Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

बाळाच्या सर्दी व खोकल्यावर घरगुती उपाय … भाग २


तुमच्या तान्हाला दररोज काहींना काही होताच असते ते कशामुळे होते तर ते बऱ्याचदा पाणी उकळलेले नसते म्हणून. तान्हाला पाणी देताना पाणी उकळलेले असावे. (० ते ६ महिन्याच्या बाळाला पाणी देऊ नये. ह्याविषयी तुम्ही tinystep मराठीवर ब्लॉग वाचू शकता.) आता बाळांच्या सर्दी व खोकल्यावरती घरीच काय घरगुती उपाय करता येतील त्याविषयी.

१) लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर

१ छोटा कांदा (मिळाल्यास पांढरा) बारीक चिरून घ्यावा. तोच कांदा ३ कप पाण्यात उकळत ठेवा.

तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून ३-४ वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. ह्या काढ्यामुले छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा शी मधून बाहेर पडतो. छातीतून येणारा आवाज बंद होतो.

(हा उपाय करताना बाळाला पचत असेल किंवा काही त्रास होत असेल तर करू नये.)

२) चार तुळशीची पाने, ३ लवंगा, २ वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे, थोडासा गवती चहा, ४ कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या. (हा काढा २ वर्षावरील मुलांना अर्धा कप ह्या प्रमाणात दिवसातून २ वेळा प्यायला द्या.)

डोक्यात सर्दी भरलेली असेल आणि डोके दुखत असेल तर वेखंड पूड थोडयाशा पाण्यात कालवून कपाळावर लावावी. सर्दी उतरण्यास मदत होते.

३) लहान बाळांच्या छातीत कफ साठून त्रास होत असेल तर २ कप पाण्यात १ चमचा जवस कुटून घालावा. या काढ्यात खडीसाखर घालून उकळून हा काढा कोमट करून ३/४ वेळा बाळांना द्यावा. याने कफ बाहेर पडतो.

४) आल्याचा रस २ चमचे त्यात दीड चमचा गुळ किसून घाला. ते चाटण दिवसातून २ ते ३ वेळेला चाटायला द्यावा. (हे चाटण सुद्धा २ वर्षावरील मुलांना द्यावे ) कोरडा खोकला झाला असेल तर या चाटणाचा उपयोग होतो.

५) कोरडया खोकल्यासाठी जेष्ठ-मधाची बारीक पूड आणि साजूक तूप हे एकत्र करून त्याच्या छोटया गोळ्या करून उबळ आल्यानंतर चघळण्यासाठी देऊ शकतो.

(४ वर्षाखालील मुलांना द्यावा)

कोरडा खोकला घालवण्यासाठी मसाल्याच्या वेलदोड्याचे दाणे बारीक करून त्यात १ चमचा मध मिसळून ४ ते ५ वेळा चाटल्यास उपयोग होतो. पण हे चाटल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये.

खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. ह्याने खोकला कमी होतो. (३ वर्षावरील मुलांपासून सगळ्यांना उपयोगी आहे.)

६) बाळंतिणीने रोज ५ ते ७ तुळशीची पाणी खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकला होत नाही.

त्याचबरोबर लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज २ वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या रोगापासून संरक्षण होते.

बाळाच्या सर्व समस्या व त्यावर उपायाकरिता tinystep मध्ये जाऊन मराठीवर दररोज वाचत रहा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon