Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

बाळाच्या जन्मानंतरच्या काही गोष्टी ज्या तुम्हांला विचित्र वाटू शकतात.


गर्भधारणा आणि प्रसूती कितीही वेदनादायक असली तरी प्रत्येक जोडप्याला स्त्रीला ती हवी-हवशी असते. दोघांचा अंश असलेला जीव आपल्या कवेत घेण्यासाठी आई-वडील खूप उत्सुक असतात. नऊ महिने वाट बघितल्यावर येणार तो जीव पहिल्यांदा कवेत घेतानाच तो क्षण कोणतेच आई-वडील विसरू शकत नाहीत. पण बाळाच्या जन्मांतरच्या पहिल्या काही तासातल्या काही गोष्टी अश्या असतात ज्या खरं सर्वसाधारणच असतात पण त्या तुम्हांला कदाचित विचित्र वाटतील. त्या गोष्टी कोणत्या त्या आपण पाहणार आहोत.

१. बाळाच्या अंगावरचे चिकट विचित्र आवरण

जन्मानंतर, बाळाच्या अंगावर पिवळट-पांढरा पदार्थ असतो. हा पदार्थ पदार्थ वर्नीक्स केसोसाचे एक आवरण असते जे बाळाच्या त्वचेपासून जंतूंचे संरक्षण करते हे बाळासाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे आवरण असते. ते पुसून किंवा कोणत्या प्रकारे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काढू नये.

२. बाळचं जन्मानंतर लगेच उलटी करणे

जेव्हा बाळ पोटात असतं त्यावेळीत्यावेळी ते गर्भजलाने वेढलेले असते. त्याला आत श्वास घेण्याची आवश्यकता नसते. पण ज्यावेळी बाळाचा जन्म होतो त्यावेळी त्याला श्वास घेण्यासाठी आधी ऑक्सिजन फुफुसात भरून घेणे गरजेचे असते. त्यासाठी फुफुसातील द्रव भर येणे आवश्यक असते. हा द्रव बाळाच्या पहिल्या उलटीच्या स्वरूपात बाहेर येतो.

३. बाळाची पहिली शी

बाळाची पहिली शी ही बहुतेक वेळा काळसर असते, पहिल्या शी मध्ये गर्भाशयातील त्वचेच्या पेशी आणि इतर काही या असतात. साधारणतः बाळ पहिल्या स्तनपानानंतर ही शी करते. तसेच या नंतर हिरव्या रंगाची तसेचआणि सगळ्यात शेवटी पिवळी असा शी चा रंग बदलत जातो. हा बदलणारा शी चा रंग तुम्हांला थोडा विचित्र वाटू शकतो.

४.नाळेच्या बाबतीतील गोष्टी 

होय, गर्भाशयामध्ये, बाळाला मिळणारे पोषण, आणि त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या बहुतेक नाळेद्वारे मिळत असतात. परंतु बाळ बाहेर आल्यावर मात्र नाळ कापण्यात येते. परंतु उरलेल्या नाळेच्या भागातील द्रव आणि रक्तचा बाळाला उपयोग होत.आणि ते बाळाच्या शरीरात शोषले जाते.आणि हि क्रिया पूर्ण झाल्यावर बाळाच्या उरलेला भाग सुकून जातो आणि गलून पडतो.

५. बाळाच्या अंगातील ब्राऊन फॅट बर्न होते.

ज्यावेळी बाळाचा जन्म होतो त्यावेळी बाहेरील वातावरण हे बाळासाठी आतल्या वातावरणाच्या मानाने खूप थंड असते. आणि या वातावरणाशी बाळाला जुळवून घेण्यासाठी बाळामध्ये असलेली ब्राऊन फॅट बर्न होते. आणि बाळ बाहेरील वातावरणाशी जुळवून घ्यायला तयार होते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon