Link copied!
Sign in / Sign up
40
Shares

बाळाच्या स्नायूंमध्ये अश्या प्रकारे बळकटी निर्माण करा..

               आपल्या नवजात बाळाची काळजी घेण्याकडे सर्वांचा कल असतो. सुरवातीला ते आपल्या आईच्या हालचालींकडे लक्ष केंद्रीत करते. हळूहळू ते पालथे पडायला शिकतात, रांगायला,बोलायला, चालायला,बोलायला शिकतात. या सर्व गोष्टी आपल्याला दिसायला जरी खूप सोप्या असल्या तरी त्यासाठी बाळाला खूप ताकद लागते. यासाठी एक पालक म्हणून तुमची जबाबदारी असते की, बाळाचे स्नायूंमध्ये ताकद आणण्यासाठी प्रयत्न करावेत. जन्मत: बाळाच्या मानेचे स्नायू हे खूप नाजूक असतात त्यामानाने मेंदूचा भार जास्त असतो.

१. मान धरताना 

 पहिल्या काही महिन्यांमध्ये नवजात बालकांच्या मानेला आधार देण्याची गरज असते. सुरवातीला ते त्यांच्या डोक्याचे वजन पेलवू शकत नाही. मानेचे स्नायू कमकुवत असल्याने मानेचा भार सहन करू शकत नाहीत. त्यांना बळकट करण्यासाठी आपल्या बाळाला काही मिनिटे पोटावर झोपवावे. यामुळे ते स्वत:चे डोके काही सेकंदांसाठी का होईना उचलण्याचा प्रयत्न करतील आणि अवती-भवती काय आहे ते बघतील. हे लवकरात लवकर म्हणजे सहा आठवड्यानंतर सुरवात करा. ही सवय एका रात्रीत घडणारी नाहीये याला काही महिने जावे लागतात ज्यामुळे तुमच्या बाळाच्या मानेत तेवढी ताकद येईल.

२. पालथे पडताना

 तुमचे बाळ काही महिन्यातच स्वत:च्या पाठीला आणि पाश्र्वभागावर जोर देऊन पालथे पडण्याचा प्रयत्न करू लागते. परंतु या क्रियेस खूप ताकद लागते.काही पालक मूल पालथे पडायला लागल्यावर घाबरतात कारण पोटावर दाब पडतो. ही खरोखरी चांगली गोष्ट आहे की,तुमच्या देखरेखीखाली बाळाला काही मिनिटे पोटावर झोपू द्या. त्यावेळी त्याच्या आजूबाजूला काही खेळणी ठेवावी. ती बघून उत्सुकतेपोटी त्या खेळण्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात.तुम्ही बाळाचे बारकाईने निरिक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की, बाळ त्याच्या दंडावर जोर देऊन स्वत:ला ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच तुमच्या बाळाच्या हातामधील आणि पायामधील स्नायूत ताकद आली आहे असा होतो.

३.रांगणे 

सातव्या ते दहाव्या महिन्यात तुमचे बाळ हे रांगायला लागते. रांगताना बाळाकडे नीट पाहिल्यास असे लक्षात येईल की, ते ते चार अवयवांवर स्वत:चा तोल सांभाळत आहे. प्रत्येक बाळाची समतोल साधण्याची स्टाइल वेगवेगळी असू शकते. काही मुले रांगताना त्यांच्या पोटावर जोर देतात. बाळ रांगताना त्यांना जमिनीवरील जंतूंच्य भितीने अजिबात अडवू नका.वाढीच्या टप्प्यातली बाळ रांगायला लागणे ही त्याची पहिली पायरी आहे.रांगताना ते अनेक नव्या नव्या गोष्टी शिकते, स्मरणात ठेवते, त्यानुसार खेळते. अशा प्रकारे ते सक्रियपणे रांगते हा त्याच्यासाठी व्यायामाचा एक भाग आहे.

४. बसणे 

मूल बसायला लागण्यासाठी सर्व स्नायूंचे कार्य उत्तम असावे लागते. तुमच्या बाळाला सतत पाठीवर झोपवून ठेवण्यापेक्षा त्यांना बसण्यासाठी प्रोत्साहित करा,हे करताना त्यांना आधार मिळावा म्हणून त्यांच्या आजूबाजूला उशा ठेवाव्यात जर त्यांचा तोल जात असेल तर त्याला पटकन धरण्यासाठी नेहमी तयार राहा.

५. चालणे 

तुमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत पालकांना असे वाटते त्याने पहिले पाऊल टाकावे. हा क्षण प्रत्येक आई-वडीलांसाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा असतो. बाळाचे पहिले पाऊल पडताना कदाचित तुम्हाला खूप हसू येण्याची शक्यता आहे. पण हे पाऊल खरंच खूप क्यूट असते. इवले-इवले पाऊल,इवलीशी बोटे जेव्हा एक पाऊन टाकून अडखळतात तेव्हा लगेच त्यांना उचलून घेऊ नये. मूल पहिल्यांदा पडल्यानंतर त्याच्यासाठी ही खूप मोठी हार असते त्यामुळे ते प्रत्येकवेळी पडल्यानंतर लवकर उठण्याचा प्रयत्न करते. खोलीतील सर्व वस्तू त्यांना खुणावत असतात चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मूल चालायला लागले याचा अर्थ त्याची पचनशक्ती आणि हाडांमध्ये प्रचंड ताकद निर्माण झाली आहे.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon