Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

बाळाला योग्य आणि विनात्रास स्तनपान देण्याच्या काही टिप्स

आईचा दुध म्हणजे नवजात मुलासाठी सर्वोत्तम आहार. ज्यामुळे त्यांना त्यांचे सुरुवातीच्या रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत होते आणि हे मुलाला योग्य पोषण मिळते म्हणूनच, हे स्तनपान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमीत कमी पहिल्या सहा महिन्यांत बालकांना स्तनपान दिले जाते आणि देणे आवश्यक असते. परंतु, नवीन मातांसाठी, स्तनपान हे त्रासदायक सु शकते कारण योग्यरीत्या स्तनपान कसे द्यावे, बाळाचे पोट भरते ना ? या सगळ्या गोष्टी बघणे आणि खात्री करणे हे नवमातांना अवघड जाऊ शकते. ज्यास भरपूर लक्ष देणे आवश्यक असते , आपल्यासाठी हे सोपे करण्यासाठी आम्ही काही टिप्स देणारा आहोत.

१. बाळाला स्तनपान करण्यास मदत करा.

संपूर्ण स्तनपान प्रक्रियेमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला स्तनपान करवणे. हे अत्यंत महत्वाचे आहे की आपले पिल्लू योग्यरित्या दूध ओढत आहे ना ?चुकीच्या स्तनपान पद्धतीनेमुळे बाळ अर्धपोटी राहण्याची शक्यता असते योग्य आहे. बाळ स्तनाग्रांद्वारे योग्य दूध ओढत आहे ना ? का स्तनाचा दुसरीच भागाला चोखत आहे. यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. म्हणून बाळाला आपण थोडीशी मदत करणे आवश्यक असते.

२. बाळाला ठरवू द्या

जेव्हा तुमचे बाळाला भूक लागते त्यावेळी ते आपोआप रडतात. त्यांना सतत जबरदस्तीने पाजू नका. काही दिवस नंतर तुम्हांला बाळाच्या भुकेचे वेळापत्रक कळेल त्यानुसार त्याला स्तनपान द्या. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच काही तासाच्या अंतराने स्तनपानाचे वेळापत्रक बनवा

३. योग्य आणि संतुलित आहार घ्या.

तुम्ही जे खाता ते स्तनपानाद्वारे बाळाला मिळत असते. म्हणून, तुम्हांला पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. जय घटकांद्वारे मुलाला पोषण मिळेल असे पदार्थ तुम्ही आहारात समाविष्ट करणे आवश्यक असते. असे केले तरच आपण आपल्या लहान मुलाला योग्य दूध देण्यास समर्थ व्हाल.

४. बाळाच्या जन्मानंतर लगेच स्तनपान देणे सुरु करा.

ते जन्मानंतर लगेचच स्तनपान देणं महत्वाचे आहे. आपल्या शरीरात निर्माण होणारे प्रथम दूध म्हणजे आपल्या बाळाच्या वाढीस आवश्यक असलेले पोषक घटक असणारे दूध असते असतात. आणि म्हणूनच, आपल्या बाळाच्या जन्मानंतरच्या एका तासातच आपण आपल्या बाळाला पाजण्यास सासांगितले जाते. तसेच, यामुळे स्तनपान कसे करावे हे बाळाला त्यांना समजून घेण्यात मदत होते. परंतु जन्मांतराचे स्तनपान किती वेळात द्यावे हे डॉक्टरांकडून त्यावेळी माहित करून घेणे तेव्हढेच आवश्यक असते.

५.स्तनपान देताना बाळाला आरमदायक पद्धतीने पकडा  .

स्तनपानाच्या दरम्यान, तुम्हांला बाळाला पकडून ठेवणं आवश्यक असते आणि यामुळे जर तुम्ही आरामदायक अवस्थेत नसाल तर तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि त्यामुळे बाळाला देखील योग्यरीत्या स्तनपान देणे अवघड जाते. म्हणूनस्वतःसाठी आणि बाळाला दोन्हीसाठी सर्वात सोयीचे जागा आणि अवस्था माहिती असणे महत्वाचे आहे. अशा प्रकारे आपल्या बाळास योग्य पोषण मिळेल आणि आपल्याला देखील अवघडयासारखे होणार नाही.

या गोष्टींमुळे बाळाला स्तनपान देणं सोपे होईल आणि बाळ उपाशी किंवा अर्धपोटी देखील राहणार नाही. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon