बाळाचे वजन किती आहे आणि कसे वाढतेय याच्यावर असते. त्यापेक्षा सोपी गोष्ट करायची की, बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा जोपर्यत बाळाचे पोट भरत नाही तितक्या वेळ बाळाला दूध पाजत राहायचे. या लेखात तुम्हाला फॉर्मुला दूध बाळाला कसे देता येईल.
१) कोणत्या प्रकारची फॉर्मुला दूध आहे
फॉर्मुला दूध ही स्तनपानामधून जितक्या प्रमाणात पोषक तत्वे मिळत असतात त्याचप्रमाणे फॉर्मुला दूध बनवले असते. बाळाला जितक्या प्रमाणात पोषक घटक पाहिजे ते त्यातून मिळतात. बरीच फॉर्मुला दूध हे गायीच्या दुधातून बनवलेली असतात. आणि जर तुमचे डॉक्टर बाळाच्या प्रकृतीनुसार जे दूध सांगतील ते घेऊ शकता.
फॉर्मुला दूध बनवण्याचे तीन मार्ग आहेत : १. डायरेक्ट तुम्ही ते दूध बाळाला गरम करून दूध देऊ शकता २. थोडं पाणी मिसळून देऊ शकता ३. पावडर चे सेरेल्स सारखे देऊ शकता.
२) बाळाला किती प्रमाणात फॉर्मुला दूध पुरेसे आहे
बऱ्याच नव्या बाळांना प्रत्येक तासानंतर खाऊ घालावे लागते. पहिल्या आठवड्यात फॉर्मुला दूध बाळाच्या मागणीनुसार द्यावे.
बाळाच्या भुकेपेक्षा जास्त द्यायची गरज नाही कारण बाळाचे वजन कमी होणार नाही. आणि जास्त द्यायला लागलात तर बाळ उलटी करून सर्व दूध बाहेर काढेल. २ महिन्यानंतर बाळाची भूक ही वाढेल आणि आता दूध देण्याचे प्रमाण वाढवू शकता. ६ महिन्यानंतर फॉर्मुला दुधाच्या ५ बाटल्या देऊ शकता. आणि सहा महिन्यानंतर तुम्ही इतर आहार देऊ शकता.
३) फॉर्मुला दूध देताना या गोष्टी लक्षात ठेवा
स्थिती : दूध पाजत असताना, बाळाचे डोके हळूहळू वर करून घ्यावे, आणि बाटली व्यवस्थित धरून ठेवावी कारण बऱ्याच वेळा बाळ जेव्हा बाटलीतून दूध पीत असते तेव्हा चुकीच्या पद्धतीने बाटली धरल्यास अर्धी हवाच पोटात जात असते. आणि त्यामुळे बाळाचे पोट भरत नाही.
२. बाळाची डायपर चेक करत जा कारण दुधामुळे असे होत आहे की, काही वेगळ्या कारणांनी. अशा वेळी वाटल्यास बाळांच्या डॉक्टरांना कॉल करून विचारून बघा.
३. बाळाची दूध पिण्याची बाटली तपासून घ्या. बाटलीचे तोंड खूप कठीण नाही ना ? कारण त्याच्यामुळे बाळ दूध पिण्यासाठी संघर्ष करत असतो हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही.
४. बाळाचे दूध पिल्यावर बाळ किती छान खेळायला लागते नाहीतर झोपून जाते. मग त्या बाळाला आपण “ आनंदी बाळ” म्हणू शकतो.
