Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

बाळाला येणाऱ्या काही समस्या

१) बाळाच्या पहिल्या काही महिन्यांत अवयव व इतर शरीरयंत्रणा विकसीत होण्याचे काम चालू असते. त्यामुळे या काळात उलट्या होणे, वारंवार शौचास होणे, डोळ्यातून घाण निघणे हे नॉर्मल त्रास असू शकतात. आजच्या सदरात अशा नॉर्मल त्रासांची चर्चा करू.

२) बरेचदा बाळ दूध पिताना उलटी करतं. अशा वेळी पालकांना दूध पचतं आहे की नाही, इतर काही त्रास आहे का असे प्रश्न पडत असतात. पण, या उलट्या नैसगिर्क असतात. उलटी पांढऱ्या रंगाची दूधा/ दह्यासारखी असून, उलटी केल्यावर बाळ उल्हासित होत असेल व बाळ दिवसातून ४-५ वेळापेक्षा जास्त लघवी करत असेलत तर, या उलट्या हे 'ओकरं बाळसं' समजावे. परंतु, उलटीनंतर लगेच भूक लागणे, लघवी कमी होत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

३) बाळांना होणारे जुलाब हासुद्धा पालकांच्या चिंतेचा विषय ठरतो. काही मुलं दिवसातून २०-२५ वेळा जुलाब करतात तर, काही आठवड्यातून एकदा १ वेळा. ही दोन्ही टोकं आम्हा बालरोगतज्ज्ञांना रोज बघायला मिळतात. बाळाने किती वेळा शी करावी याला कुठलीच मर्यादा नाही. परंतु, शी ही पिवळी व पेल्टसारखी असेल व वारंवार शी करूनही बाळ आनंदी असेल तर, ही शी नॉर्मल आहे. यासाठी कुठल्याही औषधांची अथवा मातेच्या आहारामध्ये बदल करण्याची जरूर नसते.

४) मात्र, शी मधून रक्त जाणे व बाळ सुस्त राहाणे असे प्रकार होत असल्यास या जुलाबांसाठी वैद्यकीय सल्ल्याची जरूर आहे.तसेच, बाळाला काही दिवस शी न होणे व तरीही बाळ आनंदी राहात असेल तर हे शौचाचे पॅटर्न नॉर्मल आहे. मात्र, काही काळानंतर झालेली शी कडक असू नये. याचप्रमाणे डोळ्यातूत घाण येणे, शिंका, उचकी, शी-शू करताना जोर लावणे या गोष्टी नॉर्मल असतात. या त्रासातूनच बाळ घडत असते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon