Link copied!
Sign in / Sign up
40
Shares

तुमच्या तान्ह्याला सकाळी झोपेतून उठवण्याचे प्रेमळ उपाय

रोज सकाळी अलार्म वाजताच प्रत्येक आई सर्वात आधी मुलांच्या खोलीत जाऊन त्यांना उठवते. सकाळी शाळेत जाण्याची घाई आणि घर आवरायची घाई या सगळ्यात झोपेचा वेळ म्हणजे सुवर्णकाळ वाटतो. मुलांना सकाळी उठवण्याचे काम वाटते तितके सोप्पे नाही. त्यांना त्यांच्या गाढ झोपेतून उठवणे आणि ब्रश करण्यासाठी प्रवृत्त करणे देखील खूप अवघड असते. त्यांच्या आळसाला सकाळी सकाळी घालवण्याचे दिव्य काम प्रत्येक आईला करावे लागते.

तुमच्या लाडक्या झोपाळू मुलांना उठवण्याच्या काही टिप्स इथे दिल्या आहेत.

१. शांत झोप महत्त्वाची

मुलांना शांततेत झोपायला मिळाल्यास त्यांना गाढ झोप लागते. याने सकाळी उठल्यावर त्यांना फ्रेश वाटेल. त्यांच्या झोपण्याच्या वेळी घरात शांतता ठेवा. अति आवाज आणि मधून मधून जाग आल्याने झोप निट होत नाही आणि चीडचीडेपणा वाढतो.

२. झोपण्याची वेळ

मुलांना कमीतकमी ७-८ तास झोप महत्त्वाची आहे. याने त्यांचे मन आणि डोके शांत राहील. जर तुम्ही मुलांना सकाळी ७ वाजता उठवत असाल तर रात्री ते ११ वाजेपर्यंत किंवा आधी झोपतील असे बघा.

३. अलार्म लावून ठेवा

मुलांच्या खोलीत अलार्मचे घड्याळ वेगळ्या ठिकाणी ठेवा जेणेकरून त्यांना स्वतः उठून अलार्म बंद करावा लागेल. अशाने त्यांना उठावेच लागेल आणि झोपही उडेल.

४. स्नूझ नसलेले अलार्म घड्याळ

तुमचे लाडके खूप हुशार आणि चपळ असतात. मोबाईलच्या अलार्म मधले स्नूझ चे बटन दाबून ते परत त्यांच्या झोपण्याच्या गाढ अवस्थेत जाण्याचे बघतात. अशाने ५-५ मिनिटे उशीर होत राहील.

५. खोलीत सूर्यप्रकाश येऊ दया

सूर्याची किरणे खोलीत येतील असे बघा. खास करून मुलांच्या पलंगावर थेट पडलेली सूर्याची किरणे त्यांना १० मिनिटात उठवतील. खिडक्या उघडून त्यांना थेट सूर्याचे दर्शन देणे त्यांना थोडे त्रासदायक असले तरीही हा उपाय नक्की काम करतो.

६. प्रभात व्यायाम !

सकाळी उठल्यावर थोडा शारीरिक व्यायाम केल्यास मुलांना फ्रेश वाटेल. स्ट्रेचिंग , जम्पिंग जॅक्स, थोडी कवयत त्यांना उठल्यानंतर आळस घालवण्यास मदत करेल. त्यांना अशाने व्यायाम करण्याची आरोग्यदायी सवयही लागेल. सकाळचे कोवळे उन आणि व्यायाम दोन्ही शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त असते.

७. खास न्याहारी !

मुलांना त्यांचा आवडता नाश्ता असल्याचे कळल्यास ते पटकन उठतात. त्यांच्या आवडीचे पदार्थ ब्रेकफास्टला आहे असे कळताच त्यांचा आलास पळून ते लगेच ब्रश करायला उठतात. तेंव्हा त्यांना उठवण्यासाठी तुम्ही ही टीप वापरू शकता.

८.  झोपण्यापूर्वी या गोष्टी लपवा

झोण्यापुर्वी कमीत कमी ४५ मिनिटे आधी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही रिमोट ह्या गोष्टी  मुलांच्या हातात पडू देऊ नका. झोप येण्यासाठी पुस्तक वाचन हा सर्वात चांगला उपाय आहे. झोपण्यापूर्वी मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे या गोष्टींपासून त्यांना दूरच ठेवा.   

९. रूम फ्रेशनर वापरा

झोपण्यापूर्वी छान मंद वासाचे सुगंधी रूम फ्रेशनर त्यांच्या रूम मध्ये वापरा. याने शांत झोप येण्यास मदत होते.

पण यापैकी कोणतेच उपाय काम करत नसतील तर....

१०. पंखा बंद करा !

मुलांना उठवण्यासाठी प्रत्येक आईकडे असणारा शेवटचा आणि रामबाण उपाय म्हणजे खोलीतला पंखा बंद करणे. असे करणे खूप क्रूरतेचे (विनोदात) असू शकते पण हा उपाय नक्कीच काम करतो. पंखा बंद झाल्यावर गाढ झोपेतुनही लोकं उठतात. खूप उशीर होत असेल तर हा तुमच्याकडचा शेवटचा पर्याय असू शकतो.!
Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon