Link copied!
Sign in / Sign up
132
Shares

बाळाला स्तनपान देताना मोबाईल फोन वापरल्याने काय होते ?

स्तनपान हे बाळासाठी आणि आईच्या आरोग्यासाठी दोघांसाठी महत्वाचे असते. यामुळे बाळाला पोषण मिळते तसेच आईला देखील शाररिक स्थिती पूर्ववत होण्यास मदत करते. पण बाळाला स्तनपान देत असताना हल्ली आई नुसती बाळाकडे बघत बसलेली नसते तर तिच्या एका हातात मोबाईल असतो बाळाचं पिणे चालू असते. त्यावेळी आईच्या हाताला काहीतरी चाळा,टाईमपास किंवा एखादं  महत्वाचं काम म्हणून ती मोबाईल मध्ये डोकावत असते. परंतु स्तनपान देताना मोबाईल फोन वापरल्याने काय परिणाम होतात याची तुम्हांला माहिती आहे का ? तर आज याची  माहिती आज आम्ही देणारा आहोत.

      १. डोळ्यावर होणारा परिणाम

आई मोबाईल मध्ये बघत असताना त्यातील लाईटचा प्रकाश हा बाळाच्या डोळ्यांवर पडून बाळाच्या नाजूक डोळ्यांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

२. आई-बाळाची नजारा-नजर (eye contact)

आई आणि बाळा यांच्यात एका बंध निर्माण होण्यासाठी एकमेकांची एकमेकांशी नजर-नजर होणे म्हणजे eye contact होणे गरजेचे असते. आई ज्यावेळी स्तनपान देत असते त्यावेळी बाळ आईच्या सगळ्यात जास्त जवळ असतं. आई बाळ ज्यावेळी अगदी तान्हे असताना त्याला स्तनपान आणि आईचा चेहरा या दोनच गोष्टी जास्त ओळखीच्या असतात. ते सतत आईकडे बघून असतं, त्या दरम्यान नजर कमी असली तरी ते आईचा चेहरा निरखण्याचं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि अश्यावेळी तुम्ही बाळाकडे न बघता जर फोन मध्ये बघत असाल तर मग काय होईल…

३. मोबाईल रेडिएशन

मोबाईल मधून उत्सर्जित होणाऱ्या विकिरणे (रेडिएशन)ही सगळ्यांसाठी वाईट असतात परंतु विशेषतः बाळाच्या नाजूक त्वचेला तसेच इतर भागांना देखील हानिकारक असतात. त्यामुळे भविष्यात बाळाला तसेच आईला विविध आजार होण्याची शक्यता असते.

४. बाळ उपाशी किंवा अर्धपोटी राहण्याची शक्यता

बाळाला स्तनपान देताना तुम्ही फोनवर व्यस्त असताना एखादा लेख तल्लीन होऊन वाचत असता. त्यावेळी बाळा स्तनपान करत आहे का त्याचे तोंड स्तनपासून बाजूला झाले आहे. याकडे तुमचे दुर्लक्ष होते आणि बाळचे पोट भरत नाही. आत्ता जरी हे तोटे वाचत असताना बाळाला पाजत असाल तर आधी बाळाला स्तनपान द्या आणि मग हा लेख वाचा.

५. बाळाच्या वागणुकीतील बदल

जस-जसं बाळ ४-५ महिन्याचा होतं तसं-तसं वस्तू ओढू लागतं. त्याला त्या मोबाईल विषयी आकर्षण वाटू लागतं आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या हातातीलमोबाईल देणे टाळता त्यावेळी ते चिडते,रडायला लागते. यामुळे त्यांना हट्टीपणची सवय लागण्याची शक्यता असते. पुढे त्यांना एखादी वस्तू दिली नाही की मग ते रडू-लागतात चिडतात आणि यामुळे भविष्यात असा त्यांचा चिडखोर आणि रागीट स्वभाव होतो.

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

मुख्य छायाचित्र सौजन्य : CORBIS

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon