Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

बाळाच्या जन्मानंतरही तुम्हांला मळमळतं का ?

प्रेग्नंट असणाऱ्या महिलांना मळमळ होणे ही खूप सामान्य बाबा आहे. पण ही गोष्ट अनेक महिलांच्या बाबतीत बाळाच्या जन्मानंतरही कायम राहते. बाळाच्या जन्मानंतर सहसा आठ आठवड्यापर्यंत महिलांमध्ये ही समस्या कायम राहू शकते. बाळाच्या जन्मानंतरही तुम्ही जास्त जेवन करू शकत नाही. याची कारणं पुढीलप्रणाणे आहेत.

१.  डिहायड्रेशन

 स्तनपानामुळे आईचे शरीर डिहायड्रेट होण्याची खूप जास्त शक्यता असते. डिहायड्रेशनमुळे शरीरातील आवश्यक पोषक घटक कमी होतात, त्यामुळे मळमळ होते. त्यासाठी दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यायलाच हवे. तसेच ज्यूस, शेकस आणि इतर पेय प्यावे. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होणार नाही.

२. ऑक्सिटोसिनची निर्मिती

स्तनपान करताना तुमच्या मेंदूतून ऑक्सिटोसीन या हार्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे तुमच्या बाळाला दूध मिळण्यास मदत होते. तसेच तुमच्या गर्भाशयाचा आकारही कमी होतो. तसेच तुम्हाला मळमळ होण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढते.

३. शरीरातील लोहाची कमतरता

 बाळाच्या जन्मादरम्यान प्रसुतीवेळी रक्त गेल्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. लोह असलेली फल खाल्यानंतरही शरीरातील लोहाचे प्रमाण म्हणावे तसे वाढत नाही. त्यामुळे मळमळ होते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंटस घेणे अधिक योग्य ठरते.

४. हार्मोनल चेंज

प्रेग्नन्सीदरम्यान आईच्या शरीरात खूप हार्मोनल आणि शारीरिक बदल होतात. ते पुर्ववत होण्यासाठी काही काळ जावा लागतो. एका रात्रीत ते पुर्ववत होतील, अशी तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. यादरम्यान महिलांना मळमळ होऊ शकते.

त्यामुळे प्रसुतीनंतर मळमळ होणे तसेच चीडचीड होणे यात काळजी करण्यासारखे काहीही नाही. पण प्रसुतीनंतर आठ आठवड्यानंतरही ही समस्या कायम राहत असेल, तर मात्र नक्कीच डॉक्टरांची मदत घ्यावी.          

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon