Link copied!
Sign in / Sign up
26
Shares

मॅटर्निटी आणि सॅनिटरी पॅड मधील फरक

 

१) बाळाच्या जन्म झाल्यानंतर तुम्हाला २ तासानंतर मॅटर्निटी पॅड बदलावा लागेल. मग हळूहळू ३ ते ४ तासानंतर बदलावे लागतील. ह्यासाठी तुम्ही सॅनिटरी नॅपकिन घेण्यापेक्षा मॅटर्निटी पॅड घ्यावा.  मॅटर्निटी पॅड लांब, मुलायम असतात. हे पॅड वापरण्याने तुम्हाला खूप आराम मिळत असतो.

२) हे पॅड का लागतात ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर डिलिव्हरीनंतर तुमच्या गर्भाशयातून रक्तस्त्राव सुरु होऊन जातो. आणि हे दोन्ही प्रकारच्या प्रसूतीत होत असते

३) ह्या रक्तस्रावाला लोकिया असे म्हटले जाते. हे रक्त एकदम गर्द लाल असते. ह्याचा प्रवाह खूप वेगात असतो. पण ह्याबाबत खूप घाबरून जाऊ नका. हे सामान्यपणे सर्वच स्त्रियांना होत असते.

४) हा रक्तस्त्राव, ज्यावेळी बाळाचा जन्म होतो आणि तुम्ही आराम करत असता, त्याच्यानंतर १२ तासानंतर कमी होऊन जातो. आणि जेव्हा तुम्ही उठून इकडे - तिकडे फिरता तेव्हा जास्त होऊन जातो. कारण तुम्ही शांतपणे आराम करत असता तेव्हा रक्त एकत्र होऊन एका ठिकाणी जमत असते. आणि स्थिती बदल्यावर ते रक्त बाहेर निघते.

५) जर हे तुमचे पहिले बाळ असेल आणि तुम्ही अगोदर टेम्पोन वापरात असाल तर जास्त प्रमाणात रक्त निघाल्यावर तुम्ही टेम्पोन चा वापर करू नका. कारण इन्फेक्शन होऊ शकते. जोपर्यन्त दुसरी मासिक पाळी सुरु होत नाही तोपर्यँत टेम्पोन वापरू नका.  

६) डिस्पोजेबल पॅंटी वापरा जेणेकरून कपडे खराब होणार नाही. ढिल्या व धुता येतील असे कपडे वापरा.

७) तुम्ही पलंगावर प्लॅस्टिकचा कापड टाकू शकता. म्हणजे रक्तामुळे बाकीचे अंथरून खराब होणार नाही. स्वच्छता ठेवत चला त्यासाठी पॅड बदलत राहा व आणि पॅड बदलून झाल्यावर हात धुवून घ्या.

८) अगोदर रक्त हे गर्द लाल असते त्यानंतर ते गुलाबी होऊन पाणी सारखे दिसायला लागते. आणि तिसऱ्या आठवड्यात ते भुऱ्या रंगाचे होऊन जाते.

९)  सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवजात बाळाला स्तनपान करत असता स्तनपानानंतर तुम्हाला रक्तस्त्राव होऊ शकतो. कारण तुमच्या शरीरात ह्यावेळी आॅक्सीटॉसिन हॉर्मोन स्त्रवत असते. हे गर्भाशयातून येत असते. तेव्हा ह्यासाठी तुम्ही मॅटर्निटी पॅड वापरायचा असतो.

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon