बाळाच्या जन्मानंतरचा लग्नाचा वाढदिवस कसा साजरा कराल.
बाळाचा जन्माआधी तुमचा लग्नाचा वाढदिवस हि तुमची खासगी बाब असते. परंतु बाळाच्या जन्मानंतर त्यात अजून एक जण सामील होणार असतं. आणि ते खूप लहान आणि गोंडस असतं अश्यावेळी त बाळाला सोडून कोणती गोष्ट साजरी करणं मनाला पटत नाही आणि प्रत्येक ठिकाणी बाळाला घेऊन जाणं शक्य नसतं अश्यावेळी लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करायचा असा प्रश्न पडतो म्हणून त्याकरता आम्ही काही उपाय सुचवणार आहोत.
१) घरीच जेवणाचा बेत करा
घरच्या घरी दोघांच्या आवडते पदार्थ एकमेकांच्या मदतीने बनवून हा दिवस तुम्ही साजरा करू शकता. त्यामुळे दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवत येईल आणि बाळाबरोबर लग्नाचा वाढदिवस साजरा करता येईल.
2) काही वेळासाठी बाहेर फिरायला जा
बाळाला बाहेर घेऊन जाणे शक्य नसेल तर तुम्ही थोड्या वेळाकरता बाळाला त्याच्या आजी आजोबांकडे किंवा घरातली जाणत्या मोठया व्यक्तीकडे सोपवून थोड्यावेळाकारता जवळच कुठे तरी बाहेर फिरायला जाऊ शकता . त्यामुळे तुम्हाला दोघांना एकत्र वेळ मिळेल आणीन बाळाची काळजी देखील वाटणार नाही.
३) बेबी वेलकम पार्टी
बाळ खूपच तान्हे असेल किंवा तुम्ही तुमच्या बाळाला थोड्यावेळ करता पण नजरे आड होऊ दयायचे नसेल तर तुमच्या बाळाच्या आगमनाची पार्टी आणि तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला सगळ्या जवळच्या नातेवाईकांना घरी बोलावा. घरीच मेजवानी करा किंवा बाहेरून मागावा. यामुळे तुमचा लग्नाचा वाढदिवस साजरा होईल.सगळ्यांच्या भेटी-गाठी होतील आणि बाळ देखील तुमच्या डोळ्यासमोर राहील.
४ )एखादा सिनेमा बघायला
बाळ खूपच तान्हं असेल तर घरच्या घरी एखादा सिनेमा बघा आणि घरीच जेवण तयार करा. किंवा बाळ घरातल्या जाणत्या व्यक्ती कडे राहण्या इतपत मोठे असेल तर तर थोडा वेळ तुम्ही एखादा सिनेमा बघायला जाऊ शकता किंवा बाळाला बरोबर घेऊन जाऊ शकता. हल्ली सगळ्या सिनेमा घरात लहान मुल रडायला लागले क्रय रूम असते तिथे त्याला नेऊ शकता . किंवा एखाद्या मॉल मध्ये मुलाला घेऊन जाऊ शकता.
५) लहान मुल आणि तुमच्या सोयीच्या ठिकाणी जा.
जर लहान मुल एकदम तान्हं नसेल तर त्याला एखाद्या अश्या मॉल मध्ये किंवा ठिकाणी घेऊन जाऊ शकता जिथे लहान मुलांचे मनोरंजन होईल लहान मुलांचे खेळ असतील अश्या ठिकाणी त्याला /तिला घेऊन जा.
