Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

बाळाच्या दात येण्याविषयक सहा टिप्स ज्या खरोखर उपयुक्त आहेत

कोणत्याही बाळाच्या आयुष्यातील मैलाचा दगड म्हणजे, त्याला दात येण्याची प्रक्रिया सुरू होते तो क्षण होय! मातांसाठी हा संदेशच असतो की, लवकरच तुमचे बाळ विविध पदार्थ खाण्यास आणि स्पष्टपणे बोलण्यासही सक्षम होईल. दात येण्याची प्रक्रिया अर्थातच वेळ घेते; पण बाळाला आपल्या तोंडामध्ये दात येण्याची रोमांचक अनुभूती येते राहते आणि त्यानुसार ते प्रतिक्रिया देत राहते. पण बाळांनी या प्रक्रियेस हानी पोचवू नये वा मातांना वेदना पोचवू नये यासाठी या प्रक्रियेमध्ये मातांना विशेष काळजी घ्यावी लागते. आणि म्हणूनच तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मदत व्‍हावी; यासाठी आम्ही येथे काही टिप्स देत आहोत:

१. स्तनपान

आईचे दूध हे पुष्कळ पोषक द्रव्यांनी आणि उपयुक्त घटकांनी परिपूर्ण असते; जे बाळाला मजबुती तर देतेच, शिवाय त्याची एकूण ताकदही वाढवते. तसेच जेव्हा दात यायची प्रक्रिया चालू होते; तेव्हा त्याच्या शरीरात विविध हार्मोन्स निर्माण होतात. आईचे दूध हे या हार्मोन्सच्या निर्मितीला हातभार लावते आणि म्हणून तुमच्या बाळाला योग्य प्रकारे दुध पाजणे हे महत्त्वाचे आहे. पण तुमचे बाळ हे नेहमीच तुमच्या स्तनांचा चावा घेत नाही ना, यावर ध्यान ठेवा. हे चावणे तुमच्या स्तनांना गंभीर हानी पोहोचवू शकते.

२. वेदना 

बाळाला दात येण्याच्या प्रक्रियेमध्ये वेदना होण्याची भरपूर शक्यता असते; कारण तेव्हा हिरडया निर्माण होतात आणि त्यातून दात येण्यास सुरुवात होते. म्हणून तुम्हाला तुमचे बाळ यावेळी नेहमी रडताना आढळून येईल; कारण त्यांच्या जबड्यात खूप वेदना होत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता आणि तुमच्या बाळासाठी काही सौम्य वेदनानिवारके घेऊ शकता. पण ही वेदनानिवारके तुमच्या बाळाच्या दात येण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे बाधा आणत नाहीयेत ना, याची पूर्ण खात्री करून घ्या.

३. हिरड्यांना मालीश करणे

तुमच्या बाळाच्या हिरड्यांमधील वेदना कमी करण्यासाठी आणि दात येण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी तुम्ही ही एक कृती करू शकता. ती म्हणजे- हिरड्यांना मालीश करणे. यामुळे त्यांच्या हिरड्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि तसेच त्यातील रक्तप्रवाहातही सुधारणा होते. ताठर स्नायू हे बहुतांशी वेळा वेदनादायक असतात आणि जर तुम्ही त्यांना आराम दिला; तर वेदना लक्षणीय प्रमाणात कमी होते.

४. त्यांना विचलित करा

जर बाळ वेदनांमुळे खूपच रडत असेल; तर हे तुमच्यासाठी निश्चितपणे परिणामकारक ठरू शकते. फक्त त्यांना वेदनेपासून विचलित करण्यासाठी काही गोष्टी करा आणि ते नक्कीच रडणे थांबवतील. ही वेदना त्यांच्या दात येण्यासाठी गरजेची गोष्ट असते आणि ती अनुभवणे त्यांच्यासाठी सोपे आणि आरामदायक बनवणे, एवढेच तुम्ही करू शकता.

५. कोल्ड थेरपी

वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी मातांनी करावयाची आणखी एक गोष्ट म्हणजे कोल्ड थेरपी! हीसुद्धा एक परिणामकारक पद्धत आहे. एक चमचा तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये थोड्या वेळासाठी ठेवा आणि त्याला थंड होऊ द्या. तो चमचा तुमच्या बाळाच्या तोंडात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही थंडाव्याचा आधार घेऊन बाळाच्या हिरड्या काही काळ बधिर करता आणि त्यांना आराम देता. यामुळे मग ते अनुभवत असणारी वेदनाही पुष्कळ प्रमाणात कमी होते.

६.  च्यू (चर्वण) थेरपी

दात हे गोष्टींचे चर्वण करण्यासाठी बनलेले असतात आणि जेव्हा हे दात यायला चालु होतात; तेव्हा त्यांना काही तरी नरम गोष्टीचे चर्वण करायला देणे, हे भरपूर सहाय्यकारक ठरते. चावण्याची क्रिया आणि निर्माण होणाऱ्या दातांचा दाब हे तेथील स्नायूंना वाकविण्यात आणि वेदना शमविण्यास मदत करतात. तुम्ही त्यांच्या चावण्याच्या क्रियेसाठी वेगवेगळी खेळणी किंवा काही कपडे देखील वापरू शकता.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon