Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

बाळाला दुधाची पदार्थ केव्हा द्यावीत? आणि त्यांची ऍलर्जी कशी ओळखावी ?


बाळाला दूध आणि दुधाचे पदार्थ केव्हा द्यायचे ? हा प्रश्न खूप मातांना पडत असतो. आणि काही आईणी सुद्धा हा प्रश्न विचारला होता. पण माझ्या बाळाला ह्यामुळे ऍलर्जी होऊ शकते का ? आणि काही वेळा ज्यावेळी आईला अंगावरचे दूध येत नसते त्यावेळी ह्याच दुधाचा पर्याय वाटतो. आणि दही, चीज, किंवा पनीर ह्याही गोष्टी बाळाला देता येतील का ? आणि कितव्या वर्षीच्या बाळाला देता येईल ?

* तुम्ही केव्हा बाळाला डेअरी व दुधाचे पदार्थ देऊ शकता ?

१) दही

आठ महिन्यापासून तुम्ही बाळाला दही देऊ शकता पण त्या अगोदर तुम्हाला किंवा नवऱ्याला दहीची किंवा दुधाची ऍलर्जी आहे का ? ते तपासून घ्या. आणि बाळाला अगोदर थोडी - थोडी द्यावी. आणि तपासावे की, त्याला लगेच ऍलर्जी तर होत नाही ना ? दही सर्व प्रकारचे पौष्टिक पदार्थ देत असते. त्यामध्ये प्रोटीन, फॅट, कॅल्शियम, पोटेशियम, आणि बाळाच्या पोटासाठी पचायला सुद्धा सहज आहे. ह्यात तुम्हाला व्हिटॅमिन D मिळून जाते.

पण जर तुमच्या बेबीला लॅक्टोज ची समस्या असेल किंवा दुधाची ऍलर्जी होत असेल, आणि इतर त्वचेच्या समस्या असतील तर दही आता देऊ नका. काही महिन्यानंतर द्या. किंवा लहान बाळाच्या डॉक्टरांना बेबीला दाखवून बोलून घ्या.

* तुमच्या बाळाला डेअरी च्या पदार्थाची ऍलर्जी असेल तर

अगोदर सांगितल्याप्रमाणे जर घरातल्या तुमच्या दोघांपकी कुणाला दुधाची ऍलर्जी असेल तर बाळाला कमीतकमी एक वर्षापर्यँत दूध देऊ नका. १ वर्षानंतर बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे त्यावेळी ऍलर्जी कमी होत जाते. किंवा बाळ सहन करू शकतो.

* बाळाला दुधाची ऍलर्जी आहे कसे ओळखायचे ?

तुम्ही बाळाला दुधाचे पदार्थ द्या आणि ३ दिवसपर्यंत बाळाचे निरीक्षण करा त्याला काही समस्या येत आहेत का ? ते बघा. आणि दुसऱ्या वेळी पार्ट ३ दिवसांनी द्या.

* काही सामान्य लक्षणे एलर्जीचे

१) लाल खाजणारी पॅचेस(पुरळ)

२) सुजलेली ओठ किंवा डोळे

३) नवीन पदार्थ खाल्यावर लगेच उलटी होणे

जर तुम्हाला ही लक्षणे बाळामध्ये दिसू लागली तर नवीन पदार्थ देणे बंद करा आणि त्वरित डॉक्टरांची भेट घ्या.

आणि दुसऱ्या पदार्थ देण्यातही झाले तरी सुद्धा हीच कृती करा.

ह्या गोष्टी लक्षात घ्या

दही, चीज, किंवा इतर पदार्थ देण्याअगोदर एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon