Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

बाळाच्या जन्माचा महिना हा बाळाच्या आरोग्याला कसा प्रभावित करतो?

बाळाला जन्माला घालायच्या प्रक्रियेवर तुमचे पूर्ण नियंत्रण असते. परंतु तुमच्या हातात नसणारी गोष्ट म्हणजे ते जन्माला यायचा दिवस (महिना) निश्चित करणे! असे म्हणतात की, जन्माच्या महिन्याचा बाळाच्या व्यक्तिमत्त्वावर विशेष प्रभाव असतो. आपण त्याला जन्मकुंडली म्हणतो आणि आपण आपल्या सर्वांचे आणि आपापल्या वैशिष्ट्यांचे आपल्या राशींनुसार वर्गीकरण करतो. पुष्कळ जणांचा जन्मकुंडलीवर विश्वास असतो; कारण आपण सगळे आपल्या वर्तमान आणि भविष्यकाळाबद्दल जिज्ञासू आणि आशावादी असतोच!

पण समजा आम्ही सांगितले की, जन्माच्या महिन्याचा तुमच्या बाळाच्या आरोग्यावरही प्रभाव असतो तर? याविषयी तुम्ही कधीच ऐकले नाहीय, ना? जर तुम्हाला जन्मकुंडलीबद्दल वाचायला आवडत असेल, तर हा लेख वाचून तुम्ही चकित होऊन जाल.

तुमच्या बाळाचे आरोग्य आणि त्याच्या जन्माचा महिना यांतील संबंधांबाबत आम्ही इथे संपूर्ण माहिती देत आहोत.

या सर्व माहितीला एक शास्त्रीय आधार आहे. खूप काळासाठी या माहितीची छाननी आणि निरीक्षण झालेय आणि त्यानंतरच निष्कर्ष काढला गेला की, याचा बाळाच्या प्रकृतीवर विशेष परिणाम होतो.

एका वैद्यकीय संशोधन गटाने यासंबंधी एक अभ्यास केला आणि त्यांनी १९००-२००० दरम्यान जन्मलेल्या १,७४,९४,००० अर्भकांच्या आणि त्यांच्या जन्माच्या महिन्यांच्या नोंदी केल्या. त्यांच्या लक्षात आले की, एकाच महिन्यात जन्मलेल्या बाळांना नंतर समानच रोग झाला होता.

एकूण १६८८ रोगांपैकी ५५ रोग हे तुमच्या बाळाच्या जन्माच्या महिन्यावर अवलंबून आहेत. एक विशेष बाब म्हणजे, मे आणि जुलै मध्ये जन्मलेली बालके ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये जन्मलेल्या बालकांपेक्षा जास्त निरोगी होती. मे आणि जुलै मध्ये जन्मलेल्या बाळांमध्ये जास्त रोगप्रतिकारक शक्ती होती.

अहवाल हे सांगतात

नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या बालकांच्या तुलनेत एप्रिल ते जुलैमध्ये जन्मलेल्या बालकांना टाइप-१ डायबेटीसचा जास्त धोका असतो.

हिवाळ्यात जन्मलेल्या बाळांना श्वसनाचा त्रास असू शकतो. सोप्या भाषेत, या बाळांना दम्याचा जास्त धोका संभवतो. असे मानले जाते की, अर्भकांना संसर्गाची लागण होण्याची जास्त शक्यता असते; कारण त्यांना श्वसनाचे रोग होण्याचे प्रमाणही जास्त असते.

जरी हे तुमच्या बाळाबरोबरदेखील होईल, असे आम्ही खात्रीशिरपणे म्हणत नसलो; तरी वरील माहिती आणि आकडेवारी ही जगभरात जन्मलेल्या अर्भकांची आहे. जसे जन्मकुंडली या ढोबळमानाने बनवलेल्या असतात; तसेच आम्ही वरील लेख हा मनोरंजनाच्या उद्देशाने बनवलेला आहे. तुमच्या राशीभविष्याप्रमाणेच असे तुमच्या बाळाबरोबर घडू शकते, अथवा घडणारही नाही. कोणतेही नवे संशोधन आणि इंटरनेटवर असणाऱ्या भरपूर गोष्टी आपल्याला जगाविषयी जाणून घेण्यास मदत करतात आणि म्हणून आमचा तुम्हा सर्वांना हा सल्ला आहे की:

# संतुलित आहार घ्या

# पुरेशा प्रमाणात झोपा

# भरपूर व्यायाम करा

जर कोणाही पालकाला कोणताही आजार वा रोग असेल, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी भविष्यातील आजार टाळण्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon