Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

तुमच्या तान्ह्याला ऍसिडिटी झाल्यावर काय कराल…(बाळालाही ऍसिडिटी होते)

आपल्याला असे वाटते की, ऍसिडिटी ची समस्या ही मोठयांनाच असेल पण खरं म्हणजे ऍसिडिटी ही तान्ह्या बाळांनाही होत असते. त्यांनाही खट्टी ढेकर येत असते. आणि हे तेव्हा होते ज्या वेळी आई काहीतरी उलटे - सुलटे खाऊन घेते त्यावेळी त्याचा परिणाम बाळावर होऊन बाळाला त्रास होत असतो. पण कसे ओळखायचे की, बाळाला ऍसिडिटी झाली आहे. कारण आपण बोलून सांगू शकतो की, ऍसिडिटी झालीय पण बाळ कसे सांगेल ? तेव्हा आम्ही काही गोष्टी सांगतोय की कोणत्या लक्षणांनी बाळाला ऍसिडिटी झालीय.

बाळांमध्ये अशी लक्षणे आढळल्यावर

१. बाळाला दुधाची उलटी होत असते आणि त्या उलटीमधून खट्टी ढेकरचा वास येईल.

२. पोट खराब होऊन जाईल आणि बाळ पुन्हा - पुन्हा रडत राहील.

३. बाळ दूध पिणे बंद करून देते आणि त्याचे पोट फुगलेले वाटते.

४. बाळाच्या पोटात दुखत असल्याने बाळ रडत असतो.

५. बाळाच्या तोंडातून कफ किंवा लाळ सारखे निघत असते.

वरती दिलेल्या गोष्टी जर बाळाच्या बाबत होत असतील तर बाळाला ऍसिडिटीची समस्या असू शकते. ह्यावेळी बाळ खूपच त्रासलेला आणि अस्वस्थ असतो.

ह्या उपायांनी तान्ह्याची ऍसिडिटी दूर करता येईल

असे कोणतेही खाणे खाऊ नये की, त्याच्याने तुम्हाला ऍसिडिटी होईल. कारण हीच वेळ असते की, बाळ पूर्णपणे आईच्या खाण्यावर अवलंबून असल्याने बाळाला त्याच्यातून त्रास होतो. आईला जशी आईस्क्रीम खाल्याचा त्रास होतो तशी ती गोष्ट आहे. आणि तो आईच्याच दुधावर अवलंबून असतो. म्हणून आईने ऍसिडिटी होणारी पदार्थ खाल्लीत तर बाळालाही ऍसिडिटी होईल.

ओवाचे शेक बाळाला द्या

जेव्हाही बाळाला वरती दिलेला त्रास किंवा ऍसिडिटी झाली असेल तेंव्हा बाळ रडते, दूध नाही पीत, त्याचे पोट फुगते तेव्हा बाळाला ओवा तव्यावर गरम करून त्याचा शेक बाळाच्या पोटावर शेका. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही ओवा ला तेलात टाकून ते तेल गरम करून बाळाची मालिश करू शकता. बाळाला खूप आराम मिळतो.

 

बाळाला थोडा मसाज

अशा वेळी बाळाला थोडा मसाज द्या जसे की, हात - पायांची थोडी हालचाल करून घ्या. म्हणजे बाळ थोडा रिलॅक्स होईल.

आणि जर हा त्रास नेहमी नेहमी होत असेल तर डॉक्टरांची भेट घेऊन घ्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon